श्वेता तिवारी ही नेहमीच खूप चर्चेत असते. तिच्या खासगी आयुष्यामुळे तिला सतत लाईमलाईटमध्ये राहायची सवय झाली आहे. सुरुवातीला पहिला पती राजा चौधरीमुळे ती चर्चेत आली आणि आता अभिनव कोहली म्हणजेच तिच्या दुसऱ्या पतीमुळे ती चर्चेचा विषय बनली आहे. तिच्या दोन्ही लग्नांमध्ये तिला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळेच ती कायम नेटीझन्सच्या रडारवर असते. सध्या तिच्या एका नव्या व्हिडिओमुळे अनेकांनी तिला तू तिसरे लग्न करणार आहेस का? असा प्रश्न केला आहे. तिला हा प्रश्न विचारत अनेकांनी तिला ट्रोल केले आहे. नेमकं हे प्रकरण काय जाणून घेऊया.
व्हिडिओ पोस्ट केला आणि झाली ट्रोल
श्वेता तिवारीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती आदित्य सिंहसोबत डान्स करताना दिसत आहे. कोणत्यातरी गोष्टीचा आनंद साजरा करण्यासाठी ही दोघं नाचताना दिसत आहे. शिवाय श्वेताने आम्ही आनंदी का आहोत? सांगा असे देखील विचारले आहे. काही जणांनी त्यांना योग्य उत्तर दिली असली तरी याच व्हिडिओखाली खूप जणांनी आता तू तिसरं लग्न करायला तयार झाली आहेस का?, आता याच्यावर काय आरोप लावून तू याला फसवणार? असे काही प्रश्न केले आहेत. ज्यामुळे चांगल्या कमेंट्स कमी आणि तिच्या लग्नाचीच म्हणजे खासगी आयुष्याची चर्चा अधिक रंगलेली दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार श्वेता ही खतरों के खिलाडीच्या फायनल्ससाठी सिलेक्ट झाली आहे. त्यासाठीच या दोघांनी आनंदाचा हा व्हिडिओ शेअर केला आहे.
शंतनू – शर्वरी लग्नसोहळा, मालिकांमधील लग्नसोहळे ठरत आहेत टीआरपीसाठी फायदेशीर
केपटाऊनमध्ये सुरु आहे खतरो कें…
सध्या श्वेता तिवारी ही केपटाऊनमध्ये आहे. खतरो कें खिलाडीचे शुटींग सुरु असून काही एपिसोड्स ही शूट झाले आहेत. सध्या फिनालेचा सगळा खेळ रंगत आहे असे कळत आहे. त्यामुळेच तिने हा हा व्हिडिओ शेअर केला आहे. इतकेच नाही तर श्वेताने या आधी देखील असे काही व्हिडिओ शेअर केलेले आहेत. आदित्य सिंहसोबत तिने काही फोटो या आधीही शेअर केले आहेत. इतकेच नाही तर तिने राहुल वैद्यसोबत आणि सगळ्या टीमसोबतही फोटो शेअर केले आहेत. आदित्यसोबत तिने तिवारी आणि बिहारी असे नाते सांगत फोटो पोस्ट केले आहेत. त्यामुळेच कदाचित त्यांची जवळीकता फोटोजमध्ये अधिक चांगली दिसून येते.
बिग बॉस’ची तयारी सुरु, यंदा 6 महिने चालणार हा रिअॅलिटी शो
अभिनव कोहलीचे आरोप
श्वेता तिवारी केपटाऊनमध्ये आनंद साजरा करत असली तरी देखील तिचे खासगी आयुष्य फार काही चांगले आहे असे दिसून येत नाही. पहिला पती राजा चौधरीची तिला असलेली मारहाण आणि त्यानंतर त्यांचे बिनसलेले नाते सगळ्यांना माहीत होते. पण अभिनव कोहलीशी दुसरं लग्न करणारी श्वेता आनंदी होती. पण अचानक तिचे अभिनव कोहलीशी जमेनाशे झाले अशी बातमी आली. श्वेताची मोठी मुलगी पलक हिने अभिनववर छेडछाडीचे आरोप लावले त्यानंतर अभिनव कोहलीला श्वेताने घरातून काढून टाकले. शिवाय त्यांचा मुलगा रेयांश याला भेटण्यासही नकार दिला. त्यामुळेच की काय श्वेता तिवारी ही पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली. केपटाऊनला येण्याआधी श्वेताने मुलाला कुठे ठेवले हे अभिनवला सांगितले नाही याचा राग अभिनवने सोशल मीडियावर व्यक्त करुन दाखवला.अभिनव कोहली हा सतत काहीतरी व्हिडिओ करुन याबद्दल तक्रार करत असतो. पण त्याचे कोणीच ऐकत नाही अशी त्याची अवस्था झाली आहे.
दरम्यान, श्वेताने साधारण चार दिवसांपूर्वी शेअर केलेल्या व्हिडिओची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
अखेर प्रतीक्षा संपली, ‘समांतर’ चा तुफान ट्रेलर प्रदर्शित