लग्नानंतर सहसा बॉलीवूड अभिनेत्री या बोल्ड किंवा सेक्सी लुकमध्ये सोशल मीडिया पोस्ट शेअर करत नाहीत. पण अभिनेत्री मिनिषा लांबा मात्र लग्नानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून बोल्ड आणि सेक्सी फोटोज शेअर करत आहे. खरंतर मिनिषा बऱ्याच काळापासून बॉलीवूडपासून लांब आहे. पण अभिनयापेक्षा ती सोशल मीडियावर जास्त एक्टीव्ह असते. त्यामुळे तिचे बोल्ड फोटोज व्हायरल होत आहेत. मिनिषाने आत्तापर्यंत अनेक बॉलीवूड चित्रपटात काम केलं आहे. आणि आता लग्नानंतर ती तिच्या फिटनेस लक्ष केंद्रित करत आहे.
मिनिषा लांबा या बोल्ड फोटोजमध्ये सोशल मीडियावर तिच्या सौंदर्याचे जलवे दाखवत आहे. मिनिषाचे इन्स्टावर हजारो फॉलोअर्स आहेत.
मिनिषाने तिचे ब्लॅक बिकीनीतले फोटोजही शेअर केले आहेत ज्यामध्ये तिचा बोल्ड अवतार दिसत आहे.
मिनिषाने शूजीत सरकारच्या ‘यहां’ चित्रपटातून 2005 साली बॉलीवूडमधील करियरला सुरूवात केली होती. पण चित्रपटातून मिनिषाला बॉलीवूडमध्ये काही खास ओळख मिळाली नाही.
त्यानंतर मिनिषाने कॉर्पोरेट, हनिमून ट्रॅव्हल्स, दस कहानियां, बचना ए हसीनो, भेजा फ्राय 2, हम तुम शबाना, जोकर, हीर एंड हीरो, भेजा फ्राय 3 आणि भूमी या चित्रपटात काम केलं. 2017 साली आलेल्या भूमी चित्रपटात मिनिषा शेवटची दिसली होती.
कोरोनामध्येही उर्वशी रौटेलाचा हॉट व्हिडिओ होतोय व्हायरल
मिनिषा लांबाने 2015 साली लग्न केलं आणि त्यानंतर ती बॉलीवूडपासून लांबच राहिली. मिनिषाने बॉयफ्रेंड रेयान थाम सोबत लग्न केलं. जो पूजा बेदीचा चुलत भाऊ आहे.
बोल्ड अवतारात इन्स्टावर झळकणारी ड्रीमगर्ल नुसरत भरूचा
सलमान खानच्या बहुचर्चित रिएलिटी शो बिग बॉसच्या सिझन 8 मध्येही मिनिषा लांबा दिसली होती. या शोमुळे मिनिषाला बरीच प्रसिद्धी मिळाली होती.
परी म्हणू की सुंदरा ! ‘मलंग गर्ल’ दिशा पटानीचं लेटेस्ट फोटोशूट व्हायरल
घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी.