बॉलीवूड स्टार्सच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अनेकांचे लक्ष असते. त्यांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवलेले असते. हे लक्ष हॅकर्सही ठेवून असतात. म्हणूनच वरचेवर अकाऊंट हॅक होण्याच्या बातम्या या समोर येतात. पण अकाऊंट हॅक करुन त्यांची खासगी माहिती काढून घेणे हा इतकाच उद्देश्य हॅकर्सचा नसतो. तर त्या पलीकडे जाऊन काही आणखी सेलिब्रिटींचे अकाऊंट हॅक करणे हा ही एक उद्देश असतो. आता प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान हिचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याचे समोर आले आहे. तिने ही बातमी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुनच सगळ्यांना दिली आहे. पण महत्वाची गोष्ट अशी ट्विटर हॅक होण्याआधी फराहचे इन्स्टाग्राम अकाऊंटही हॅक झाले होते. जाणून घेऊया विस्तृत माहिती
Bigg Boss14: राखी सावंतच्या कथित नवऱ्याने राहुल महाजनच्या ‘त्या’शब्दावर व्यक्त केला राग
शिरीष कुंदरच्या मदतीने वाचवले इन्स्टा अकाऊंट
फराह खानचा नवरा शिरीष कुंदर याच्या मदतीने तिने तिचे सोशल मीडिया अकाऊंट अर्थात इन्स्टाग्राम पुन्हा मिळवले आहे. या आधी तिने अकाऊंट हॅक झाल्याची माहिती दिली होती. शिवाय या अकाऊंटवरुन जर कोणाला काही खासगी लिंक आल्या असतील तर त्या क्लिक करु नका असे देखील म्हटले होते. त्यामुळेच तिच्या अकाऊंट हॅक झाल्याची बातमी समोर आली. पण शिरीष कुंदरने तिने इन्स्टाग्राम अकाऊंट परत मिळवण्यात यश मिळवले आहे. तिचे अकाऊंट पूर्ववत झाल्याचा आनंद तिने एका पोस्ट द्वारे व्यक्त केला होता. पण ती पोस्ट आता दोघांनी त्यांच्या अकाऊंटवरुन काढून टाकली आहे. पण तिने दिलेल्या माहितीनुसार अकाऊंट वेरिफाईड होण्यासाठी एक लिंक येते. या लिंकवर क्लिक केल्यानंतर काही स्टेप्स सांगितल्या जातात आणि त्यानंतर तुमचे अकाऊंट हॅक होते. अकाऊंट वेरिफाईड करण्याची उत्सुकता असेल तर अशा चुकीच्या गोष्टी करु नका. कारण त्यामध्ये फारच धोका आहे.
बॉलीवूडचे सुपरहिट चित्रपट जे पाहिल्यावर वाटतं लग्न असावं तर असं
ट्विटर अकाऊंट अजूनही हॅक
फराह खानला इन्टाग्राम अकाऊंट परत मिळवून दिलासा मिळाला असला तरी देखील ट्विटर अकाऊंटच्या बाबतीत तसा दिलासा मिळाला नाही. कारण फराहचे ट्विटर अकाऊंट अद्याप सुरु झालेले नाही. हे अकाऊंट सध्या कोणालाही दिसत नाही. त्यावर सध्या पोलिसांच्या सायबर सेलच्या मदतीने काम सुरु आहे. लवकरच तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट पूर्ववत होईल अशी अपेक्षा आहे. पण बॉलिवूडमधले हे काही नवे प्रकरण नाही. या आधी देखील अशा पद्धतीने अकाऊंट हॅक होण्याच्या घटना या घडल्या आहेत.
सुश्मिता सेनच्या मुलीचे अकाऊंट हॅक
सेलिब्रिटी अकाऊंट हॅकची एक मोठी यादीच करता येईल. सुश्मिता सेनची मुलगी रिनी सेन हिचे इन्स्टाग्राम अकाऊंटदेखील हॅक झाले होते. त्यावेळी याची माहिती सुश्मिता सेन हिने दिली होती. तिने एक विशेष पोस्ट लिहून म्हटले होते की, रिनी सेन ही दुसरे अकाऊंट सुरु करण्यास उत्सुक आहे. एका मुर्खाने तिच्या करिअरच्या सुरुवातीलच तिचे अकाऊंट हॅक केले आहे.मी या माणसासाठी फार दु:खी आहे. तर दुसरीकडे उर्मिला मातोंडकर हिचे सोशल अकाऊंटही हॅक झाले होते. तिच्या अकाऊंटमधील सगळे फोटो डिलीट करण्यात आले होते.
आता फराहचे ट्विटर अकाऊंट कधी पूर्ववत होईल हे ती नक्कीच इन्स्टावरुन सांगेल. दरम्यान, तुम्हीही कोणत्याही अनोळखी लिंकवर मुळीच क्लिक करु नका.
कधी होणार आई…यावर दीपिका पादुकोणचा खुलासा