आदिनाथ -उर्मिलाच्या नात्यात आलेल्या दुराव्यामुळे सध्या उर्मिला चर्चेत असते. पण आता आणखी एका कारणामुळे ती चर्चेत आली आहे. तिची टीव्हीवर सुरु असलेली मालिका ‘तुझेच मी गीत आहे ’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी उर्मिला या मालिकेतून एक्झिट घेणार असल्याचे कळत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या मालिकेतून उर्मिलाच्या पात्राचा मृत्यू झाल्याचे दाखवण्यात आले आहे. हे कारण जरी देण्यात आले असले तरी उर्मिलाने कौटुंबिक वादातून तर हा निर्णय घेतला नाही ना? असे देखील म्हटले जात आहे. चला जाणून घेऊया या मालिकेविषयी आणि उर्मिलाच्या खासगी आयुष्याविषयी
उर्मिलाच्या पात्राचा मृत्यू
तुझेच मी गीत गात आहे ही मालिका अल्पावधीतच प्रसिद्ध झाली आहे. आई- मुलीचे नाते पाहून खूप जणांना ही मालिका आवडू लागली आहे. मालिकेत वैदेही ही भूमिका उर्मिला कोठारे साकारत आहे. मालिकेत वैदेही आपल्या मुलीचा एकट्याने सांभाळ करत आहे.तिची मुलगी गायिका असून तिचा प्रवास यात दाखवण्यात येणार आहे. ही मालिका काही इमोशनल अशा गोष्टींनी भरलेली आहे. आता या मालिकेत एक ट्विस्ट दाखवण्यात आला आहे. यात वैदेहीला कॅन्सर झाल्याचे दाखवण्यात आले आहे. तिच्या उपचारासाठी पैसे नसल्यामुळे उपचाराअभावी तिचा मृत्यू होतोय असे या मालिकेत दाखवण्यात आले आहे. त्यामुळे आता या पुढे मालिकेत कदाचित उर्मिला दिसणार नाही हे नक्की! यामुळे अनेकांचा हिरमोडही झाला आहे.
यात असेल का ट्विस्ट
मालिकेत जरी उर्मिलाचा मृत्यू दाखवण्यात आला असला तरी देखील यामध्येही काही ट्विस्ट असेल का अशी शंका आहे. कारण अनेकदा प्रोमो हे फसवणारे असतात. आता ही एक्झिट खरी आहे का? रंगवण्यात आलेली आहे हे कळायला मालिकेचे थोडे भाग पुढे जाणे गरजेचे आहे. जर यामध्ये ट्विस्ट असेल तर काहीच हरकत नाही. पण उर्मिलाची एक्झिट अनेकांना नक्कीच आवडणारी नसेल.
आदिनाथ- उर्मिलामध्ये बिनसलेले
आदिनाथ (Adinath Kothare) आणि उर्मिलामध्ये गेल्या काही वर्षांपासून काहीच आलबेल नाही असे सांगितले जात आहे. त्यांच्यात काहीतरी बिनसलंय. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट पाहता उर्मिला त्याच्यासोबत असलेेले एकही फोटो सध्या शेअर करत नाही.आदिनाथ चंद्रमुखी या चित्रपटात होता. या चित्रपटाचे प्रमोशन जोरदार करण्यात आले. पण या एकाही प्रमोशनदरम्यान उर्मिला दिसली नाही. इतकेच काय तर तिने साध्या शुभेच्छाही दिले नाहीत. हे असे सगळे सुरु असताना त्यांच्या नात्यात बिनसलेलेे आहे हे स्पष्ट आहे. पण तरीदेखील आदिनाथने नात्याविषयी स्पष्टीकरण देताना कामात व्यस्त असल्याचे सांगितले होते. पण हे कारण काहीही झाले तरी पटण्यासारखे नव्हते. आदिनाथ काहीतरी खोटं बोलतोय हे यावरुन स्पष्ट आहे. त्यांच्या संदर्भातील अशा बऱ्याच गोष्टी समोर आल्या आहेत की, ज्यामुळे लोकांना अजूनही त्यांच्या नात्याबद्दल शंका निर्माण झाली आहे. उर्मिलाचे इन्स्टाग्राम पाहता ती सध्या आपला सगळा वेळ तिच्या मैत्रिणींसोबत घालवताना दिसते. इतकेच नाही तर ती तिच्या घराचेही कमीच फोटो पोस्ट करते. आता चाहत्यांना त्यांचे नाते पूर्वीसारखे व्हावे अशीच इच्छा आहे.
दरम्यान मालिकेतून वैदेही अर्थात उर्मिलाची एक्झिट नक्कीच रडवणारी असणार आहे.