मराठी सिनेसृष्टीत लग्नाचे वारे वाहत आहेत असं म्हटलं तर नक्कीच वावगं ठरणार नाही. या वर्षाच्या सुरूवातीपासूनच अनेक कलाकारांनी लग्न केले आहे. यामध्ये अभिज्ञा भावे, सिद्धार्थ चांदेकर, मिताली मयेकर, ऋचा आपटे, क्षितीश दाते यांचाही समावेश आहे. आता अजून एक मराठी अभिनेत्री लग्नबंधनात अडकत आहे. ‘लव्ह लग्न लोचा’ मधून आपली युवा पिढीमध्ये ओळख निर्माण करणारी काव्या अर्थात रूचिता जाधव (Ruchita Jadhav) 3 मे रोजी लग्न करत आहे. मुंबईतील आनंद माने (Anand Mane) या बांधकाम व्यवसायिकाशी रूचिता लग्न करणार असून तिच्या लग्नविधींना सुरूवात झाली आहे.
या अभिनेत्री केवळ सौंदर्याची खाण नाहीत, तर हातात आहे कला
आनंद आणि रूचिताचा आनंदाचा क्षण
काही दिवसांपूर्वीच आपण आनंदला होकार दिला असल्याचे रूचिताने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले होते. आनंदने तिला लग्नाला मागणी घातल्याचे (propose) फोटो रूचिताने शेअर करून आपला आनंद व्यक्त केला होता. 9 एप्रिल रोजी आनंदने रूचिताला लग्नाची मागणी घातली आणि आता एक महिन्यातच रूचिता आणि आनंद लग्नबंधनात अडकत आहेत. ‘आनंदने जेव्हा गुढघ्यावर बसून मला लग्नाची मागणी घातली तेव्हा नक्की काय प्रतिक्रिया द्यावी हे मला कळत नव्हतं. 30 सेकंदाने जेव्हा मी भानावर आले तेव्हा मला जाणवलं की आनंद मला लग्नाची मागणी घालत आहे. रूच हो म्हण असे ते शब्द होते.’ रूचिताने होकार दिल्यानंतर शेवटी #ManGayiRuch असा हॅशटॅग देत तिने या दोघांची लव्ह स्टोरी शेअर केली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे रूचिता आणि आनंद यांचे अरेंज मॅरेज आहे. मागील वर्षी लॉकडाऊनमध्ये त्यांची भेट झाली आणि त्यानंतर सहज भेटीनंतर फोनवर बोलणे सुरू झाले. आनंद आवर्जून रोज फोन करून बोलायचा. डिसेंबर 2020 मध्ये लग्न करणार होतो. आमच्या कुटुंबाने आम्हाला एकमेकांना समजून घेण्यासाठी खूपच वेळ दिला असं रूचिताने आनंदसंदर्भात सांगितले आहे.
कामगार दिनानिमित्त ऐका ही गाजलेली बॉलीवूड गाणी
लग्नात नेसणार आईच्या लग्नातील साडी
रूचिताच्या लग्नाचे विधी तीन दिवस चालणार आहेत. पण केवळ कुटुंबीयच या लग्नाला उपस्थित राहणार आहे. दोन्ही कुटुंबातील माणसांमध्येच हे लग्न होणार आहे. पहिल्या दिवशी साखरपुडा. दुसऱ्या दिवशी हळद आणि संगीत आणि तिसऱ्या दिवशी लग्न असा हा लग्नाचा सोहळा असणार आहे. रूचिता आपल्या लग्नामध्ये आपल्या आईने तिच्या लग्नात नेसलेली साडी परिधान करणार आहे. आईची साडी हा प्रत्येक मुलीचा जिव्हाळ्याचा विषय असतो आणि त्यामुळे रूचिताही आपल्या आईच्या लग्नातील साडी नेसणार आहे. लॉकडाऊनचे नियम शिथील झाल्यानंतर आपल्या मित्रमैत्रिणींसाठी पार्टी ठेवणार आहे. सध्या रूचिता अशाच प्रोजेक्टवर काम करत आहे ज्यामुळे ती आनंदच्या अधिक जवळ राहू शकेल. मात्र लग्नानंतर रूचिताचे नवे प्रोजेक्टस काय असणार आहेत आणि नक्की कोणत्या मालिका अथवा चित्रपटांमध्ये रूचिता काम करणार आहे याची मात्र तिच्या चाहत्यांना कल्पना नाही. लग्नासाठी तिच्या चाहत्यांनी तिला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. रूचिता आणि आनंदला POPxo मराठीकडून मनःपूर्वक शुभेच्छा! तसंच रूचिताला तिच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा!
पुन्हा भेटीला येणार ‘जिवलगा’ मालिका
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक