काहीच दिवसांपूर्वी कंगनाचे ट्विटर अकाऊंट डिलीट करण्यात आले आणि आता तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट डिलीट करुन टाकण्यात आली आहे. कायमच खळबळजनक वक्तव्य करुन चर्चेत असलेली कंगना तिच्या सोशल अकाऊंटवरुन सतत कोणाला ना कोणाला टार्गेट करत असते. नुकतेच बंगालच्या निवडणुकीनंतर तिने काही वादग्रस्त ट्विट केल्यानंतर तिची ट्विटरवरुन कायमची हकालपट्टी करण्यात आली होती आणि आता तिची इन्स्टा पोस्ट डिलीट केल्यामुळे सगळाच गोंधळ निर्माण झाला आहे. तिची ही पोस्ट डिलीट करण्यात आल्याची माहिती स्वत: कंगनानेच तिच्या स्टोरीतून दिली आहे. पण आता तिचे हे इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट होईल की, काय अशी चर्चा सगळीकडे होऊ लागली आहे. दरम्यान, आता कंगनाने नेमकं काय केलं ते जाणून घेऊया.
कंगनाचं ट्विटर अकाऊंट झालं बॅन,सोशलवर मीम्सचा पाऊस
तर झालं असं
आता नव्याने वाद उत्पन्न होण्यासाठी कंगनाची नवी पोस्ट कारणीभूत ठरली आहे. कंगनाने पोस्ट करत तिच्या चाहत्यांना तिला कोरोना झाल्याची माहिती दिली होती. पण ही पोस्ट शेअर केल्यानंतर अवघ्या काहीच मिनिटात ही पोस्ट इन्स्टाग्रामकडून डिलीट करण्यात आली. ही पोस्ट परस्पर डिलीट केल्यानंतर चिडलेल्या कंगनाने तिच्या अकाऊंटवरुन काही स्टोरी शेअर केल्या त्यात तिने म्हटले की, मी मला कोरोना झाल्याचे सांगत कोरोनाला संपवून टाकेन अशी धमकी दिली होती. पण त्यामुळे कोणाच्या तरी भावना दुखावल्या असाव्यात. आतापर्यंत दहशतवादी आणि कम्युनिस्टांबद्दल सहानुभुती असलेली लोकं पाहिली होती. पण कोरोनाचाही असा एखादा फॅन क्लब असेल हे आता कळत आहे. या पुढे तिने लिहिले की, इन्स्टावर दोन दिवस झाले आहेत. या आठवड्यापेक्षा जास्त टिकू शकते असे वाटत नाही असे म्हणत तिने हे ही अकाऊंट डिलीट कराल का अशी विचारणाच इन्टाग्रामवर केली आहे.
पोस्टमध्ये काहीही आक्षेपार्ह नव्हते
कंगनाने ट्विटरवर जरी आपली मते उघडउघड व्यक्त केली असली तरी आता तिने इन्स्टावर तिला झालेल्या कोरोनाची लागण याविषयीच लिहिले होते. तिने एक फोटो शेअर करत तिला कोरोनाची कोणती लक्षणे झाली हे लिहिले होते. सुरुवातीला तिचे डोळे जळजळत होते. त्यानंतर तिला थोडासा अशक्तपणा जाणवू लागला होता. त्यामुळेच तिने टेस्ट करुन घेण्याचा निर्णय घेतला तर त्या टेस्टमध्ये तिला कोरोना झाल्याचे कळले. त्यानंतर तिने स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतले आहे. पण पुढे तिने लिहिले की, चला या कोव्हिडला नष्ट करुन टाकूयात. .या आजाराला आपल्यावर कोणताही परिणाम करायला देऊ नका. हा थोड्या काळासाठी येणारा ताप आहे. याकडे अधिक लक्ष देऊ नका. ‘हर हर महादेव’ अशी कॅप्शन लिहीत तिने ही पोस्ट शेअर केली आहे. पण ही पोस्ट अगदी परस्पर काही मिनिटांत डिलीट करण्यात आली.
जॅकलिनने केला पुढे मदतीचा हात, एक लाख लोकांच्या जेवणाची केली व्यवस्था
कंगनाच्या सोशल मीडिया अकाऊंटवर वॉच
वाद आणि कंगना यांचे जणू एक समीकरण आहे. कंगना कायमच अशा वादांमध्ये अडकलेली असते. कधी ती कोणत्या विषयावर आक्रमक होईल सांगता येत नाही. तिला अभिनयासोबतच राजकारणात फारच इंटरेस्ट असल्याचे कायम दिसते. तिचा आगामी चित्रपट हा जयललिता यांच्या आयुष्यावर आधारीत असून तो लवकरच वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आता या सगळ्या प्रकारानंतर कंगनाचे अकाऊंट किती काळासाठी टिकते यात थोडी शंकाच आहे.