ADVERTISEMENT
home / मनोरंजन
शहनाज गिल आली लाईव्ह

सिद्धार्थच्या निधनानंतर पहिल्यांदाच शहनाजचा गाण्याचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल

 सिद्धार्थ शुक्लाची अकाली एक्झिट सगळ्यांसाठीच धक्का होती. सगळ्या इंडस्ट्रीला त्याचा धक्का बसला. कारण काहीच दिवसांपूर्वी सिद्धार्थ आणि शहनाज #sidnaaz ची ही जोडी दिसली होती. पण त्यानंतर अवघ्या काहीच दिवसात सिद्धार्थचे निधन झाले. सिद्धार्थच्या जाण्याचा धक्का शहनाज गिला इतका बसला की, शहनाज पूर्णपणे गळून गेली. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शहनाज पूर्णपणे दिसणे बंद झाली. शहनाज कुठे आहे याचा  शोध तिचे फॅन्स घेत होते. पण तिच्या सोशल मीडियावर कोणतीही हालचाल नव्हती. पण सिद्धार्थच्या जाण्यानंतर पहिल्यांदाच शहनाज लाईव्ह आली आणि तिने सिद्धार्थच्या आठवणीत गाणं गायलं

महाराष्ट्राची हास्यजत्रा’ विनोदवीरांना मिळाली महानायकाची कौतुकाची थाप

शहनाज झाली भावूक

शहनाजने लाईव्ह येत सिद्धार्थच्या आठवणीत एक गाणं गायलं आहे. तिने त्यामध्ये तू अचानक का सोडून गेलास? हे सांगितलं आहे. तिने पंजाबीमध्ये हे गाणं गायल आहे. तिचे हे गाणे ऐकून तिचे चाहते देखील भावूक झाले आहेत. तिचा हा व्हिडिओ तिच्या फॅनपेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये शहनाज आपल्या भावना आवरताना दिसत आहे. तिने आपले रडू आवरले आहे. तिच्या सुरांमध्ये तो हुंदका जाणवत आहे. सिद्धार्थ जाण्यानंतर शहनाजने सगळे काही सोडून दिले होते. तिचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेल. तिने त्यानंतर एकही दिवस आपले काम केले नाही. या
दु:खात ती इतकी वाहत गेली की, तिने आपले सगळे काही सोडून दिले.

 व्हिडिओबद्दल नाही शाश्वती

फॅन क्लबने शेअर केलेला हा व्हिडिओ हा खरा आहे याबद्दल काही शाश्वती देता येत नाही. त्यामुळे व्हिडिओ हा आधीचा आहे की नंतरचा हे सांगता येत नाही. शहनाज गिलचं आता बरंच ट्रान्फॉर्मेशन झालेले आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आताचा असावा असे दिसत आहे. इतकेच नाही. लाईव्ह व्हिडिओ दरम्यान जाणाऱ्या कमेेंट्स या दिसत आहेत. ज्यामध्ये तिला सगळे स्ट्राँग राहायला सांगत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ नवीन असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

ADVERTISEMENT

Bigg Boss Marathi: पहिल्या भागापासून लक्ष वेधून घेतोय जय दुधाणे

पूर्वी बरेचदा यायची लाईव्ह

शहनाज या पूर्वी बरेचदा लाईव्ह यायची. ती अनेकदा लाईव्ह येत तिच्या फॅन्सशी संवाद साधायची. तिचे लाईव्ह हे खूपच मनोरंजन करणारे असायचे. त्यामुळे  तिचे संवाद आणि विनोद ऐकायला खूप जण यायची. इतकेच नाही तर तिच्या लाईव्हमध्ये बरेचदा सिद्धार्थचा उल्लेख झाला आहे. सिद्धार्थही तिच्या लाईव्हमध्ये कितीतरी वेळा दिसला आहे. त्यामुळे त्यांचे प्रेम हे किती आहे ते सगळ्यांना आधीच दिसले होते.

सिद्धार्थ- शहनाजची मैत्री

सिद्धार्थ आणि शहनाज हे दोघे बिग बॉसमध्ये होते. या ठिकाणीच त्यांची मैत्री दृढ झाली. शहनाज ही सिद्धार्थवर मनापासून प्रेम करते हे देखील दिसून आले होते. त्यामुळेच की काय सिद्धार्थ आणि शहनाजची ही मैत्री अधिक दिसली. 

सिद्धार्थच्या निधनानंतर तिचा व्हायरल झालेला व्हिडिओ ती आता पुन्हा उभी राहतेय याचे समाधान अनेकांना मिळतेय.

ADVERTISEMENT

दीपिका पादुकोण पी व्ही सिंधूसोबत खेळतेय बॅडमिंटन, सुरू झाली बायोपिकची चर्चा

22 Sep 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT