home / मनोरंजन
बाहुबली चित्रपटानंतर आता ‘या’ चित्रपटात प्रभास साकारणार दुहेरी भूमिका 

बाहुबली चित्रपटानंतर आता ‘या’ चित्रपटात प्रभास साकारणार दुहेरी भूमिका 

बाहुबली चित्रपटात प्रभासने महेंद्र बाहुबली आणि अमरेंद्र बाहुबली अशा दोन भारदस्त भूमिका साकारल्या होत्या. या भूमिका प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत. बाहुबली चित्रपटात प्रभासने साकारलेल्या दोन्ही भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. आता प्रभास पुन्हा एकदा डबल रोल साकारण्यासाठी सज्ज झाला आहे. केजीएफ 2 चा दिग्दर्शक प्रशांत नीलच्या आगामी चित्रपटात तो काम करत आहे. या चित्रपटाचं नाव ‘सालार’ असून चाहते आता या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. प्रभासने नुकतंच सालारच्या सेटवरून काही फोटो शेअर केले होते ज्यामुळे आता या चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढलेली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटात प्रभासची दुहेरी भूमिका असणार आहे. 

दोन वेगळी व्यक्तिमत्त्व साकारणार प्रभास

सालारमध्ये प्रभासचे दोन नवे अवतार दिसणार आहेत. या दोन्ही भूमिका वेगळ्या आणि हटके असण्याची शक्यता आहे. कारण या चित्रपटाची कथा दोन वेगवेगळ्या काळातील आहे. बाहुबलीप्रमाणेच या चित्रपटात जुना काळ आणि नवा काळ असा फरक दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे या चित्रपटातही काळानुसार प्रभासच्या व्यक्तिरेखांमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. प्रभासच्या दुहेरी भूमिकेशिवाय आणखी माहिती या चित्रपटाबद्दल सध्या उपलब्ध नाही. मात्र त्याचं शूटिंग सुरू झालं असून लवकरच प्रभास या दोन भूमिकांसह प्रेक्षकांसमोर येणार हे मात्र खरं आहे.

कधी प्रदर्शित होणार सालार

सालार एक जबरदस्त अॅक्शन आणि थ्रिलर चित्रपट असेल. ज्यामध्ये प्रभासच्या दोन मुख्य भूमिका आणि त्याच्यासोबत श्रुती हासन हिरोईनच्या रोलमध्ये असेल. चित्रपटाचं दिग्दर्शन सुपरहिट चित्रपट केजीएफ 2 चा दिग्दर्शक प्रशांत नील करत असल्यामुळे या चित्रपटाबद्दल चाहत्यांच्या आशा वाढलेल्या आहेत. चित्रपटाबद्दल आताच चर्चा सुरू झालेली असून हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. प्रभासने या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केलेली आहे. त्यासोबतच त्याचा दीपिका पादुकोनसोबत एक चित्रपट सुरू आहे, तर ओम राऊतच्या आदिपुरूषमध्ये तो काम करत आहे. सालारबद्दल चर्चा सुरू झाल्यामुळे या चित्रपटालाही बाहुबलीप्रमाणे यश मिळावं अशी चाहत्यांची इच्छा आहे.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

17 Jun 2022

Read More

read more articles like this
good points logo

good points text