पंजाबी सिंगर सिद्धू मुझेवालाच्या हत्येच्या घटनेने सगळ्यांनाच हादरुन सोडले आहे. पंजाबच्या मानसा येथे त्याला 30 गोळ्या झाडून मारण्यात आले.गँगवारमुळे सिद्धू मुझेवालाची हत्या झाली. हे कॅनडा बेस्ड गोल्डी ब्ररारने या हत्येची जबाबदारी घेतली आणि पुन्हा एकदा गँगवॉरची दहशत वाढली. या घटनेमुळेच आता अनेक VVIP लोकांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. यामध्ये अभिनेता सलमान खान याचा देखील समावेश आहे. सलमानच्या सुरक्षेत आता वाढ करण्यात आली आहे. त्याच्या राहत्या ठिकाणी पोलिसांचा कडक पहारा ठेवण्यात आला आहे. पण सलमान आणि या गँगच कनेक्शन काय चला घेऊया जाणून
सलमानला दिली सुरक्षा
सिद्धू मुझेवालाच्या हत्येनंतर पोलिसांनी अनेकांची सुरक्षा वाढवली आहे. यामध्ये सलमान खानने नाव प्रामुख्याने पुढे येत आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही गँगमुळे सलमान सोबत अशा प्रकारची घटना घडू नये यासाठी सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलमानच्या घराभोवती सशस्त्र पोलिसांचा पहारा वाढवण्यात आला आहे. सध्या तरी हे एकच नाव सुरक्षा वाढवण्यासाठी पुढे आलेले आहे. त्यामुळे या पुढे सलमानला सोशल इव्हेंटस किंवा अन्य ठिकाणी जाणे फारच कठीण जाणार आहे.
सलमान आणि गँगचा संबंध काय
सलमानकडून अनेकवेळा चुका झाल्या आहेत. ऐश्वर्या प्रकरण असू दे की, अंडरवर्ल्डशी संबंध सगळीकडे सलमानचे नाव जोडले गेले आहे. हम साथ साथ है या चित्रपटादरम्यान सलमानने काळवीटची केलेली शिकार त्याच्या खूपच जास्त अंगाशी आली होती. कारण या नंतर त्याला वेगवेगळ्या स्तरातून धमक्या आल्या होत्या त्यामध्ये लॉरेन्स बिष्णोईचा देखील समावेश होता. तुरुंगात असतानाही त्याने सलमान खानला जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यावेळी सलमान खान रेडी चित्रपटाचे शूट करत होता. त्याला मारण्याचे प्लॅनिंग तिहार जेलमधून झाले होते. त्यासाठी सगळी तयारीही झाली होती. पण सलमानला ज्या शस्त्राने मारायचे होते. ते शस्त्रच न मिळाल्यामुळे ते प्लॅनिंग तिथेच कोलमडले. या संदर्भात त्याचा सहकारी राहुल याला अटक करण्यात आली. त्यामुळेच या हत्येचं प्लॅनिंग समजू शकलं. सलमानला मारण्यासाठी त्याची माणसं मुंबईला देखील आली होती. पण ती पुन्हा परतली.
हत्येचं प्लॅनिंग होतं जेलमधून
लॉरेन्स बिश्णोई सध्या जेलमध्ये आहे. पण तरीही तिहारमधूनच तो आपली सूत्र हलवण्याचे काम करतो. जेलमधून ते व्हॉटसग्रुपच्या माध्यमातून सुपारी घेतात.या गँगसाठी काम करणाऱ्या लोकांकडून इतरांना मारण्याचे काम करतात. त्यामुळे एका जागी बसून लॉरेन्स आपले प्लॅनिंग करतो. सिद्धू मुझेवालाला देखील धमक्या येत होत्या. त्यासाठीच त्याला सुरक्षा देखील देण्यात आली होती. पण सुरक्षा जशी कमी झाली तसा त्याच्यावर हा हल्ला करण्यात आला. आता सलमानवर अशी वेळ येऊ नये यासाठीच सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली.
सध्या सगळीकडे लॉरेन्स बिश्णोई आणि गोल्डी ब्ररार या गँगची दहशत दिसून येत आहे.