बॉलीवूडमध्ये गुपचूप लग्न हे काही नवीन नाही. अचानक एखाद्या सेलिब्रिटीचे लग्नाचे फोटो सोशल मीडियावर येतात आणि लगेच व्हायरल होतात. असंच काहीसं झालं आहे, विरासत या हिंदी चित्रपटातून बॉलीवूडमध्ये आलेली अभिनेत्री पूजा बत्रासोबत. पूजाने बॉलीवूडमधीलच सहाय्यक भूमिकांमध्ये दिसणाऱ्या अभिनेता नवाब शाह याच्याशी गुपचूप लग्न केलं आणि मग ती बातमी कन्फर्मही केली.
गुपचूप लग्नाची पूर्ण कहाणी
गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री पूजा बत्रा आणि नवाब शाहच्या लग्नाबाबतच्या बातम्या येत होत्या आणि अखेरही बातमी पूजाने कन्फर्म केली. तिने सांगितलं की, दिल्लीमध्ये एका खाजगी समारंभात या दोघांनी लग्न केलं.
खरंतर या चर्चांना तेव्हा सुरूवात झाली जेव्हा नवाबने पूजाचा चुडा घातलेला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला.
एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार पूजाने सांगितलं की, हो, ‘मी लग्न केलं आहे. नवाब आणि माझ्या कुटुंबाच्या उपस्थितीत दिल्लीत आमचं लग्न झालं. लोक आम्हाला विचारत होती की, आम्ही लग्न का नाही करत. सगळं चांगल सुरू होतं. मग मला वाटलं की, ज्या माणसासोबत मला आयुष्य व्यतीत करायचं आहे त्याच्यासोबत लग्न पुढे ढकलण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे आम्ही आर्य समाजात लग्न केलं आणि या आठवड्यात लग्नाचं रजिस्ट्रेशन करू.’
यासोबतच पूजाने इन्स्टाग्रामवर फोटोजही पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये वधूच्या पारंपारिक वेशात दिसत असून तिने हातात चुडा घातला आहे. या फोटोत ती तिच्या आईशी बोलताना दिसत आहे.
पाच महिने केलं डेट
तिने हेही सांगितलं की, जवळपास 5 महिन्यांपासून ती नवाब शाहला डेट करत आहे. ती आणि नवाब एकमेंकाना चित्रपटसृष्टीत काम करत असल्यामुळे ओळखतात. फेब्रुवारी महिन्यात एका मित्राने त्यांची भेट घडवून दिली. दिल्लीतच नवाबने तिला लग्नासाठी प्रपोज केलं आणि घरच्यांना भेटण्यासाठी नेलं.लग्नानंतर हे दोघं दिल्लीजवळील मानेसरमधल्या एका रिसोर्टमध्ये गेले. तिथलेही काही फोटोज या कपलने शेअर केले आहेत.
पूजाचं दुसरं लग्न
या दोघांच्या खाजगी आयुष्याबाबत बोलायचं झाल्यास पूजाचं हे दुसरं लग्न आहे. या आधी तिने कॅलिफोर्नियातील एका डॉक्टरशी 2002 साली लग्न केलं होतं. 2011 मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर गेल्या काही दिवसापासून पूजा आणि नवाबच्या डेटींगच्या बातम्या येत होत्या. तर पूजाआधी नवाब आणि टीव्ही अभिनेत्री कविता कौशिक हे एकमेंकाना गेली 5 वर्ष डेट करत होते. 2016 साली ते दोघं वेगळे झाले. अशीही बातमी होती की, दोघांचा धर्म वेगळा असल्याने कविताच्या घरच्यांनी लग्नाला परवानगी दिली नाही. त्यामुळे दोघंही वेगळे झाले. पण या बातम्यांना नवाबने नकार देत काही खाजगी कारणांमुळे दोघं वेगळे झाल्याचं सांगितलं.
पूजा आणि नवाबचा बॉलीवूड करिअर ग्राफ
पूजाने आत्तापर्यंत विरासत, हसीना मान जाएगी, जोडी नंबर 1 आणि नायकसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तर नवाब शाह हिंदीसोबतच दक्षिणेतही प्रसिद्ध आहे. त्याने दिलवाले आणि टायगर जिंदा है सारख्या मोठ्या चित्रपटांमध्येही भूमिका केल्या आहेत.
#POPxoMarathi कडून दोघांनाही लग्नाच्या शुभेच्छा.
हेही वाचा –
सारा अली खानने केला ब्रायडल लुक शेअर, लग्नासाठी आले प्रपोजल्स
करिनाने मला लग्नाचे आमंत्रण… वाचा इतक्या वर्षानंतर काय म्हणाला शाहीद