ADVERTISEMENT
home / मनोरंजन
‘भाबीजी घर पर है’ फेम अभिनेत्री सौम्‍या टंडनच्या घरी लागली होती आग

‘भाबीजी घर पर है’ फेम अभिनेत्री सौम्‍या टंडनच्या घरी लागली होती आग

टीव्हीवरचा प्रसिद्ध शो ‘भाबीजी घर पर हैं’ (Bhabi ji ghar par hain) ची प्रसिद्ध अभिनेत्री गोरी मेम अनिता भाभी म्हणजेच सौम्‍या टंडन (saumya tandon) च्या घरी आग लागल्याची घटना घडली. या घटनेत काळ आला होता पण वेळ आली नव्हती या म्हणीप्रमाणे सौम्या आणि तिचे कुटुंबीय बचावले. या घटनेबाबतची माहिती स्वतः सौम्याने तिच्या ट्वीटर अकाऊंटवरून फॅन्सना दिली. मात्र या घटनेत सौम्याला थोडी जखम झाल्याचं कळतंय.

सौम्याने या घटनेचे फोटो ट्वीटर पोस्ट करत लिहीले की, ‘माझ्या घरी आग लागली होती. या घटनेतून मला तीन गोष्टी शिकायला मिळाल्या. पहिली म्हणजे बेडच्या जवळ कधीही मच्छर मारण्याची लिक्वीड मशीन लावून झोपू नये. जर लिक्वीड संपल असेल तर स्विच ऑन ठेऊ नये. दुसरी गोष्ट म्हणजे कधी कोणत्याही प्लगचं कनेक्शन लूज असू नये आणि तिसरी गोष्ट म्हणजे आग विझवण्याच्या उपकरणांचा वापर करा. ते खरीदे करून घरात ठेवा आणि वापरायला शिका.

दुसऱ्या ट्वीटमध्ये सौम्याने लिहीलं आहे की, एवढ्या सगळ्या चूका, इतक्या घाईत झाल्या. यानंतर सौम्याच्या ट्वीटवर फॅन्सनी तिच्या कुटुंबियांच्या चौकशी करत काळजीही व्यक्त केली. त्यावर सौम्याने सांगितलं की, या घटनेत घराचं नुकसान झालं असलं तरी घरातले सर्वजण सुरक्षित आहेत.

47690272 322444788481706 3006202869572917901 n
सौम्याला ओळख मिळाली ती ‘भाभी जी घर पर है’ या विनोदी सिरीयलमुळे. या सिरीयलमध्ये गोरी मेम नावाने प्रसिद्ध आहे.

ADVERTISEMENT

सौम्या टंडनने 14 जानेवारीलाच तिच्या मुलाला जन्म दिला आहे. सौम्याने तिच्या मुलाचा फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केला होता.

तसंच नुकतंच तिने मुलाचं नावही रिव्हील केलं होतं. सौम्याने आपल्या मुलाचं नाव ‘मिरान’ ठेवलं आहे.

आपल्या प्रेग्नंसीमुळे तिने सीरियलमधून ब्रेक घेतला होता पण अशी बातमी आहे की, सौम्या लवकरच या शोमध्ये पुन्हा एंट्री करणार आहे.

फोटो सौजन्य – Instagram

ADVERTISEMENT
21 Feb 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT