ADVERTISEMENT
home / मनोरंजन
actress-radhika-apte-talk-about-her-wedding-secret-she-doesnt-have-picture-with-husband-in-marathi

…म्हणून राधिका आपटेने काढले नाहीत स्वतःच्या लग्नात फोटो

चित्रपट असो वा वेबसिरीज दोन्हीकडे आपल्या अभिनयाची हुकूमत गाजवणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे राधिका आपटे (Radhika Apte). वेबसिरीजच्या जगातील राणी असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. आपल्या अभिनयाच्या जोरावर राधिका आपटेने फारच कमी कालावधीत अनेकांना आपलंसं करून घेतलं आहे. राधिका तिच्या भूमिकेसाठी नेहमीच चर्चेत असते. पण तिच्या खासगी आयुष्याचीही नेहमी चर्चा होत असते. राधिकाने 10 वर्षांपूर्वीच लग्न केलं आहे याची अनेकांना कल्पनाही नाही. तिच्या सोशल मीडियावरही तिच्या नवऱ्याचे अधिक फोटो नाहीत. पण राधिकाने लंडनमध्ये स्थायिक असणाऱ्या संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी (Benedict Taylor) केले आहे. अगदी मोजक्या मित्रमैत्रीणी आणि कुटुंबाच्या उपस्थितीत राधिका विवाहबद्ध झाली होती. मात्र तिच्या लग्नाचा एकही फोटो तिच्याकडे नाही असं नुकतचं तिने एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केले आहे. त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. पण घाबरून जाण्यासारखं काहीच नाही. याचा खुलासा तिनेच या मुलाखतीदरम्यान केला आहे. 

राधिकाचा लग्नाच्या फोटोंबाबत खुलासा 

राधिका आपटे सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. मात्र कधीही तिच्या नवऱ्याचा फोटो तिथे पाहायला मिळत नाही. तर ती आपल्या खासगी आयुष्याबाबतही फारच कमी बोलते. मात्र एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीमध्ये राधिकाने आपल्या लग्नाबाबत काही खुलासे केले आहेत. यावेळी तिने सांगितले की, ‘10 वर्षांपूर्वी बेनेडिक्ट आणि माझं लग्न झालं. पण लग्नामध्ये फोटो काढायचे आमच्या लक्षातच राहिले नाही. आम्ही फोटो काढायला विसरलो. कारण आम्ही आमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना लग्नाचे आमंत्रण दिले होते. जेवणही आम्ही स्वतःच बनवलं होतं. तर इंग्लंडमध्ये एका ठिकााणी आमचं लग्न झालं, तिथेच आम्ही पार्टीही केली. पण आम्ही पार्टीमध्ये इतके मशगुल होतो की आम्ही फोटोच काढले नाहीत. खरं तर आमच्या मित्रमंडळींपैकी काही चांगले फोटोग्राफरही होते. तरीही त्यांनी आमचे फोटो काढले नाहीत. कारण मी आणि माझ्या नवऱ्यासह तेव्हा सगळेच नशेमध्ये होतो. त्यामुळे आमच्या लग्नाचा एकही फोटो आमच्याकडे नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या नवऱ्याला फोटो काढण्यात अजिबातच रस नाही. इतक्या वर्षात थोडीफार सुधारणा झाली आहे. कारण आम्ही फिरायला जातो तेव्हा तो फोटोसाठी पोझ द्यायला लागला आहे. मात्र तेव्हा कोणीही फोटो काढला नाही आणि एका अर्थी ते चांगलंच झालं असं आता वाटतं’

चाहत्यांना वाटते आश्चर्य

राधिकाने असा खुलासा लग्नाच्या फोटोबाबत केला असला तरीही चाहत्यांना नक्कीच या गोष्टीचे आश्चर्य वाटत आहे. एकही फोटो कसा काय काढला नाही याचे कुतूहलही वाटत आहे. 2012 मध्ये राधिकाने बेनेडिक्टसह लग्न केले. मात्र तिच्या लग्नाची कुठेही कधीही चर्चा झाली नाही. कारण तिने अत्यंत गुपचूप आणि साधेपणाने लग्न केले. नृत्याचे धडे गिरविण्यासाठी जेव्हा राधिका लंडनमध्ये गेली तेव्हाच तिची आणि बेनेडिक्टची ओळख झाली आणि नंतर दोघेही प्रेमात पडले. दोघांनीही लग्न करण्याची निर्णय घेतला. मात्र राधिकाने कधीही मागे वळून पाहिले नाही. तिचा चित्रपट आणि वेबप्रवास अगदी जोमात सुरू आहे. तर गेले दहा वर्ष दोघेही सुखाचा संसार करत आहेत. मात्र कधीही दोघांचा फोटो फारसा दिसून येत नाही आणि राधिका आणि तिचा नवरा फारसे कोणत्याही पार्टीतही दिसून येत नाहीत. नुकतीच राधिकाची वेबसिरीज प्रसारित झाली असून सिरीजला चांगला प्रतिसादही मिळत आहे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
10 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT