ADVERTISEMENT
home / मनोरंजन
स्वरा भास्कर जीवे मारण्याची धमकी

आता स्वरा भास्करलाही आली जीवे मारण्याची धमकी

 सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर सगळा देश हादरुन गेला होता. अशा प्रकारे केवळ टोळीच्या वादामुळे झालेली हत्या आणि त्यानंतर सलमान खानला मिळालेली मारण्याची धमकी यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सेलिब्रिटींवर अनेकांची नजर आहे. सलमान खानला धमकी आल्यानंतर सलमान आणि त्याचे वडील सलीम खान यांच्या सुरक्षेसाठी सगळे तैनात असताना आता आणखी एका सेलिब्रिटीला जीवे मारण्याची धमकी आली आहे. ही धमकी अभिनेत्री स्वरा भास्करला आली असून तिला पोस्टावाटे ही धमकी आल्याचे कळत आहे. 

स्वरा भास्करला मिळाली धमकी

स्वरा भास्कर ही नेहमी तिच्या कमेंट आणि पोस्टसाठी चर्चेत असते. तिची विधान ही नेहमी वादग्रस्त असतात. त्यामुळे ती सतत चर्चेत असते. 2017 साली तिने सावरकरांसंदर्भात वादग्रस्त पोस्ट केली होती. तिने एक पोस्ट लिहिली होती. त्यामध्ये तिने म्हटले की, सावकरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली होती. तुरुंगातून सुटण्यासाठी त्यानी गयावया केली होती. त्यामुळे ते शूर नव्हते. 2019 मध्ये स्वराने देखील असाच व्हिडिओ शेअर केला होता. त्यावेळीही वाद निर्माण झाला होता आणि आता पुन्हा एकदा धमकी मिळाल्यामुळे त्या जुन्या वादाची आठवण झाली आहे. स्वराला मिळालेली ही धमकी हिंदीत असून काही दिवसांपूर्वी हे पत्र देखील व्हायरल झाले होते.  हे पत्र तिला हिंदीत मिळाले होते. यात तिला मारण्याची धमकी देण्यात आली असल्यामुळे तिच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. इतकेच नाही तर अनेकांनी तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा याच जन्मात मिळणार असे सांगून ट्रोलही केले आहे. 

कायम असते वादात

स्वराशी वाद हा कायम जोडलेला आहे. कारण ती कायमच अशा पद्धतीने वादग्रस्त विधानं करत असते. हिंदूची मने दुखावतील अशा प्रकारची विधान केल्यामुळे तिच्याकडे अनेकांचे लक्ष जाते. पब्लिसिटीसाठी ती असे करत असावी असे अनेकांना वाटते.  कारण ती कायमच देशाच्या स्वाभिमानाला धक्का पोहोचल अशाच काही कमेंट करत असते. तिच्या करिअरपेक्षाही तिची सगळ्यात जास्त चर्चा तिच्या या वादग्रस्त विधानांची होत असते.

करिअरही चांगले

स्वरा भास्करने आतापर्यंत खूप लिमिटेड अशी काम केली आहेत असे म्हणायला हवे.  तिने ज्या भूमिका केल्या आहेत त्या आतापर्यंत दमदार अशा भूमिका आहेत. पण तिच्या भूमिंकांची किंवा अभिनयाची चर्चा फारशी होताना दिसत नाही. स्वरा भास्कर नुकतीच कोरमा या चित्रपटा दिसली होती. त्यातही तिचा रोल हा चांगला आणि वाखाणण्यासारखा होता. तिच्या भूमिका या कायम वेगळ्याच असतात.

ADVERTISEMENT

 दरम्यान आता या नव्या धमकीनंत स्वरा भास्कर अशी विधान करणे थांबवते की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

30 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT