ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
‘माझ्या शरीरात पवित्र रक्त आहे, म्हणून मला कोरोना होत नाही’, राखीचं अजब वक्तव्य

‘माझ्या शरीरात पवित्र रक्त आहे, म्हणून मला कोरोना होत नाही’, राखीचं अजब वक्तव्य

देशभरात कोरोनाच्या (coronavirus) दुसऱ्या लाटेने हाहाःकार माजवला आहे. चारही दिशेने सध्या सगळेच कोरोनाशी दोन हात करत आहेत. पण नेहमीप्रमाणे राखी सावंतने (Rakhi Sawant) अजब वक्तव्य करत कोरोना व्हायरसचा त्रास आपल्याला का होत नाही हे सांगून पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतलं आहे. राखीने एका कॉफी शॉपच्या ठिकाणी काही फोटोग्राफर्सने गाठले असता हा दावा केला आहे. ‘जीजस माझ्याबरोबर आहे आणि माझ्या शरीरात पवित्र रक्त आहे, म्हणूनच मला कोरोना गाठू शकत नाही’ असं राखीने सांगून पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. राखी कधी काय बोलेल याचा काहीच नेम नाही आणि पुन्हा एकदा तिने हे सिद्ध केलं आहे. राखी ही नॉनस्टॉप एंटरटेनमेंट (Entertainment) आहे हे कोणीच नाकारणार नाही. पण कधी कधी एखादी गंभीर गोष्टही राखी अशा तऱ्हेने बोलते की, त्या गोष्टीचा गंभीरपणाच राहात नाही. 

राखीने लढवला असा तर्क

सध्या राखी सावंत आपल्या आईसाठी रोज हॉस्पिटलमध्ये ये जा करत आहे. तिच्या आईला कॅन्सर झाल्यामुळे तिच्यावर उपचार चालू आहेत. त्यामुळे फोटोग्राफर्स बऱ्याचदा राखीला गाठतात. या दरम्यान राखीने आपल्याला कोरोना का होत नाही याचं अजब कारण तर्क लढवत दिले आहे. तर वॅक्सिनच्या कमतरतेबद्दल चिंताही व्यक्त केली. गरजवंतांना मदत करण्यासाठी तिने आवाहनही केले आहे. ‘मला कधीही कोरोना होऊ शकत नाही, कारण माझ्या शरीरात येशूचे पवित्र रक्त आहे. त्यामुळे मला आणि माझ्या कुटुंबाला कोरोना होऊ शकत नाही’ असं राखीने सांगितले आहे. सलमान खान (Salman Khan) आणि सोहेल खान (Sohail Khan) च्या मदतीने राखी सध्या आपल्या आईसाठी कॅन्सरवर उपचार घेत आहे. 

दीपिका पादुकोणच्या संपूर्ण कुटुंबाला करोनाची लागण

निक्की तांबोळीच्या भावाच्या निधनावर केलं दुःख व्यक्त

नुकतंच निक्कीच्या भावाच्या निधनाच्या वृत्ताने सर्वच हळहळले. राखीनेही आपले दुःख व्यक्त केले असून निक्की नेहमी तिच्या भावाबद्दल बोलायची असंही सांगितलं आहे. निक्की आणि राखीची मैत्री नसली तरीही राखीने नेहमीच निक्कीला मदत केली होती. तसंच बाहेर आल्यानंतरही दोघी एकमेकींशी चांगल्या बोलताना दिसून आल्या होत्या. 

ADVERTISEMENT

सलमान खानचा खुलासा, राधे चित्रपटाची कमाई देणार कोरोनाग्रस्तांना

कंगनाला सुनावले खडे बोल

दरम्यान कंगना राणावत (Kangana Ranaut) चे ट्विटर हँडल बंद केल्यानंतरही राखीने आपलं मत व्यक्त केले आहे. कोणालाही भडकवणारी वक्तव्य करणं हे देशाशी गद्दारी करण्यासारखंच आहे. कंगनासारख्या लोकांबरोबर हे योग्यच पाऊल उचलण्यात आलं आहे. त्याशिवाय कंगनाने देशसेवा करावी आणि ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास मदत करावी असा सल्लाही राखीने दिला आहे. ऑक्सिजन मिळत नाहीये. इतके करोडो रूपये कंगनाजवळ आहेत. मग ऑक्सिजन खरेदी करून लोकांमध्ये वाट. आपणही तेच करत आहोत. ते सर्वात जास्त महत्वाचं असल्याचं राखीने सांगितलं आहे. जास्तीत जास्त लोकांना मदत करता यावी हा प्रयत्न करावा असंही राखी म्हणाली आहे. राखीचे हे सगळेच व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राखी सावंत सज्ज झाली आहे असंच म्हणावं लागेल. 

लग्नाच्या काही दिवसानंतर कॉमेडियनला जाणवले लग्नाचे साईड इफेक्टस, व्हिडिओ व्हायरल

POPxo and MyGlamm have come together to create the future of beauty with YOU! Take The Great Glamm Survey and get Beauty Benefits worth Rs 1000, including a FREE Lipstick from MyGlamm!

ADVERTISEMENT
05 May 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT