‘तान्हाजी’मध्ये सैफ अली खानसोबत स्क्रीन शेअर केल्यावर आता धैर्य घोलप (Dhairya Gholap) ‘बावरा दिल’ (Bawara Dil) या हिंदी मालिकेतून टीव्हीवर पदार्पण करत आहे. अभिनेता धैर्य घोलपचे गेल्या वर्षी तान्हाजी चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये पदार्पण झाले होते. तान्हाजी मालुसरेंच्या सैन्यातल्या मावळ्याच्या रूपातल्या धैर्यने ह्या सिनेमात नवाब सैफ अली खान सोबत स्क्रीन स्पेस शेअर केली आहे. सिनेमाचा खलनायक उदय भान सिंह (सैफ अली खान)च्या हातून या मावळ्याचा मृत्यू होताना दाखवला आहे. धैर्यची ही भूमिका नक्कीच प्रेक्षकांच्या लक्षात राहिली होती. धैर्य हा नेहमीच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरही अॅक्टिव्ह असतो. आता धैर्यचा अभिनय रोज बावरा दिल या हिंदी मालिकेतून समोर येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ही मालिका गाजलेली मराठी मालिका ‘जीव झाला येडापिसा’ चे हिंदी व्हर्जन आहे.
घटस्फोटाचे रहस्य लवकरच उलगडणार, ‘मंगलाष्टक रिटर्न’ येत आहे
खलनायकाच्या भूमिकेतून येणार प्रेक्षकांच्या समोर
आता अभिनेता धैर्य घोलप नवी मालिका ‘बावारा दिल’ द्वारे ‘सरकार’ या खलनायकाच्या भूमिकेतून टीव्हीवर पदार्पण करत आहे. तान्हाजीमधील सैफ अली खान यांच्या निर्दयी उदय भान सिंह या भूमिकेकडून ‘सरकार’ या खलनायकी पात्रासाठी प्रेरणा घेतल्याचे धैर्यने सांगितले आहे. धैर्य घोलपने पुढे सांगितले की,, “मला नेहमीच नकारात्मक पात्रांबद्दल आकर्षण वाटतं आलंय. याचे कारण खलनायकी भूमिकांमध्ये भावनांच्या अनेक छटा साकारायला मिळतात. आपल्यातल्या अभिनयाचा त्यामुळे कस लागतो, असं मला वाटतं. तान्हाजीमधली उदय भान ही भूमिका ओम राऊत सरांच्या मार्गदर्शनाखाली सैफ अली खान कशी साकारत होते हे मला पाहायला मिळाले. सैफसरांना भूमिकेशी एकमग्न होताना त्यांची तयारी बारकाईने न्याहाळायची संधी मला मिळाली. त्याचा फायदा ‘सरकार’ ही भूमिका रंगवताना होत आहे.” असा धैर्यने आवर्जून उल्लेख केला आहे. हा चित्रपट तुफान गाजला होता. त्यातही सैफ अली खानची भूमिका अधिक गाजली. त्यामुळे आता सैफच्या अभिनयाचा आदर्श ठेवत आपल्या अभिनयाच्या छटा या पात्रातून कशा साकारणार याकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. याशिवाय धैर्यने पुढे म्हटले की, “माझ्या करिअरच्या सुरूवातीलाच मला नकारात्मक भूमिका साकारण्याची संधी मिळतेय, यासाठी मी निर्माते निखील शेठ आणि कल्याणी पाठारे यांचा आभारी आहे.”
महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकरांचा मुलगा करतोय अभिनय क्षेत्रात एंट्री
धैर्यने मॉडेलिंगही केले आहे
धैर्य घोलपने मॉडेलिंगही केले आहे. तेजस्विनी पंडीत आणि अभिज्ञा भावे यांच्या तेजाज्ञा या ब्रँडसाठी धैर्यने मॉडेलिंग केले असून याआधी धैर्य वोग मॅगझिनवरही झळकला आहे. धैर्य एक उत्तम स्टोरीटेलर असून त्याच्या अनेक स्टोरीज त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरही पोस्ट केल्या आहेत. धैर्यच्या अभिनयाला आताच सुरूवात झाली असली तरीही धैर्य नवखा अजिबात वाटत नाही. तसंच धैर्यचे अनेक चाहते आहेत. आता हिंदीमध्ये अभिनेता म्हणून धैर्यला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतोय याची नक्कीच सर्वांना उत्सुकता आहे. धैर्य एका वेगळ्या आणि महत्वाच्या भूमिकेत या मालिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहे. तसंच सुरूवातीलाच अशी नकारात्मक भूमिका करताना अनेक आव्हानं असतात आणि ती पेलायला एक अभिनेता म्हणून धैर्य तयार आहे हे नक्कीच प्रोमोमधून दिसून येत आहे. जीव झाला येडापिसा या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आता याच कथेला हिंदीमधून कसा प्रतिसाद मिळेल हेदेखील पाहणे औत्सुक्याचे आहे.
बॉलीवूड अभिनत्री ज्यांनी थाटला क्रिकेटर्ससोबत संसार
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक