home / मनोरंजन
adinath-kothare-and-urmila-kothare-s-marriage-is-in-trouble-has-a-rough-patch-in-marathi

आदिनाथची खऱ्या आयुष्यातील ‘चंद्रमुखी’ मात्र दूर, काय आहे कारण

गेल्या काही दिवसांपासून ‘चंद्रमुखी’ (Chandramukhi) हा चित्रपट गाजतोय. यातील दौलतराव माने ही भूमिका आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) अक्षरशः जगला आहे अशा स्वरूपाची समीक्षाही समोर येत आहे. चंद्रमुखीचे प्रमोशन खूपच जोरात झाले. गेल्या पंधरा दिवसांपासून केवळ मराठमोळा प्रेक्षकच नाही तर अगदी अमराठी प्रेक्षकही चंद्रमुखीच्या प्रमोशन आणि चित्रपटातील कलाकारांचा अभिनय आणि गाण्यांनी भारावून गेले आहेत. अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) आणि आदिनाथ कोठारेच्या जोडीलाही अत्यंत भरभरून प्रेम मिळत आहे. मात्र या सगळ्यात सध्या लक्ष वेधले जातंय ते म्हणजे या दरम्यान आदिनाथची खऱ्या आयुष्यातील चंद्रमुखी अर्थात उर्मिला कोठारे (Urmila Kothare) मात्र कोणत्याही कार्यक्रमाला दिसून आली नाही. इतक्या मोठ्या प्रिमियरमध्येही उर्मिलाने हजेरी लावली नाही. त्यामुळे आता आदिनाथ आणि उर्मिलामध्ये बिनसलं आहे की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. 

प्रियांका चोप्रावरही चालली चंद्रमुखीची जादू, कौतुक करून दिल्या शुभेच्छा

चर्चेला आलंय उधाण 

आदिनाथ आणि उर्मिला दोघेही सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असतात. पण 83 या चित्रपटानंतर दोघेही कुठेच एकत्र दिसले नाहीत. याशिवाय उर्मिला पुन्हा एकदा मराठी मालिकेतून पदार्पण करत आहे. पण आपल्या घरातील प्रॉडक्शन हाऊसमधून उर्मिला कमबॅक करत नसून तिने वेगळे प्रॉडक्शन हाऊन निवडल्यानेदेखील शंकेला जागा निर्माण झाली आहे. याशिवाय सोशल मीडियावर उर्मिलाने कुठेही आदिनाथच्या चित्रपटासाठी त्याला शुभेच्छा दिल्या नाहीत अथवा त्याच्याबाबत कोणतीही पोस्ट करण्यात आलेली नाही. प्रिमयरलादेखील महेश कोठारे, आदिनाथची आई हे दोघेच हजर होते. यावेळीही उर्मिलाने हजेरी लावली नाही. जरी नव्या मालिकेमध्ये उर्मिला गुंतली आहे असं समजण्यात आले तरीही गेल्या अनेक दिवसांपासून हे जोडपे एकत्र दिसलेलेही नाही. होळीच्या सणालाही आदिनाथ आपल्या मुलीसह दिसला. तेव्हादेखील त्याची बायको उर्मिला त्याच्यासह नव्हती. तसंच उर्मिलाच्या वाढदिवसाच्या दिवशीही आदिनाथने शुभेच्छा दिलेल्या नाहीत, त्यामुळे आता सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्या आहेत आणि आपली आवडती जोडी आदिनाथ – उर्मिला एकत्र आहेत की नाही असा प्रश्न सगळ्यांनाच पडू लागला आहे. 

12 वर्षानंतर उर्मिलाचे पदार्पण 

टीव्ही अर्थात मनोरंजनाच्या क्षेत्रात पुन्हा एकदा लहान पडद्यावर उर्मिला 12 वर्षांनी पदार्पण करत आहे. ‘तुझेच गीत गात आहे’ नावाच्या मालिकेतून उर्मिला येत असून तिने कमबॅकसाठी वेगळ्या प्रॉडक्शन हाऊसची निवड केल्याने या चर्चेला सुरूवात झाली आहे. इतकंच नाही तर सध्या आदिनाथसह उर्मिला कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही दिसत नाही अथवा आदिनाथ आणि उर्मिला या दोघांनीही आपापल्या नव्या प्रोजेक्टबाबत कोणतेही कौतुकाचे शब्द एकमेकांबाबत मीडियासमोर मांडलेले नाहीत. इतकंच काय चंद्रमुखीच्या कोणत्याही चर्चेत उर्मिला दिसून आलेली नाही. त्यामुळेच आदिनाथ आणि उर्मिलामध्ये काहीतरी बिनसलं आहे अशी खुसफूस सुरू झाल्याचे दिसून येत आहे. या दोघांनाही एक सुंदर ‘जिजा’ नावाची मुलगी आहे आणि त्यामुळे या दोघांनी कायम एकत्र राहावं अशीच इच्छा त्यांच्या चाहत्यांचीही आहे. तर काहींच्या मते आदिनाथ आणि उर्मिलाचं चांगलं नातं राहीलं नसल्यामुळेच उर्मिलाने पुन्हा एकदा काम करायला सुरूवात केली आहे. 

याबाबत आता नक्की काय खरं आणि काय खोटं हे लवकरच बाहेर यावं आणि प्रेक्षकांना नक्कीच या दोघांनी निराश करू नये अशीच प्रार्थना आता या दोघांचे चाहते करत आहेत. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

08 May 2022

Read More

read more articles like this
good points logo

good points text