LockDown उठण्याची वेळ जसजशी जवळ येत आहे. तस तशा कोरोनाच्या अनेक घटना समोर येऊ लागल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी चेन्नई एक्सप्रेस चित्रपटाचा निर्माता करीम मोरानी याच्या मुलीला कोरोना झाल्याची बातमी समोर येत होती. आता चित्रपट निर्माता करीम मोरानीच कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे कळत आहे. त्यामुळे आता कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार करीमवर सध्या उपचार सुरु करण्यात आले आहे. या सोबतच करीम यांची मुलगी शाजा आणि झोया यांच्यावरही मुंबईत उपचार सुरु आहे.
Covid19 मधून बाहेर पडलेल्या या अभिनेत्याने सांगितला आपला अनुभव
आणि कोरोना टेस्ट निघाली पॉझिटिव्ह
आतापर्यंत देशभरात कोरोना परदेशातून आलेल्यांमुळे देशात आलेल्यांमुळे लोकांना झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळेच परदेशातून आलेल्यांवर सरकारचे अगदी बारीक लक्ष आहे. त्यांच्यामध्ये अशा प्रकारची कोणती लक्षणे आहेत की नाही यावर लक्ष ठेवले जात आहे. करीम यांची मुलगी शाजा हिची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे गोंधळ उडाला. लागलीच घरातील इतरांची चाचणी करण्यात आली. शाजाची बहीण झोया हिची चाचणी केल्यानंतर तिची टेस्ट निगेटिव्ह आली. पण करीमने कोरोना टेस्ट केल्यानंतर त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे कळत आहे. आता ही बातमी वाऱ्यासारखी पसरली असून आता परदेशी प्रवास करणाऱ्यांचे ढाबे दणाणले आहेत.
चेन्नई एक्सप्रेसच्या निर्मात्याची मुलगी Corona पॉजिटिव्ह, कुटुंबियांचीही तपासणी
शाजामध्ये दिसली नाहीत लक्षण
वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार शाजामध्ये कोरोना व्हायरससंदर्भातील कोणतीही लक्षणं दिसत नव्हती. तर कोरोनाशी निगडीत असलेला त्रास झोयाला होत होता. त्यामुळे झोयाला कोरोना झाला की, काय असे आधी वाटत होते. पण तिची पहिली टेस्ट निगेटिव्ह आली होती आणि दुसरी टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि आता करीम यांची टेस्टही पॉझिटिव्ह असल्याचे कळत आहे. करीम यांच्या लक्षणाबाबत इतकी माहिती मिळू शकली नाही. पण करीम यांच्यावर उपचार सुरु झाले आहेत.
Corona Virus च्या या काळात सलमान खानवर कोसळला दुःखाचा डोंगर, घरात शोकाकुल वातावरण
केला होता परदेशी प्रवास
शाजा हिला कोरोना झाल्याचे कळल्यानंतर तिच्या प्रवासाचा इतिहास शोधण्यात आला. त्यावेळी शाजाने परदेशी प्रवास केल्याचे समोर आले आहे. पण या आधी विचारणा केल्यानंतर करीम यांनी मात्र या प्रवासाचा कोणताही उल्लेख केला नव्हता शाजा ही लॉकडाऊन होण्याच्या काहीच दिवसांपूर्वी श्रीलंकेला जाऊन आली. .तर झोयाने जयपूरचा दौरा लॉकडाऊन होण्याच्या काही दिवसांपूर्वी केला होता. आता घरातील झोया, शाजा आणि करीम तिन्ही जण कोरोना पॉझिटिव्ह आहे.
तिघांवर उपचार सुरु
झोया, शाजा यांच्यावर नानावटी आणि अम्बानी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. या संदर्भात अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या संदर्भात त्यांच्या भावाशी संपर्क साधल्यानंतर त्याचा भाऊ अली मोरानी यांनी यासंदर्भात काहीही माहीत नसल्याचे सांगितले. आता करीम हा सेलिब्रिटीमधील कोरोनाचा पाचवा रुग्ण आहे.
आता एक एक केसेस समोर येत असल्यामुळे आपल्या सगळ्यांना काळजी घेण्याची गरज आहे.
घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा.