ADVERTISEMENT
home / मनोरंजन
विदुला आहे तो नवा चेहरा

अखेर ‘बॉईज 3’ मधील तो चेहरा आला समोर

मराठीतील धमाकेदार चित्रपटाची यादी काढली तर त्या यादीमध्ये नक्कीच बॉईज या चित्रपटाचा समावेश होईल. आतापर्यंत  बॉईज आणि बॉईज 2 या चित्रपटाने मराठी प्रेक्षकांना चांगलेच हसवले आहे. आता याचा तिसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे. ज्या दिवसापासून या चित्रपटाची घोषणा झाली आहे त्या दिवसापासून या चित्रपटातील कॅरेक्टरविषयी चर्चा होऊ लागली आहे. पण या चित्रपटाने काही उत्सुकता ताणून ठेवण्यासाठी या चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीचा चेहरा दाखवला नव्हता. पण आता या अभिनेत्रीचा चेहरा समोर आला आहे.  धैऱ्या, ढुंग्या आणि कबीर या त्रिकुटासोबत राडा घालायला ही अभिनेत्री येणार आहे. अभिनेत्री विदुला चौगुले (Vidula Choughule) हा चेहरा असून तिला आता प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी झळकली ती…

काही दिवसांपूर्वीच या तिघांच्या आयुष्यात आलेली ‘ती’ मुलगी सोशल मीडियावर झळकली होती. मात्र अर्धा चेहरा दिसत असल्याने ‘ती’ नक्की कोण?.  याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. अखेर या चेहऱ्यावरून पडदा उठला असून आता प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे ती, विदुला नक्की कोणाच्या आयुष्यात येणार याची? तिच्या येण्याने या तिघांच्या आयुष्यात काय गडबड होणार की त्यांचे आयुष्य एका वेगळ्याच वळणावर जाणार? अर्थात या सगळ्यांची उत्तरे ‘बॅाईज ३’ पाहिल्यावरच मिळतील.

विदुला दिसते खूप सुंदर

विदुला या पोस्टरमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. त्यामुळे तिच्या प्रेमात आता कोण पडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. विदुलाने याआधी कोणतीही हिंट दिली नव्हती. त्यामुळे ही कोण असेल याचा अंदाज येत नव्हता. पण विदुलासोबतचा हा नवा व्हिडिओ पाहिल्यानंतर तो एकदम हॉट आहे असे दिसून येत आहे. विदुला यामध्ये दोन्ही रुपात दिसून आली आहे. यामध्ये ती इंडो-वेस्टर्न अशा रुपात दिसून आली आहे. त्यामुळे आता तिचे काम या चित्रपटात काय असणार आहे हे पाहण्याची उत्सुकता आता सगळ्यांना लागली आहे. पण त्यासाठी 16 सप्टेंबरची वाट पाहावी लागणार आहे.

04 Aug 2022
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT