ADVERTISEMENT
home / मनोरंजन
varsha_usgaonkar_fb

सुख म्हणजे नक्की काय असतं’, मालिकेतून या अभिनेत्रीने घेतला ब्रेक

 मराठीत अल्पावधीत प्रसिद्ध झालेली सुख म्हणजे नक्की काय असतं?  या मालिकेतील अनेक पात्रे लोकांच्या मनात बसलेली आहे. यातील लीड रोल साकारणारी जोडी म्हणजे गौरी आणि जयदीप हे तर लोकांना आवडतातच. पण यासोबतच लोकांना आवडणारी माई गेल्या काही दिवसांपासून मालिकेत दिसत नाही. माईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री वर्षा उसगावकर (Varsha Usgaonkar) यांनी मालिका सोडली अशा चर्चा रंगत होत्या. पण त्यांनी मालिका का सोडली हे काही केल्या कळत नव्हते.  पण आता या मागचे कारण समोर आलेले आहे. जाणून घेऊया या विषयी अधिक

या कारणासाठी मालिकेतून आहे दूर

कोरोनाच्या काळात नाटकं ही पूर्णपणे बंद झाली होती. आता कुठे नाटकांंचे प्रयोग पुन्हा एकदा सुरु झाले आहेत. अनेक नाटकांचे दौरे सुरु झाले आहेत. संकर्षण कऱ्हाडे दिग्दर्शित ‘सारखं काहीतरी होतंय’ या नाटकाचे प्रयोग सुरु झाले आहेत. या नाटकात वर्षा उसगावकर देखील आहेत. या नाटकाची रंगीत तालिम सुरु म्हणून मालिकेपासून दूर आहेत असा विचार करत असाल तर असे अजिबात नाही. तर या नाटकाचा प्रयोग लंडन येथे होणार आहे. या प्रयोगामुळेच त्यांना काही दिवस मालिकेपासून दूर राहावे लागणार आहे. वर्षा उसगावकर यांचा टीमसोबतचा एक फोटो देखील सोशल मीडियावर टाकण्यात आला होता. प्रशांत दामले यांनीसुद्धा एक फोटो शेअर केला होता. त्यामुले वर्षा उसगावकर यांनी मालिका सोडली नाही तर या मालिकेत काही काळासाठी दिसणार नाही हे नक्की!

काही काळासाठी घेतला ब्रेक

मालिकेतून ब्रेक घेण्याचे कारण ही खास होते कारण लंडनमध्ये जिथे प्रयोग होता. ते ठिकाणं फार जुने आहे आणि तिथे मराठी नाटकाचा प्रयोग होणे हे खूपच जास्त मानाचे असल्यामुळे हा नाटकाचा प्रयोग तिथे होणे टीमसाठी खूपच जास्त महत्वाचे होते. मालिकेच्या पुढील भागांचे शूटिंग हे आधीच झालेले असते.  काही दिवसांचे भाग हे आधीच शूट होतात. त्यामुळे आता जर त्यात काही गॅप झाला असेल तर आता लंडनमधून परतल्यानंतर त्या पुन्हा एकदा शूट करणार आहेत.

मराठीतील प्रसिद्ध चेहरा

वर्षा उसगावकर ( Varsha Usgaonkar) या  मराठीतील प्रसिद्ध असा चेहरा आहे. सौंदर्यासोबतच उत्तम अभिनय ही त्यांची ओळख आहे.  त्यांनी अनेक मराठी चित्रपट, मालिका यांमधून काम केले आहे. आजही त्या एव्हरग्रीन दिसतात. त्यामुळेच त्यांची प्रसिद्धी आजही अगदी तशीच आहे. आजही अनेक मॅक्झिन कव्हरमध्ये त्यांचा सुंदर चेहरा दिसतो. त्यामुळे आता त्यांना नाटकामध्ये पाहणे हे देखील खूप जणांना औत्सुक्याचे असणार आहे. 

ADVERTISEMENT

मालिकेत करतायत मिस

सुख म्हणजे काय असतं या मालिकेत माईची भूमिका ही अनेकांना आवडते. वर्षा उसगावकर यांना देखील या मालिकेसाठी खूप प्रेम मिळाले आहे. सध्या या मालिकेत त्या नसल्यामुळे त्यांचा चाहता वर्ग त्यांना चांगलाच मिस करत आहे. आता मालिकेत त्या परत कधी येती याची प्रतिक्षा अनेकांना आहे. 

तर वर्षा उसगावकर यांनी मालिका सोडली नाही तर त्यांना मालिकेतून काही काळासाठी ब्रेक घेतला आहे. 

22 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT