हिंदी असो वा मराठी असो आता जुन्या मालिका प्रसिद्ध झाल्यावर लगेच त्याचे नवे सीझन येण्याचा ट्रेंड आहे. नुकताच ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेचा नवा सीझन येऊ घातला आहे आणि त्याचे प्रोमोही सुरू झाले आहेत. आता ‘अग्गबाई सासूबाई’ (Aggabai Sasubai) या मालिकेचा शेवट होणार असून लवकरच ‘अग्गंबाई सूनबाई’ (Aggabai Sunbai) ही मालिका सुरू होणार आहे. वेळीच ही मालिका संपवली असली तरीही आता पुढच्या सीझनमध्ये नक्की काय याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. निवेदिता सराफ (Nivedita Saraf) आणि गिरीश ओक (Girish Oak) यांच्या प्रमुख भूमिका असणारी ही मालिका आता प्रोमोमधून नक्कीच काहीतरी वेगळं दाखवून देत आहे. इतकंच नाही तर प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) या मालिकेत सूनबाईची भूमिका साकारत होती मात्र नव्या सीझनमध्ये तिच्या जागी नव्या अभिनेत्रीला संधी मिळाली आहे. त्यामुळे असं नक्की का असा प्रश्नही प्रेक्षकांना पडला आहे.
अभिनेता धैर्य घोलपची भरारी, हिंदी मालिकेत करतोय प्रमुख भूमिका
प्रोमो झाला प्रसारित
नुकताच नव्या मालिकेचा प्रोमो प्रसारित झाला असून निवेदिता सराफ ऑफिसच्या मीटिंगमध्ये असून गिरीश ओक स्वयंपाकघरात काम करताना दिसत आहे. इतकंच नाही तर अगदी त्यांच्या भूमिकाही बदलल्या असल्याचं दिसून येत आहे. नेहमी ज्याप्रमाणे बायको नवऱ्याला प्रश्न विचारते तसेच प्रश्न नवरा बायकोला विचारत असून आपण कामात असल्याचं बायको सांगत आहे आणि सूनबाई म्हणते की, घरात काम करणं किती कठीण आहे हे आता कळलंय ना? आता या मालिकेचा नक्की प्लॉट काय असणार आहे याची नक्कीच उत्सुकता लागली आहे. इतकंच नाही तर शुभ्रा अर्थात सूनबाईच्या कडेवर एक लहान मुलंही दाखविण्यात आलं आहे. त्यामुळे सूनबाई बदलली असली तरीही सोहम अर्थात आशुतोष पत्की (Ashutosh Patki) या मालिकेत नाही याचेही सर्वाना वाईट वाटत आहे. आता सर्वांचा लाडक्या बबड्या मात्र यात नसेल. येत्या 15 मार्चपासून ही मालिका सुरू होणार आहे. सध्या बऱ्याच नव्या मालिका झी वर सुरू होणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामध्ये या मालिकेमध्येही बदल करण्यात आला असून नव्या अभिनेत्रीची वर्णी लागली आहे.
आर्चीच्या परशाचा मेकओव्हर पाहून व्हाल थक्क, दिसतोय खूपच हँडसम
उमा पेंढारकर साकारणार शुभ्रा
‘स्वामिनी’ मालिकेत पार्वतीबाईंच्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मन जिंकणारी अभिनेत्री उमा पेंढाकरकर आता तेजश्री प्रधानने साकारलेली शुभ्रा साकारणार आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांचे मन जिंकले होते. त्यामुळे आता ही भूमिका उमा कशी साकरणार आणि प्रेक्षक तिला या भूमिकेत स्वीकारतील का असा प्रश्नही नक्कीच आहे. याशिवाय अन्य कोणते कलाकार आहेत याचीही उत्सुकता प्रेक्षकांना आहे. कारण या मालिकेतील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली होती. आता नवी शुभ्रा तर कळली आहे मात्र सोहमची भूमिका कोण साकारणार याची अजून कल्पना नाही. त्यामुळे ही उत्सुकता ताणून धरली आहे. दरम्यान पहिल्या सीझनप्रमाणेच हा नवा सीझनही लोकप्रियता गाठेल अशी निर्मात्यांना खात्री आहे. त्यामुळे आता या नव्या मालिकेची नक्की काय कथा असणार आणि प्रेक्षकांचे कसे मनोरंजन करणार ते पाहणे उत्सुकतेचे आहे.
अदिती मलिकचं झालं डोहाळजेवण, मोहित मलिकने आनंद केला व्यक्त
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक