ADVERTISEMENT
home / मनोरंजन
संभावना सेठ लढतेय गंभीर आजाराशी

आई होण्यासाठी अभिनेत्री घेतेय ट्रिटमेंट पण त्यामुळे झालाय गंभीर आजार

मातृत्व हे कोणत्याही स्त्रीला सुखावणारे असते. पण सगळ्यांच्याच नशीबात मातृत्व सहज आणि पटकन येत नाही. त्यासाठी त्यांना बरेच प्रयत्न करावे लागतात. त्यात सेलिब्रिटीही मागे नाहीत. अनेक महिला कलाकारांना आई होण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागले आहेत. हिंदी आणि बिहारी चित्रपटात काम करणारी अभिनेत्री संभावना सेठ (Sambhavana Seth) ही गेल्या काही वर्षांपासून आई होण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहे. तिने त्यासाठी IVF ट्रिटमेंटचा आधार ही दोन वेळा घेतला आहे. पण तिच्या पदरी निराशाच आली आहे. आई होण्याचे सुख तर नाही पण आता या सगळ्या गोष्टीमुळे ती एका गंभीर आजारातूनही जात आहे. याची नुकतीच माहिती तिने तिच्या युट्युबवर दिली आहे. संभावनाला नेमकं झालयं तरी काय चला घेऊया जाणून

संधिवाताच्या या प्रकाराने त्रस्त

संभावना सेठ आणि तिचा पती

संभावना आणि तिचा पती अविनाश गेल्या काही वर्षांपासून बाळासाठी प्रयत्न करत आहेत. तिने या संदर्भातील माहिती तिच्या चाहत्यांना तिच्या युट्यूब चॅनेलवरुन अनेकदा दिली आहे. नुकताच तिने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये ती निराश आणि हताश दिसत आहे. यामध्ये ती तिच्या आजाराची माहिती देताना सांगतेय की, तिला या पूर्वी असलेला रुमेटॉईज आर्थरायटिस (Rheumatoid Arthritis) हा आजार पुन्हा डोकं वर काढू लागला आहे. तिने केलेल्या IVF नंतरच हे सगळे त्रास होऊ लागले असून त्यामुळे ती फारच त्रस्त झाली आहे. संभावनाचे वजन हे झपाट्याने वाढू लागले आहे. तिच्या हातापायांची बोटं ही सून्न पडतात. तिला काहीही करता येत नाही. शिवाय तिला उठणं- बसणं देखील कठीण होऊन जात आहे. हे सांगताना तिचा अचानक बांध फुटतो आणि ती रडू लागते. कारण तिच्या मागे एकामागे एक संकटाची रांग लागली आहे. 

  यात पुढे ती नवऱ्याचा उल्लेख करत सांगते की, यामध्ये त्याचा कोणताही दोष नसताना त्याला मात्र या सगळ्या गोष्टी सहन करावा लागत आहे. असेही तिने सांगितले आहे. 

हिंमत हारणार नाही

सध्या संभावना ही अनेक आजारांशी सामना करत असली आणि तिच्या पदरी निराशा जरी असली तरी देखील तिने या आजाराशी लढायचे ठरवले आहे. तिच्या कित्येक IVF फेल झाल्या तरी देखील ती पुन्हा प्रयत्न करणार आहे. ती  आई होणार असे तिने ठरवून टाकले आहे. त्यामुळे अनेकांनी तिला यासाठी प्रोत्साहन दिले आहे. इतकेच नाही तर तिच्या इन्स्टा प्रोफाईलवरही तिने फिटनेसचे अनेक व्हिडिओ पोस्ट केले आहे. पण आयुष्यातील दु:ख लपवून तिने तिचे आयुष्य जगण्याचा निर्धार केला आहे. जो ती अगदी योग्य पद्धतीने पार पाडतानाही दिसत आहे. 

ADVERTISEMENT

संभावनाप्रमाणे अनेक जणी या अडचणीतून जात असतील त्यांच्यासाठी संभावना ही नक्कीच आदर्श आहे.

28 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT