अफगाणिस्तानात तालिबानींनी सत्ता स्थापन केल्यावर माजलेला गदारोळ आणि लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया आपण हल्ली रोजच वाचत आहोत. तालिबान लोकांना नकोय हे या सगळ्यातून दिसत आहे. काहींनी तालिबानांनी देशावर नियंत्रण मिळवल्यानंतर देश सोडून जाण्याचा निर्णय घेतला.विमान पकडून देश सोडण्यासाठी अनेकांनी जे काही प्रयत्न केले त्यामध्ये खूप जणांना मृत्यू देखील झाला. पण एक अफगाणी अभिनेत्री जी सध्या बॉलिवूडचा हिस्सा आहे तिच्या कुटुंबियांनी अफगाणिस्तानचे भविष्य जाणत तब्बल 20 वर्षांपूर्वीच देश सोडला. तिने तिचाही अनुभव शेअर केला आहे. जाणून घेऊया या अभिनेत्रीचा अनुभव
आधीही परिस्थिती अशीच होती
ही अफगाणी अभिनेत्री अन्य कोणी नाही तर वरीना हुसैन आहे. जी ‘लवयात्री’ या चित्रपटातून दिसली होती. वरीना हुसैन हीने एका मुलाखतीदरम्यान अफगाणिस्तानमध्ये सुरु असलेल्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. त्यावेळी तिने तिचा एक अनुभव शेअर केला. अफगाणिस्तानमध्ये राहात असताना 20 वर्षांपूर्वी त्यांना तालिबानचा असाच अनुभव आला होता. तिने सांगितले की, 20 वर्षांपूवी अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांची हीच भीती जाणवली होती. त्यामुळेच तिच्या कुटुंबियांनी देश सोडण्याचा निर्णय घेतला होता. वरिना पुढे म्हणाली की, गेल्या 10 वर्षांपासून मी भारतात राहात आहे. पण त्याआधीची वर्षे ही आपला देश सोडून इतर देशात राहण्यात गेली. कधी या देशात कधी त्या देशात राहणे हे त्रासदायक होते. पण शेवटी भारताने आम्हाला राहण्याची संधी दिली. त्यामुळेच आम्ही या देशात स्थिरावले आहोत.
महिलांना मिळणार नाही मान
देशाच्या सध्यपरिस्थितीवर अधिक बोलताना वरिना म्हणाली की, आता पु्न्हा एकदा देशाच प्रगती ढासळू लागेल. विकासाला खीळ बसेल आणि महिलांना अत्यंत वाईट दिवस येतील. महिला या केवळ मुलांना जन्म घालणारी एक मशीन बनून जाईल आणि तरुणांना दिशाहीन करुन त्यांच्यामध्ये द्वेष निर्माण केला जाईल त्यामुळे देशाची परिस्थिती बिकट होणार आहे.
वरिना हुसैनला मिळाली संधी
वरिना हुसैन हिला आता सगळेच ओळखतात. तिला सलमान खान प्रोडक्शनच्या चित्रपटात काम कऱण्याची संधी मिळाली. एक नवा चेहरा इंडस्ट्रीला मिळाल्यामुळे अनेकांना हा चेहरा आवडला होता. वरिना तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चांगलीच अॅक्टिव्ह असते. ती तिचे अनेक फोटो शेअर करत असते. तिचे अफगाणिस्तानबद्दलचे मत ऐकून आता तेथील परिस्थितीचा अधिक अंदाज येण्यास मदत होते.
विकी कौशल आणि कतरिना कैफने केला का साखरपुडा, काय आहे सत्य
अफगाणिस्तानातून अनेक लोक भारतात
अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तालिबान्यांना घाबरुन अनेकांनी देश सोडून जाण्याचा विचार केला. त्यासाठी विमानात इतकी गर्दी झाली की, त्या दृश्यांनी अनेकांना विचलित केले. खूप जणांनी विमानांच्या पखांवर राहूनही प्रवास करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे अनेकांचे प्राण गेले
आता वरिनाचा अनुभव ऐकून खूप जणांना ही परिस्थिती अनुभवल्याचा आनंद येईल.
अधिक वाचा
किरण गायकवाडने शेअर केल्या भावना, देवमाणूस संपल्यानंतर झाला भावूक
टायगर 3′ सलमान खानचा आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट, समोर आला हटके लुक