अभिनेत्री सुरभी हांडेने (Surbhi Hande) ऐतिहासिक मालिकेतूनच आपल्या करिअरची सुरूवात केली आणि आता पुन्हा सुरभी देवी सप्तश्रृंगीच्या भूमिकेत दिसणार आहे. सोनी मराठी वाहिनी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच नवनाथांवर ‘गाथा नवनाथांची’ ही मालिका घेऊन आली आहे आणि ती प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरते आहे. कलियुगात जेव्हा मनुष्यावर असुरी शक्ती वरचढ होऊ लागली, तेव्हा नवनारायणांनी मनुष्यकल्याणासाठी नवनाथांच्या रूपात अवतार घेतला. याच गोष्टींवर आधारित ही मालिका आहे आणि आता प्रेक्षकांसाठी नवी पर्वणी म्हणजे त्यांची आवडती कलाकार सुरभी आता या मालिकेतून रोज त्यांना दिसणार आहे. म्हाळसाच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेली सुरभी आता सप्तश्रृंगीच्या भूमिकेतूनदेखील प्रेक्षकांची मने जिंकेल असा विश्वास तिच्या चाहत्यांना आहे.
‘गाथा नवनाथांची’ मालिकेतून नाथांचा महिमा प्रेक्षकांच्या भेटीला!
सुरभी पुन्हा एकदा चाहत्यांचे मन जिंकण्यास सज्ज
आत्तापर्यंत गोष्टींच्या स्वरूपात वाचलेल्या किंवा ऐकलेल्या कथा ‘गाथा नवनाथांची’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्या कथांपैकी आता येत्या काही भागांत सर्वश्रुत असलेली मछिंद्रनाथ आणि देवी सप्तशृंगी यांची भेट पाहायला मिळणार आहे. नाथपंथामध्ये सप्तशृंगी देवीला विशेष स्थान आहे. सप्तशृंगी देवीच्या आशीर्वादाने मच्छिन्द्रनाथांच्या आयुष्याचा नवीन अध्याय सुरू होत असल्याची ही महत्त्वाची घटना आता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मालिकेत सप्तशृंगी देवीची भूमिका सुरभी हांडे ही प्रसिद्ध अभिनेत्री साकारणार आहे. सुरभीने याआधीही पौराणिक आणि सामाजिक विषय असलेल्या मालिकांमध्ये काम करून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. मोठ्या विश्रांतीनंतर या भूमिकेच्या माध्यमातून ती टेलिव्हिजनवर पुनरागमन करते आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना नक्कीच अत्यानंद झाला आहे. सुरभी आता या भूमिकेतून पुन्हा एकदा रोज दिसणार आहे. याआधीही पौराणिक स्वरूपाच्या मालिकेत काम केल्यामुळे सुरभीला याचा चांगलाच अनुभव आहे. त्यामुळे तिचा सहजसुंदर अभिनय पाहायला मिळणार यापेक्षा अधिक सुख ते काय अशीच स्थिती तिच्या चाहत्यांची झाली आहे.
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर करिना कपूर पुन्हा झाली तख्तच्या शूटिंगसाठी सज्ज
गाथा नवनाथांची प्रेक्षकांच्या पसंतीला
मच्छिन्द्रनाथांच्या जन्माची कथा सर्वश्रुत असली, तरी त्यांच्या बालपणाबद्दलची माहिती फार लोकांना नाही. त्यांचं बालपण, संगोपन अशा गोष्टी मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. मालिकेच्या टीमने त्यासाठी सखोल अभ्यास केला आहे. या मालिकेतून नवनाथांचा महिमा महाराष्ट्राच्या घराघरांत आता पोचत आहे. ही पौराणिक मालिका असून त्या काळाला साजेसे नेपथ्य, कलाकारांचे पेहराव हे भव्यदिव्य आणि पारंपरिक करण्यात आले आहेत. अशा प्रकारची पौराणिक मालिका करणं, हे आव्हानात्मक असणार आहे. काही प्रसंग दाखवण्यासाठी व्हीएफएक्स या तंत्रज्ञानाची मदत घेतली गेली आहे. मराठीत व्हीएफएक्सचा वापर फार कमी प्रमाणात केला जातो. त्यामुळे या मालिकेतील व्हीएफएक्स हा एक महत्त्वपूर्ण आणि विशेष मुद्दा आहे. नवनाथ कथासार वाचल्याने प्रत्येक माणसाला आयुष्यात काय करू नये आणि मनुष्य जन्म कसा घालवावा याचे सार कळते. दत्तगुरू संप्रदायातील नवनाथ हे प्रसिद्ध आहेत आणि आजही त्यांनी दिलेली शिकवण पाळणारे, त्यांचा वारसा जपणारे लोक आहेत. अशाच नवनाथांच्या कथा आता प्रेक्षक पाहू शकणार आहेत. तसंच मुलांनाही यातून चांगली शिकवण मिळणार आहे. तर आता सुरभीच्या येण्याने यामध्ये अजून चार चाँद लागले आहेत असंच म्हणावे लागेल.
दयाबेनची रिप्लेसमेंट नाही पण सध्या ही दयाबेन होतेय हिट
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक