वाढदिवसाच्या दिवशी स्पेशल गिफ्ट मिळावे असे प्रत्येकाला वाटते. अगदी तसेच काहीसे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोबत झाले आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी फायनली मिसेस झाली आहे. वाढदिवसाचे निमित्त साधत ती विवाहबंधनात अडकली असून तिचे काही फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. इतकेच नाही तर या कोरोना काळात सेलिब्रिटी असूनही तिने अवघ्या 15 मिनिटांत आपला विवाहसोहळा पार पाडला आहे. अत्यंत साधेपणाने आणि एक जबाबदार नागरीक बनत तिने आपला लग्नसोहळा आटोपला आहे. जाणून घेऊया या विषयी अधिक
15 मिनिटात केले लग्न
सध्या कोरोनाच्या लाटेमुळे कोणालाच लग्नसोहळा हा कोणालाच करता येत नाही. सोनाली कुलकर्णी हिने तिचा विवाहसोहळा जून महिन्यात करण्याचे योजले होते. पण युकेमध्ये कोरोनाची दुसरी लाट येणार म्हटल्यावर पुन्हा हा लग्नसोहळा करता येणे शक्य नसल्यामुळे तिने जून महिन्याऐवजी आताच लग्न करण्याचा निर्णय घेतला तिने ही माहिती स्वत: च तिच्या चाहत्यांना दिली आहे. तिने एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. तिने तिचे काही फोटोही शेअर केले आहे. दुबईच्या हिंदू मंदिरात तिचा हा विवाहसोहळा पार पडला आहे. तिच्या लग्नासाठी काही मोजकीच माणसे उपस्थित असलेली दिसत आहे. शिवाय तिने काही जवळच्या माणसांसोबत ऑनलाईन पद्धतीने संवाद साधलेला देखील दिसत आहे. तिच्या या फोटोजना खूप लाईक्स मिळत आहे. शिवाय वाढदिवसाच्या दिवशी अशा पद्धतीने गिफ्ट मिळाल्यामुळेही अनेकांनी तिचे कौतुक केले आहे.
अभिनेत्री पल्लवी जोशी आणि विवेक अग्निहोत्रींचा कोव्हिड-19 पीडित मुलांना दत्तक घेण्यास पुढाकार
लग्नाला नेसली निळी साडी
आता सेलिब्रिटी लग्न म्हटली की, त्यांचा लग्नातील लुक हा अगदी आलाच. लग्नासाठी सोनाली कुलकर्णीने साडी नेसली आहे. तिने निळ्या रंगाची साडी परिधान केली असून त्यावर कॉन्स्टारस्ट गुलाबी रंगाचा ब्लाऊज घातला आहे. या साडीमध्ये ती खूपच सुंदर दिसतेय. इतकेच नाही तिने लग्नासाठ केलेली हेअरस्टाईलही फार साधी पण तितकीच सुंदर आहे. तर तिचा जीवनसाथी कुणाल बेनोडेकर याने देखील तिला मॅचिंग असा अटायर केला आहे. त्याने निळ्या रंगाचा कुडता घातला असून त्यामध्ये तो खूपच जास्त उठून दिसत आहे. तिचा हा साधा आणि सोबर लुकही तिच्यावर फारच खुलून आला आहे.
घरी बसून कंटाळला असाल तर कुटुंबासोबत पाहा या सीरिज
आणि अडकली दुबईत
कोरोनाच्या पहिल्या लाटेच्यावेळी सोनाली कुलकर्णी ही युकेमध्ये अडकली होती. त्यावेळी तिने या काळात आपला साखरपुडा आटपून घेतला होता. तिने युकेमध्ये अगदी घरच्या घरी हा सोहळा उरकला. विमानसेवा पूर्ववत झाल्यावर ती भारतात परतली पण त्यानंतर आाता पुन्हा एकदा ती दुबईत अडकली आहे. तिने तिचा एक नवा फोटो शेअर करताना आता दुबईत अडकली आहे पण लग्नबंधनातही हे सांगायला देखील ती अजिाबात विसरलेली नाही. त्यामुळे तिची कॅप्शनही फारच चर्चेत आहे.
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचं ‘लॉकडाऊन लग्न’, सोशल मीडियावर चर्चा
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने अत्यंत साधेपणाने हा लग्नसोहळा केल्यामुळे आता अनेकांपुढे हा नवा आदर्श नक्कीच चांगला आहे.