ADVERTISEMENT
home / Uncategorized
actress-snehlata-vasaikar-gives-beffitting-reply-to-trollers-by-sharing-these-bold-photos-in-marathi

अभिनेत्री स्नेहलता वसईकरचे ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

आपल्याकडे सहसा ऐतिहासिक भूमिका केल्यानंतर कलाकारांना त्याच एका भूमिकेतून पाहिले जाते. पण त्यामुळे काम करणाऱ्या कलाकारांचे मात्र नुकसान होते. आतापर्यंत अनेक ऐतिहासिक भूमिकेतून अभिनेत्री स्नेहलता वसईकर (Snehlata Vasaikar) प्रेक्षकांच्या समोर आली आहे. मात्र तीदेखील एक वेगळी व्यक्ती आहे आणि तिचं वैयक्तिक आयुष्य वेगळं आहे हे समजून न घेता, तिने बोल्ड कपडे घातल्यानंतर तिला ट्रोल केले जाते. त्यामुळे आता स्नेहलताने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर वेगवेगळे फोटो पोस्ट करत जबरदस्त कॅप्शन देत ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले आहे. त्यामुळे स्नेहलताचे सध्या कौतुक होत आहे. 

काय म्हणाली स्नेहलता 

स्नेहलताने अनेक मालिकांमधून काम केले आहे आणि आता स्नेहलताने काही महत्त्वाचा विषय मांडत आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो पोस्ट करत ट्रोलर्सने तोंड बंद करण्यासाठी एक मोठी कॅप्शन दिली आहे. काय म्हणाली स्नेहलता पाहूया – 

Caption ऐवजी आज हे नक्की वाचा…

नमस्कार मी स्नेहलता वसईकर, अर्थातच अभिनेत्री असल्यामुळे वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून मी आपल्या समोर येतं असते. माझ्या प्रत्येक भूमिकेवर मायबाप रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं… काही चुकलं तर समजूनही घेतलंत. ऐतिहासिक भूमिकांपासून मॉडर्न भूमिका असा प्रवास केला. प्रत्येक भूमिकेतून, अनुभवांमधून खूप गोष्टी शिकले. अजूनही वैविध्यपूर्ण भूमिका साकारायच्या आहेत, त्यातूनही अनेक गोष्टी शिकायच्या आहेत…. पण काय सांगू…? हे ट्रोलर्स….

ADVERTISEMENT

(पोस्ट मधील पहिला फोटो),
कधी-कधी असंच कमरेवर हात ठेऊन या ट्रोलर्सबरोबर भांडव असं वाटतंय… त्यांना सांगावस वाटतं, तुमच्यावरील ‘संस्कार’ तुमच्या कपड्यांवरून नाही तर तुमच्या विचारांमधून कळतात. थोरा-मोठ्यांचे गुण आपल्या अंगी उतरवायचे असतात, त्यातील अनेक गोष्टी आपल्या आचरणात आणायच्या असतात…
एवढं सगळं बोलूनही ‘ट्रोलर्स’ना मात्र काही कळणार नाही, न त्यांच्या वागण्या-बोलण्यात, सोशल मीडियावर व्यक्त होण्यात काही बदल होणारं आहे. याउलट त्यांच्या चुकीच्या वक्तव्याचा, कमेंट्सचं ते समर्थन आणि काही जण त्यांची पाठराखण करतात…

म्हणून (हा दुसरा फोटो),
त्यांच्यात न झालेला बदल पाहून, ‘पालथ्या घड्यावर पाणी…’ म्हणत स्वतःचं डोक्यावर हात मारून घ्यावासा वाटतो…
कलाकार हा आशावादी सुद्धा असतो. ‘मी एक कलाकार आहे आणि माझं एक खाजगी आयुष्य सुद्धा आहे तुम्ही समजून घ्याल’, अशी आशा करते. ऐतिहासिक मालिकेमधून भूमिका साकारताना त्या व्यक्तिरेखेशी प्रामाणिक राहण्याचा पूर्ण प्रयत्न असतो आणि ते थोर व्यक्तिमत्व म्हणजे आपण नव्हे याचं भानही… आम्ही कलाकार फक्त निमित्तमात्र असतो. जर अशा भूमिका साकारल्यानंतर त्या थोर व्यक्तिमत्त्वांचा जागी आम्हाला नेऊन बसवत असाल तर त्या थोर व्यक्तिमत्त्वांचा याहून मोठा अपमान काहीच नसेल…. पुन्हा सांगते मी रील आणि रियल लाईफ ही वेगवेगळी ठेवणच पसंत करते
.

म्हणून (हा तिसरा फोटो)
हाताची घडी घालून निवांत…..
तुम्हा मायबाप प्रेक्षकांना माझी बाजू समजावून सांगण्याची तशी फार गरज नाही हे मला ठाऊक आहे… फक्त, आम्ही कलाकारही माणूस असतो…. वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी भुकेलेला…

तुमचीच,
स्नेहलता वसईकर

ADVERTISEMENT

कमेंट्सचा वर्षाव

स्नेहलताने हे फोटो पोस्ट केल्यानंतर तिला अनेकांनी पाठिंबा दिला आहे. अनेकांनी तिच्या या पोस्टचे कौतुक केले आहे. मुख्य म्हणजे मराठी भाषिक नसणाऱ्या तिच्या चाहत्यांसाठीही तिने हिंदीमध्ये पोस्ट केले आहे. त्यामुळे तिला नक्की काय म्हणायचं आहे हे तिने उत्तमरित्या पोहचविण्याचा प्रयत्न केल्याचे या पोस्टमध्ये दिसून येत आहे. अशाच अन्य कलाकारांनाही ट्रोर्लना किमान पुन्हा सामोरे जावे लागू नये आणि प्रेक्षकांनीही कलाकारांचा विचार करावा हेच यातून दिसून येत आहे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

27 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT