ADVERTISEMENT
home / मनोरंजन
स्नेहलता वसईकरला येतेय शाळेची आठवण, झाली भावनिक

स्नेहलता वसईकरला येतेय शाळेची आठवण, झाली भावनिक

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील पुण्यश्लोक अहिल्याबाई ही मालिका राणी अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित आहे, ज्यांनी आपले सासरे मल्हारराव होळकर यांच्या मदतीने समाजातील रुढींचा विरोध करून जनतेच्या आणि विशेषतः स्त्रियांच्या कल्याणासाठी आपले आयुष्य वेचले. अगदी लहापणापासूनच अहिल्या एक जगावेगळी मुलगी होती. तिच्यात स्वप्नं बघण्याची धमक होती आणि समाजातील अन्यायकारक परंपरांचा तिने विरोध केला. सध्याच्या कथानकात आपल्याला बघायला मिळेल की, आपल्या आईवडिलांचा विरोध असतानाही शिक्षण घेण्यास उत्सुक अहिल्येला औपचारिक शिक्षण घेण्याची इच्छा असते. अहिल्येला वाटते की तिला तिचे पती खंडेरावाच्या बरोबरीची वागणूक मिळायला हवी. सध्या मालिकेमध्ये यावर चित्रीकरण करण्यात आले आहे. 

मलायका अरोराने हिऱ्याची अंगठी दाखवल्यामुळे साखरपुडा झाल्याच्या बातम्यांना ऊत

अहिल्याबाईच्या सेटवर येतेय स्नेहलताला शाळेची आठवण

अहिल्याबाईच्या सेटवर येतेय स्नेहलताला शाळेची आठवण

मालिकेत सध्या सुरू असलेला शिक्षणाचा भाग करताना या मालिकेत अहिल्येच्या सासूची म्हणजे गौतमाबाईची भूमिका करणारी अभिनेत्री स्नेहलता वसईकर भावनिक होऊन थेट शालेय दिवसांत पोहोचली. तिने आपल्या शाळेतल्या दिवसांची आठवण काढली, जेव्हा जीवन खूप सोपे आणि साधे होते. याबद्दल अधिक बोलताना स्नेहलता वसईकर म्हणाली, “मला वाटते की शाळेतले दिवस हे आपल्या आयुष्यातले सगळ्यात सुखाचे दिवस असतात. त्या काळात आपण घडत असतो. शाळाच आपल्या व्यक्तिमत्वाला आकार देते, आपली मानसिकता घडवते, आणि जीवनविषयक मूल्ये आपल्यात रुजवते. मालिकेत सध्या सुरू असलेला शिक्षणाचा भाग करताना शालेय जीवनातील असंख्य आठवणींनी माझं मन भरून गेलं आहे. म्हणतात ना, ‘वेळ एका दिशेने प्रवास करतो, आठवणी दुसर्‍या दिशेने!” मला या गोष्टीचा आनंद आहे की, माझ्या आईवडिलांना हे जाणवले होते की, शिक्षण खूप महत्त्वाचे आहे, त्यामुळेच त्यांनी मला अभ्यासात वर येण्यासाठी खूप प्रोत्साहन दिले. मला माझ्या मुलीसाठी देखील तसेच व्हायला हवे आहे. मला वाटते की शिक्षण तुम्हाला एक व्यक्ती म्हणून घडवते आणि जीवनात प्रगतीचा मार्ग दाखवते.”

ADVERTISEMENT

‘मानापमान’ आता रुपेरी पडद्यावर, दिग्दर्शक सुबोध भावेचा नवा चित्रपट

स्नेहलताची भूमिका प्रेक्षकांना भावतेय

स्नेहलताने याआधीही मराठी मालिकेतून ऐतिहासिक भूमिका साकारली होती. आता अहिल्याबाईच्या सासूच्या भूमिकेतही प्रेक्षकांना स्नेहलता भावते आहे. मालिका हिंदी असली तरीही कथा मराठमोळी आहे आणि या मालिकेतील अनेक सहकलाकारही मराठी असल्यामुळेच ही मालिका सध्या खूप गाजते आहे. अहिल्याबाई थोर होत्या आणि त्यांची गाथा ही प्रत्येकापर्यंत पोहचायला हवी याच हेतूने या मालिकेची निर्मिती करण्यात आली. यामध्ये काम करणाऱ्या कलाकारांच्या अभिनयामुळे आणि कथेमुळेही या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. शिक्षण किती महत्वाचे आहे हे यामुळे आजच्या पिढीलाही समजणार आहे. तसंच लहान मुलांच्या मनावरही अशा मालिकांमुळे चांगले परिणाम होताना दिसतात. त्याशिवाय आपला इतिहासही त्यांना कळतो. मालिकेतील इतर कलाकारांसह स्नेहलता वसईकरनेही प्रेक्षकांची आणि चाहत्यांची मनं जिंकून घेतली आहेत हे नक्की. सध्या ही मालिका अत्यंत मनोरंजक वळणावर असून शिक्षणाचे महत्व यामध्ये सांगण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्येकाने पाहावी अशी ही मालिका दर सोमवार ते शुक्रवार 7.30 वाजता पाहता येऊ शकते. 

‘एक नारळ दिलाय’ म्हणत रितेशने शेअर केला हा व्हिडिओ

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
15 Apr 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT