संपूर्ण महाराष्ट्रात 17 जूनला ‘भिरकीट’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. सध्या मराठी चित्रपटाला खूप चांगले दिवस आल्याचे दिसून आले आहे. वेगवेगळ्या विषयावर मराठीमध्ये चित्रपट बनवले जात आहेत. गिरीश कुलकर्णी, मोनालिसा बागल याचां हा चित्रपट प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी घेऊन आला आहे. क्लासिक एंटरप्राईज प्रॉडक्शन प्रस्तुत, सुरेश जामतराज ओसवाल आणि भाग्यवंती ओसवाल निर्मित, अनुप जगदाळे लिखित-दिग्दर्शित ‘भिरकीट’ सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. हा सिनेमा प्रेक्षकांचे मनोरंजन करतच आहे, पण तसेच या सिनेमातील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळतंय. असंच एक सिनेमातलं गोड आणि सुंदर पात्रं म्हणजे रेश्माचं पात्रं जे साकारलंय अभिनेत्री मोनालिसा बागल (Monalisa Bagal) हिने. मोनालिसा सध्या आपल्या कामामुळे वाखाणली जात आहे. यानिमित्नाने आम्ही मोनालिसाला संपर्क साधला असता तिने आपला आनंद व्यक्त केला आणि प्रेक्षकांचेही आभार मानले.
छोट्याशा गावातील कथा
‘भिरकीट’ सिनेमाची गोष्ट ग्रामीण भागातील, एका छोटयाशा खेड्यात घडते. गाव म्हंटलं की गावाकडची गोष्ट, तेथील लोकांची बोलीभाषा, शैली ही पाहायला मिळतेच आणि मोनालिसाने साकारलेलं रेश्माचं पात्रं हे फारच विशेष आहे. तिचा आवाज, तिची गावाकडची भाषा आणि अर्थात अभिनय पाहायला खूप छान वाटलं अशा प्रतिक्रिया तिला तिच्या चाहत्यांनी दिल्या. या सिनेमाने मोनालिसाला काय दिलं असा प्रश्न तिला विचारलेला असताना तिने सांगितले की, “या सिनेमाने मला अप्रतिम अनुभव दिला. दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी मला या सिनेमाने दिली. विशेष करुन गिरीश कुलकर्णी, हृषिकेश जोशी, कुशल बद्रिके यांच्या सोबत काम करायला मिळालं याचा आनंद वाटतोय. तानाजीसोबत यापूर्वी पण काम केलं आहे, त्यामुळे त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव हा भन्नाटच असतो. सहकलाकारापेक्षा मित्र या नात्याने आम्ही एकत्र काम करतो म्हणून रेश्मा आणि मच्या साकाराताना मजा आली. ‘कॅप्टन ऑफ दि शिप’ अनुप सरांच्या दिग्दर्शन कौशल्याविषयी सर्वजण भरभरुन बोलत आहेत आणि ते खरंच आहे, इतक्या सा-या कालाकारांना एकत्र घेऊन सिनेमाची गोष्ट मांडणं सोपं नाही पण त्यांनी ते उत्तमरित्या केलं त्यासाठी त्यांचे विशेष कौतुक व्हायला हवं. सिनेमाचं संगीत तर कमालच आहे, नकाश अजिज यांचं गाणं खूप भारी वाटलं. कोरिओग्राफर राहुल-संजीव यांच्यासोबतचा हा माझा तिसरा सिनेमा, त्यामुळे त्यांच्यासोबत पुन्हा काम करायला मिळालं. अशा ब-याच आनंदी, मजेशीर, समाधानकारक गोष्टी ‘भिरकीट’ने मला दिल्या.”
मोनालिसाचा वाढता ग्राफ
मोनालिसाने आतापर्यंत अनेक चित्रपट केले असून तिने विविध भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय सोशल मीडियावरही मोनालिसाचा खूपच मोठा चाहता वर्ग आहे. अत्यंत सालस अशी मोनालिसाची ओळख असून आपल्या इमेजला साजेशा भूमिका आतापर्यंत मोनालिसा करत आली आहे आणि प्रेक्षकांची वाहवादेखील मिळवली आहे. तसंच आतापर्यंत वेगवेगळ्या कलाकारांसह मोनालिसाने काम केले आहे. तिच्याकडे मराठीतील अजून वेगळ्या विषयांवरील चित्रपटदेखील आहेत. लवकरच तिचा ऐतिहासिक चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या मोनालिसा या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. तर आपल्या चाहत्यांसाठी मोनालिसा आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरदेखील नेहमीच अॅक्टिव्ह असते. आता मोनालिसाने नवे अजून कोणते प्रोजेक्ट्स असतील याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक