ADVERTISEMENT
home / मनोरंजन
सडक2 चित्रपट पाहिल्यामुळे रश्मी देसाईवर फॅन्स नाराज, केले अनफॉलो

सडक2 चित्रपट पाहिल्यामुळे रश्मी देसाईवर फॅन्स नाराज, केले अनफॉलो

बॉलिवूडमध्ये सध्या सगळाच गदारोळ माजला आहे. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर नेपोटिझमवर कडाडून टीका होत आहे. यातच आलिया भट, संजय दत्त स्टारर ‘सडक 2’ हा चित्रपट ट्रेलर रिलीजपासूनच वादादित राहिला आहे. या चित्रपटातील नेपोटिझममुळे अनेकांनी या चित्रपटाला बॉयकॉट केले होते. इतकेच नाही तर चित्रपट पाहिल्यानंतरही अनेकांनी हा चित्रपट फार काही खास नाही. असे परीक्षण केले होते. या चित्रपटावर आणि त्याच्या स्टारकास्टवर नाराजी व्यक्त केली जात असतानाच आता हा चित्रपट पाहिला म्हणून टीव्ही स्टार रश्मी देसाई ही ट्रोल होऊ लागली आहे. तिने चित्रपट पाहण्याआधी बोलून दाखवलेली उत्सुकता आणि त्या उत्सुकतेमुळे केलेली पोस्ट तिच्या फॅन्सला भलतीच खटकलेली दिसत आहे. त्यामुळे सगळ्यांनीच तिला ट्रोल केले आहे.

गोपी बहू येतेय परत, सिद्धार्थ शुक्लादेखील मालिकेत मुख्य भूमिका साकारण्याची शक्यता

फॅन्सला नाही आवडले

सध्या इंडस्ट्रीमधील नेपोटिझमवर चांगलेच युद्ध सुरु असताना रश्मीचे असे वागणे तिच्या फॅन्सला फारच खटकलेले दिसत आहे. रश्मीने सडक 2 पाहत असतानाचा एक GIF शेअर केला. त्याखाली तिने हा चित्रपट पाहण्यासाठी फारच उत्सुक असल्याचे म्हटले आहे. तिने ही पोस्ट करायला आणि लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. तिच्या त्या एका ट्विटवर अनेकांनी रिट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर तिच्या काही फॅन्ससी तिला ट्विटरवर चक्क अनफॉलो करायलाही सुरुवात केली आहे. त्याचे स्क्रिनशॉटही अनेकांनी शेअर केले आहे. 

सुशांत सिंहच्या बाबतीत गप्प का

सध्या सगळीकडे सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु आहे. अनेकांनी या संदर्भात आपली मत मांडली आहेत. पण रश्मी देसाई तू या बाबतीत गप्प का असा सवालही तिला अनेकांनी केला आहे. सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी एक यंत्रणा काम करत असताना अशा पद्धतीने तू  अशा लोकांचे चित्रपट पाहणे म्हणजे ती मिशन कमजोर करणे आहे, तुझ्याकडून ही अपेक्षा नाही असा टोमणाच अनेकांनी लगावला आहे. 

ADVERTISEMENT

अक्षय कुमारचा नवा स्टंट, बेअर ग्रिल्ससोबत करणार खतरनाक जंगलात भटकंती

रश्मीने नुकतीच घेतली गाडी

घेतली आलिशान गाडी

Instagram

रश्मी तिच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींमुळे चर्चेत असते. नुकतीच तिने रेंज रोव्हरचा अत्यंत महागडा असा गाडीचा मॉडेल विकत घेतला. तिने या गाडीचे फोटो आणि व्हिडिओही तिच्या पेजवर शेअर केले आहेत. रश्मी देसाई या पूर्वी बिग बॉसमध्ये दिसली होती. यामध्ये रश्मीने तिच्या खासगी आयुष्याशी निगडीत अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. नंदीश संधू नावाच्या अभिनेत्यासोबत झालेले लग्न आणि त्या लग्नातील अडचणी तिने या दरम्यान व्यक्त केल्या होत्या त्यामुळे रश्मी देसाईच्या आयुष्यातील अनेक गोष्टी तिच्या फॅन्सना कळल्या होत्या. 

ADVERTISEMENT

टेरेन्स लुईसचा हिंदीचा क्लास होतोय व्हायरल, Vlogeshwari मध्ये येतेय मजा

सडक 2 चा विरोध कायम

सडक 2 चित्रपटाचा ट्रेलर आल्यापासूनच त्याला कडाडून विरोध केला जात आहे. अनेकांनी या चित्रपटाच्या ट्रेलरवरच निगेटीव्ह कमेंट करुन आपला राग व्यक्त केला होता. या चित्रपटातील स्टारकास्टही केवळ नेपोटिझमवर आधारीत असल्यामुळे या चित्रपटाला विरोध केला जात आहे. 

आता रश्मी देसाईने हा व्हिडिओ शेअर करत उगाचच वाद ओढावून घेतला आहे. 

31 Aug 2020
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT