कुल्फी कुमार बाजेवाला फेम मोहित मलिक आणि त्याची पत्नी अभिनेत्री अदिती मलिक लवकरच आईबाबा होणार आहेत. अदितीच्या डोहाळजेवणात ती खूपच खुष दिसत होती. अदिती शिरवाईकर ही गरोदर असून नुकताच तिच्या डोहाळजेवणाचा कार्यक्रम पार पडला. तिने काही दिवसांपूर्वीच तिच्या आयुष्यातील ही महत्त्वाची गोष्ट चाहत्यांसोबत शेअर केली होती. आता तिचा पती मोहित मलिकने डोहाळजेवणाच्या कार्यक्रमाचे फोटो शेअर करत हा आनंद सर्वांसोबत शेअर केला आहे. मोहितने त्याचा आणि आदितीचा या कार्यक्रमातील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यातून त्या दोघांना आईबाबा होण्याबाबत होणारा आनंद दिसून येत आहे. शिवाय सध्या त्या दोघांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यांच्यावर चाहत्यांनी लाईक्स आणि शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला आहे.
अदितीच्या रूपावर मोहित झाला फिदा
मोहितने डोहाळजेवणाचे फोटो शेअर करत व्यक्त केलं आहे की, “नवरी आली, खूप साऱ्या शुभेच्छा माय लव्ह! या फोटोंमध्ये मोहितने अदितीला मिठीत घेत किस केलं आहे. अदितीच्या चेहऱ्यावरही गरोदरपणाचं तेज आलेलं दिसत आहे. अदिती मुळची महाराष्टीयन असल्यामुळे मोहितने तिच्या रूपाचं वर्णन मराठीतून एखाद्या नव्या नवरीप्रमाणे आहे असं केलं आहे. अदितीने पारंपरिक हिरव्या रंगाची साडी आणि गुलाबी रंगाचा शेला परिधान केला आहे. ज्यात तिचं मुळचं रूप अधिक खुलून येत आहे. मोहितने या कार्यक्रमासाठी काळ्या रंगाचा कुर्ता, हिरव्या रंगाचा शेला आणि टोपी परिधान केलेली आहे. दोघांना पाहुन यांची जोडी नेहमीच अशी आनंदी राहावी असं वाटत आहे.
मोहित आणि अदितीची लव्हस्टोरी
मोहित मलिक आणि अदिती शिरवाईकर यांनी 2010 मध्ये लग्न केलं आहे. आता त्यांच्या लग्नाला जवळजवळ दहा वर्षे पूर्ण होत आहेत. दहा वर्षांनंतर त्यांच्या घरी आता असं आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. ज्यामुळे दोघांनाही आईबाबा होताना नक्कीच खूप आनंदी वाटत असणार. त्या दोघांची पहिली भेट मिली नावाच्या एका हिंदी टेलिव्हिजन मालिकेदरम्यान झाली होती. त्यानंतर त्यांच्यात प्रेमाची खिचडी शिजू लागली आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आजही त्यांच्या नात्यात इतर कोणत्याच गोष्टींचा अडथळा आलेला नाही. त्यांचा संसार अगदी सुखाचा आहे आणि आता तर त्यांच्या या सुखी संसारात आनंदाचं कमळही उमलणार आहे. लवकरच त्या दोघांच्या घरी त्यांच्या बाळाचं आगगन होईल.
मोहित साकारणार आता खरीखुरी पित्याची भूमिका
मोहित मलिक ‘कुल्फी कुमार बाजावाला’नंतर ‘लॉकडाऊन की लव्ह स्टोरी’मध्ये दिसला होता. मोहित जवळजवळ गेली पंधरा वर्षे टेलिव्हिजन मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. कुल्फी कुमार बाजावाला या मालिकेत त्यांने एका प्रेमळ पित्याची भूमिका साकारली होती. जी प्रेक्षकांना खूपच आवडली. आता तर तो ही भूमिका प्रत्यक्ष आयुष्यातही साकारणार आहे. अदितीनेही अनेक हिंदी मालिकांमध्ये स्वतःचा ठसा उमटवला आहे. आता मात्र ती या क्षेत्रापासून काहिशी दूरावली असून सध्या ती तिच्या बाळ आणि प्रेग्नंसीवर फोकस करत आहे. दोघंही त्यांच्या आयुष्यातील या मोठया भूमिकेसाठी आणि जबाबदारीसाठी सज्ज झाले असून. चाहत्यांना याबाबत लवकरच कळवतील.
फोटोसौजन्य – इन्साग्राम
अधिक वाचा –
मालदिव्जमध्ये आहे बिपाशा बासू, शेअर केलं ग्लॅमरस फोटोशूट
बॉलीवूड अभिनत्री ज्यांनी थाटला क्रिकेटर्ससोबत संसार
नव्या मराठी मालिकांची लागणार वर्णी, या मालिका घेत आहेत निरोप