अभिनेत्री प्रीतम कागणे (Pritam Kagane) विजेता सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे. ती या सिनेमात सुनंदा गुजर नामक ऍथलिट रनरची भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे प्रीतमने या भूमिकेसाठी तब्बल 6 किलो वजन कमी केले आहे. सांगली जवळील वठार या छोट्याशा गावात लहानाची मोठी झालेली अशी ही सुनंदा आहे. लहानपणापासून नॅशनल लेव्हलपर्यंत पोहोचण्याचे स्वप्न उराशी बाळगून तिने पुढचा पल्ला गाठला. गावखेड्यात हव्या त्या सोयी उपलब्ध नसल्याने आपले स्वप्न कसे पूर्ण होईल यासाठी ती सतत झटत राहते. मात्र या प्रवासादरम्यान तिला साथ मिळाली ती माईंड कोचची. या चित्रपटात माईंड कोचच्या भूमिकेत सुबोध भावे (Subodh Bhave) दिसणार आहेत. सुनंदाला नॅशनल लेव्हलचे धडे देऊन ते स्पर्धेसाठी तयार करतात. एक मॅरेथॉन रनर घडविण्यासाठी तब्बल आठ वर्षाचा कालावधी लागतो मात्र प्रीतमला हा आठ वर्षाचा कालावधी अवघ्या दोन महिन्यात ट्रेनिंग घेऊन पूर्ण केला. दररोज तीन तास नॅशनल ऍथलिट यांच्याकडून ट्रेनिंग घेऊन तो सराव तिने जिद्दीने पूर्ण केला. दररोज 18 किमी धावून विविध खेळाडूंचे व्हिडीओ युट्युबवर पाहून हवा तसा आहार तिने घेतला. योग्य तो आहार घेऊन प्रीतमने तब्बल सहा किलो वजन कमी केले. खेळाडूची भूमिका साकारत प्रीतमने केले 6 किलो वजन कमी केले आहे.
अधिक वाचा – नवा कोरा कॉमेडी शो, हे तर काहीच नाय म्हणत स्टार्स घालणार धुमाकूळ
पूजा सावंतचीही महत्त्वाची भूमिका
चित्रपटात प्रीतमसोबत अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) देखील दिसणार आहे. तिच्यासोबतचे बऱ्याच धावण्याच्या स्पर्धेचे काही सीन पाहायला मिळणार आहेत. याबद्दल बोलताना प्रीतम असे म्हणाली की, मी विजेता सिनेमासाठी 6 किलो वजन कमी केले, या चित्रपटात मी साकारत असलेल्या रनर ऍथलिटच्या भूमिकेसाठी केलेल्या मेहनतीचे चीज झाले. मी केलेली मेहनत या चित्रपटातून नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. या चित्रपटात मैत्रीच्या आधारासह बरेच काही अनुभवता येणार आहे. प्रीतमच्या अभिनयाची वाटचाल ही दाक्षिणात्य चित्रपटातून झाली आहे. ‘मिस्टर बिन’ या मल्याळम चित्रपटात प्रमुख भूमिका साकारून दाक्षिणात्य सिनेरसिकांच्या मनात तिने एक वेगळेच स्थान निर्माण केले. त्यानंतर तिने मराठी चित्रपटसृष्टीकडे आपला मोर्चा वळविला. ‘नवरा माझा भोवरा’, ‘हलाल’, ‘अहिल्या’ यासारख्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली. याशिवाय सोहा अली खानसोबतच्या ’31 ऑक्टोबर’ या चित्रपटातून तिने हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. बेस्ट डेब्यु म्हणून ‘संस्कृती कालादर्पण अवॉर्ड’, बेस्ट प्रॉमिसिंग ऐक्ट्रेस म्हणून ‘दादासाहेब फाळके अवॉर्ड’, बेस्ट ऐक्ट्रेस म्हणून ‘झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड’ आणि ‘सह्याद्री सिने अवॉर्ड’ पटकावत अभिनय क्षेत्रात कौतुकाची थाप मिळवली.
अधिक वाचा – फ्री हिट दणक्या’ने होणार सगळ्यांचीच ‘दांडी गुल’
दोन वर्षानंतर प्रदर्शित
तर आता कोरोनामुळे पुन्हा हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. गेले दोन वर्ष या चित्रपटाची चर्चा होती. कोरोनाआधी या चित्रपटाचे थिएटरमध्ये प्रदर्शन झाले होते. मात्र अगदी कमी कालावधीत थिएटर बंद झाल्यामुळे प्रेक्षकांना हवा तसा प्रतिसाद देता आला नव्हता. आता पुन्हा एकदा थिएटर सुरू झाल्यामुळे हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. तर नुकतचं याचे प्रमोशन करण्यासाठी सुबोध भावे आणि पूजा भावे यांनी ‘बिग बॉस मराठी’ च्या तिसऱ्या सीझनमध्ये (Bigg Boss Marathi) हजेरी लावली होती.
अधिक वाचा – Bigg Boss Marathi : कॅप्टन्सी कार्यात होणार पुन्हा राडा
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक