दररोज नियमितपणे काही तास दीर्घ श्वसनाचा सराव करणे तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचे ठरू शकते. कारण धावपळीच्या काळात सतत होणारी दगदग आणि चिंता काळजीमुळे तुमच्या शरीरावर आणि मनावर परिणाम होत असतो. चिंता, काळजी, भीती, राग, मत्सर यामुळे तुमचा रक्तदाब वाढतो, ह्रदयाचे ठोके वाढतात ज्याचा नकळत परिणाम तुमच्या शरीरावर होत जातो. यासाठीच या सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्हाला दीर्घ श्वसनाचे तंत्र माहीत असायला हवे. शिवाय कोरोनाच्या काळात फुफ्फुसांचे कार्य सुरळीत चालण्यासाठी तुम्हाला श्वसनाचा सराव करणं गरजेचं आहे. यासाठीच जाणून घ्या दीर्घ श्वसनाचे फायदे
प्रतिकारशक्ती वाढते
संथ आणि दीर्घ पद्धतीने श्वास घेतला आणि सोडला तर त्यामुळे शरीरात पुरेसा ऑस्किजन मिळतो. रक्ताला पुरेशा ऑक्सिजनचा पुरवठा झाल्यामुळे तुमच्या शरीरातील सर्व यंत्रणा योग्य पद्धतीने कार्य करू लागतात. शरीराचे कार्य सुरळीत आणि पद्धतशीर पद्धतीने सुरू असेल तर बाहेरील आजारांपासून लढणे शरीराला सोपे जाते. यासाठीच प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी नियमित दीर्घ श्वसनाचा सराव करायला हवा. ही योगासने करुन वाढवा प्रतिकारशक्ती (Yoga To Improve Immune System In Marathi )
शरीर डिटॉक्स होते
शरीर निरोगी आणि सुदृढ राहण्यासाठी ते वेळच्या वेळी डिटॉक्स करायला हवे. शरीरात वात, पित्त, कफाचा समतोल बिघडला तर आजारपण येण्याची शक्यता असते. मात्र दीर्घ आणि संथपणे घेतलेल्या श्वासामुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. यासाठी सकाळी उठल्यावर अथवा संध्याकाळी नियमित शुद्ध हवेत काही मिनीटे दीर्घ श्वसनाचा सरावा करावा. जाणून घ्या प्राणायामाचे फायदे मराठीमध्ये (Pranayam Benefits In Marathi)
pexels
ताणतणाव कमी होतो
दैनंदिन जीवनात आपण सतत काम, चिंता, काळजी, भीतीने ग्रासलेले असतो. अशा चिंताजनक आणि ताणतणावाच्या जीवनशैलीत दीर्घ श्वसनाचा सराव तुमच्यासाठी वरदान ठरू शकते. कारण नोकरीधंदा, कौटुंबिक जबाबदारी सांभाळताना ताणतणाव हा येणारच पण दीर्घ श्वसनामुळे तुम्हाला या ताणाला नियंत्रित ठेवण्याची गुरुकिल्ली मिळू शकते. ज्यामुळे तुमच्या शरीराती स्ट्रेस हॉर्मोन्स वाढत नाहीत आणि तुम्ही नेहमी आनंदी राहता.
रक्तप्रवाह सुधारतो
श्वसनाचे व्यायाम केल्यामुळे तुमच्या शरीरातील ह्रदयाचे कार्य सुधारते ज्याचा परिणाम रक्तप्रवाहावर होतो. संपूर्ण शरीराला योग्य पद्धतीने रक्ताचा पुरवठा झाल्याने तुमच्या शरीरात होणाऱ्या वेदना, दाह कमी होतात. शिवाय शरीराला रक्ताद्वारे भरपूर ऑक्सिजन मिळाल्यामुळे तुमची मानसिक स्थिती चांगली राहते. मन आणि शरीर यांचा परस्पर संबध असतो. त्यामुळे दीर्घ श्वसनाचा सराव केल्यामुळे तुमचे मन आनंदी राहतेच शिवाय शरीरदेखील सुदृढ राहते.
चांगली झोप लागते
चिंता, काळजी, भीतीमुळे अनेकांना आजकाल झोप न येणे अथवा झोपमोड होण्याची समस्या सतावत असते. दैनंदिन ताणतणावाचा परिणाम तुमच्या झोपेवर होत असतो. मात्र दीर्घ श्वसनाचा सराव केल्यामुळे तुमचे शरीर आणि मन दोन्ही निवांत आणि शांत होते. ज्यामुळे तुमच्या मनावरचा ताणतणाव कमी होतो आणि तुम्हाला शांत झोप लागते. त्यामुळे लक्षात ठेवा जर तुम्हाला रात्री शांत झोप येत नसेल तर झोपेच्या गोळ्यांची सवय लावण्यापेक्षा दररोज श्वसनाचे व्यायाम करण्याची सवय स्वतःला लावा.
त्वचेवर ग्लो येतो
आजवर त्वचेवर ग्लो म्हणजेच नैसर्गिक चमक येण्यासाठी तुम्ही अनेक उपाय आणि उपचार केले असतील. पण तुम्हाला कदाचित हे माहीत नसेल की दीर्घ श्वसनाच्या सरावानेही तुमचा चेहरा तेजस्वी होतो. रक्तप्रवाह सुधारल्यामुळे आणि त्वचेला पुरेसा ऑक्सिजन मिळाल्यामुळे तुमची त्वचा नैसर्गिक पद्धतीने चमकदार दिसते.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा – pexels
चालताना अथवा धावताना धाप लागत असेल तर या टिप्स करा फॉलो