ADVERTISEMENT
home / मनोरंजन
अभिनेत्री स्मिता तांबेच्या अभिनयाची नवी भरारी

अभिनेत्री स्मिता तांबेच्या अभिनयाची नवी भरारी

सध्या सिनेरसिकांना लवकरच गोव्यामध्ये सुरू होणा-या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (इफी)चे वेध लागलेत. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं यंदाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. या सुवर्ण महोत्सवी वर्षात जगभरातल्या निवडक उत्तमोत्तम कलाकृती रसिकांना पाहायला मिळणार आहेत. इफीमधल्या ‘इंडियन पॅनोरमा’ सेक्शनमधल्या ‘नॉन फिचर फिल्म’ विभागात अभिनेत्री स्मिता तांबेच्या ‘गढूळ’ चित्रपटाची निवड झाली आहे.

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाशी स्मिता तांबेचा ऋणानुबंध तसा जुना आहे. स्मिताची ही चौथी कलाकृती आहे, जी इफीमध्ये दाखवली जाणार आहे. या अगोदर स्मिताचा धूसर, रूख, पांगिरा या सिनेमांचीही इफीमध्ये वर्णी लागली होती

ADVERTISEMENT

इफी आणि स्मिताचं नातं

इफी या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाविषयी स्मिता तांबे सांगते की, “पहिल्यांदा मी इफीमध्ये जेव्हा सहभागी झाले होते. तेव्हा या चित्रपट महोत्सवाच्या भव्यतेविषयी मला कल्पना नव्हती. पण लवकरच मला हा महोत्सव म्हणजे सिनेरसिकांची पंढरी असल्याचे जाणवले. जगभरातल्या फिल्ममेकर्स आणि कलावंताना भेटण्याची संधी या चित्रपट महोत्सवातून मिळते. भारतातल्या नामांकीत सिनेमहोत्सवांमध्ये प्रतिष्ठेचा मानला जाणारा इफी हा चित्रपट महोत्सव आहे. त्यामुळे आपल्या सिनेमाचं या फेस्टीवलमध्ये सिलेक्शन होणं, ही एक कौतुकाची थाप असते. त्यामुळे ‘गढूळ’चं सिलेक्शन होणं ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.”

नात्यांवर भाष्य करणारी – गढूळ

या महोत्सवाता निवड झालेल्या गढूळ सिनेमाविषयी स्मिता सांगते की, “जेव्हा नातेसंबंधांमध्ये गोष्टी गढूळ होतात, तेव्हा तुमच्या अचार-विचारातली पारदर्शकता हरवत जाते, ही या कथानकामागची कल्पना मला आवडली. गणेश शेलार या नवोदित दिग्दर्शकांमध्ये फिल्ममेकिंगची योग्य जाण असल्याने या फिल्मवर काम करतानाचा अनुभव अविस्मरणीय होता.”

गढूळमधील एक प्रसंग

पुलावरून पवना नदीचे वाहते पाणी बघताना दुर्वानं अचानक विचारलेले प्रश्न, “‘पप्पा नदीचं पाणी कसं गढूळ आहे, ते नेहमी असं गढूळच का असतं? आपल्याला हेच पाणी पिण्यासाठी येतं ना? मग ते स्वच्छ का नसतं?”‘ तिचे अचानक आलेले प्रश्न म्हणजे माझी नेहमीची फजिती. विषय बदलण्यासाठी पाण्यातील भवऱ्याकडे बोट दाखवत मी म्हटलं, “थांब जरा… बघ तो छोटूसा भवरा कसा आवाज करतोय.” पुन्हा तोच प्रश्न, “‘नदीचं पाणी गढूळ का असतं?”‘ आता उत्तर द्यावेच लागणार… मी म्हटलं, “बघ जसं तू घरी वॉटर कलर करताना पाण्यात पिंक कलर मिक्स करतेस तेव्हा काय होतं… पाणी गुलाबी रंगाचं बनतं कि नाही? सेम तोच प्रकार आहे सगळीकडे… ते ज्या ठिकाणी जातं तिथल्या रंगाशी आणि परिस्थितीशी एकरूप होतं. स्विमिंग पूल मध्ये ते निळं बनतं तर मातीबरोबर फिरताना गढूळ. पण ते गढूळ कधीच नसतं, आपल्याला त्याचा कुठलाही रंग दिसत असला तरी असंख्य जीवांसाठी ते अमृत असतं. पाणी हे जीवन असतं, ते नेहमीच निर्मळ असतं अगदी आपल्या मनासारखं. जसं मनामध्ये द्वेष मिसळला कि ते दूषित बनतं, त्यात राग मिसळला कि ते रागीट बनतं आणि प्रेमबरोबर ते प्रेमळ बनतं अगदी तसंच. मनावर जसा इतरांचा प्रभाव पडतो, तसंच पाणीही प्रभावित होतं आणि आपल्याला ते तसं दिसतं.” तिच्या डोळ्यांतील नवीन प्रश्न मला तर नेहमीचेच. मग काय तिचं लक्ष भेदण्यासाठी पुन्हा त्या पाण्यातल्या भवऱ्याकडे बोट दाखवत विषय बदलला, आता त्या झर्झरत्या शुभ्र पाण्यात आम्हाला दूध दिसू लागले, त्याच्याच पुढे दुर्वानं चहा शोधला आणि अलीकडं उसाचा रसही तिला सापडला. “‘पप्पा तो उसाचा रस कसा काळा पडलाय, लिंबू टाकायला विसरले वाटतं ते.”‘
मी म्हटलं, “हो कदाचित बराच वेळ झाला असेल रस काढून, चल आता घरी जाऊ या. तुला रस हवाय का चहा?”
“‘मला उसाचा रस.”‘ मी लगेच हवेत ट्रे ड्रॉ केला आणि तिनं दोन ग्लास. मी अलगद नदीतल्या उसाच्या रसाने ग्लास ग्लास भरले आणि दोघांनीही ते क्षणात फस्त केले. “आता काय?”
“‘चहा बाकी आहे आणि दूधही”‘ असं म्हणत तिनं चटकन हवेत ड्रॉ दोन कप केले. माझ्या हातात एक कप देत, “‘तुझ्यासाठी चहा आणि मला दूध. मग आपण घरी जाऊया, मम्मीसाठी चहा बरोबर घेऊन.”‘

ADVERTISEMENT

सौजन्य : नितेश दुर्वा इंस्टाग्राम 

स्मिताचा बहारदार अभिनय

स्मितासाठी हे वर्ष खूपच चांगलं ठरलं आहे. मग ते तिचं नाटक ईडियट्स असो हिंदी चित्रपटातील भूमिका सिंघम 2 असो वा वेबसीरिज सेक्रेड गेम्स 2, माय नेम इज शीला असो. अगदी निर्माती म्हणूनही तिने सावट या चित्रपटाची यंदा निर्मिती केली आहे. दिवसेंदिवस स्मिताचा अभिनय अजून चांगला होत आहे.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

ADVERTISEMENT

हेही वाचा –

स्मिता पाटील यांची ‘ही’ गोष्ट अमृतासाठी आहे खास

सबकुछ स्मिता तांबे असलेला ‘सावट’

07 Nov 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT