आपल्या आवडत्या कार्यक्षेत्रात आपले स्वतःचे नाव, अस्तित्व निर्माण केल्यावर अनेकांची इच्छा असते की आपलं स्वतःचं, आपल्या कष्टातून उभं राहिलेलं आणि आपल्या हक्काचं असं घर असावं. अनेकांनी घराचं स्वप्नं पाहिलेलं असतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनतदेखील घेतलेली असते आणि कोणीतरी म्हंटल आहेच की, ‘इच्छा तिथे मार्ग’ आणि असच घडलंय अभिनेत्री मोनालीसा बागलच्या आयुष्यात. मोनालिसाचं हे स्वप्नं पूर्ण झालं असून तिच्या आनंदाला पारावर उरला नाहीये. फारच कमी काळात मोनालिसाने अभिनय क्षेत्रात आपले नाव उमटवले आहे. आता तिने तिच्या घराचंही स्वप्नं पूर्ण केलंय. अभिनेत्री मोनालीसा बागल ही आत्तापर्यंत अनेक मराठी सिनेमा, मालिकेतून, वेगवेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आली आहे. गेल्या वर्षी तिचा झी टॉकीजचा ‘गस्त’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि या सिनेमाच्या निमित्ताने तिने पुन्हा प्रेक्षकांची मने जिंकली. सोशल मीडिया वरचे तिचे फोटोज् देखील तिच्या फॅन्सना आवडत आहेत. सोशल मीडियावर नुकतेच तिच्यावर अभिनंदन, शुभेच्छांचा वर्षाव झाला कारण तिने स्व कमाईतून तिची घराची इच्छा, स्वप्न पूर्ण केले आहे.
परराज्यातून मराठी मालिकांनी गुंडाळला गाशा, मुंबईत करणार चित्रीकरण
मोनालिसाने केल्या भावना व्यक्त
एवढ्या कमी वयात तिने घेतलेली उंच भरारी यासाठी तिचे विशेष कौतुक झाले पण उंच भरारी घेण्यामागे ती तिच्या कुटुंबाला श्रेय देते. घरासंबंधीची सोशल मीडिया वर पोस्ट करताना तिने म्हटले होते की, “‘𝘋𝘳𝘦𝘢𝘮 𝘊𝘰𝘮𝘦 𝘛𝘳𝘶𝘦’ ची फिलिंग आज मी अनुभवतेय…माझं स्वतःचं घर व्हावं हे माझं स्वप्न होतं पण त्याही पेक्षा जास्त ही माझ्या आईची इच्छा होती आणि आज ती पूर्ण होतेय पण हा सुंदर क्षण अनुभवायला ती नाही. ती नसतानाही कायम माझ्या सोबत असतेच म्हणून हा क्षण मी तिच्या आठवणीने आणि आनंदाने साजरा करणार आहे. आज मी किती आनंदी आहे याचा अंदाज तिच्याशिवाय कोणालाच येऊ शकत नाही. I miss you so much आई (My Idol) on this special moment of my life.
पण आई गेल्या नंतर माझी काकू ‘पन्ना हेमंत राणे’ हिने मला आधार दिला. आई नंतर आईसारखं कोणी माझ्यावर प्रेम केलं असेल तर ती माझी काकू. माझे स्वप्न पूर्ण होण्यात, माझ्या करिअरमध्ये काकूचा देखील मोलाचा वाटा आहे. असं म्हणतात ना की ‘कुटुंब हेच सर्वकाही असतं’ आणि माझे आई-वडील दोघेही नसताना मला कुटुंबा सारखंच प्रेम काका, काकूंनी दिलं. ते दोघेही माझे आधारस्तंभ आहेत.’’ मोनालिसा ही तिच्या घराच्या बाबतीत स्वतःला खूप भाग्यवान समजते कारण तिच्याकडे तिने जोडलेली, तिच्यावर जीवापाड प्रेम करणारी माणसं आहेत. लवकरच मोनालिसाचे नवीन चित्रपटदेखील पाहायला मिळणार आहेत.
पावसाचा आनंद द्विगुणित करतील ही मराठी चित्रपटातील गाणी
सध्या नव्या घराच्या कामात व्यस्त
मोनालिसा आता बॅग पॅक करून नव्या घरात शिफ्ट होण्यासाठी तयार आहे. सध्या ती नव्या घराच्या डेकोरेशन आणि इतर कामामध्ये व्यस्त आहे. सर्वांचंच स्वप्नं असतं, स्वतःचं घर स्वतःच्या हाताने सजवायचं. मोनालिसाने फारच कमी वयात हे स्वप्नं पूर्ण केले आहे. तर आता लवकरच ती या नव्या घरात राहायला जाणार असल्याचंही समजत आहे. एकंदरीत सध्या मोनालिसा खूपच आनंदी असून तिच्या नव्या घराबद्दल आणि पुढील वाटचालीबद्दल POPxo मराठीकडून मनःपूर्वक शुभेच्छा!
पहिल्या पत्नीच्या अफेअरबद्दल बोलणे नाही रुचले शिल्पाला, दिली ही प्रतिक्रिया
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक