ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
air-conditioner-and-cooler-for-a-baby-good-or-bad-in-marathi

तुमच्या बाळासाठी एसी अथवा कुलरची हवा आहे का योग्य, काय आहे तथ्य

उन्हाळा सहन करणं मोठ्या व्यक्तींनाही तितकंसं जमत नाही तर बाळांची आणि लहान मुलांची हालत किती वाईट होत असेल. घरातून, छतावरूनदेखील गरम हवा येत राहाते. इतकंच काय तर पंख्याची हवाही इतकी गरम येते की, मोठ्या माणसांनाही त्रास होतो. अशा परिस्थितीत घरातील हवामान थंड राहावे यासाठी अनेक घरांमध्ये एसी आणि कूलरचा वापर करण्यात येतो. उन्हाळ्याच्या दिवसात एसी आणि कूलर म्हणजे एखाद्या वरदानापेक्षा नक्कीच कमी नाही. पण अगदी नवजात बाळ असेल तर त्याच्या आई – वडिलांसाठी नक्कीच हा प्रश्न पडतो की, बाळासाठी एसी अथवा कूलरची हवा सुरक्षित आहे की नाही अथवा योग्य आहे की नाही? एप्रिल – मे मध्ये जन्म झालेल्या बाळांना आणि आईलाही उन्हाळ्याचा खूपच त्रास होतो, मग अशावेळी ए. सी. योग्य आहे की नाही असा प्रश्न आईला सतावणं नक्कीच योग्य आहे. पण पूर्वपरंपरागत हवेत राहू नये असं सांगण्यात येतं. त्यामुळे अनेक नवजात आईलाही हे त्रासदायक ठरतं की नक्की काय करावं. यासाठी आम्ही या लेखातून तुम्हाला योग्य माहिती देत आहोत. 

लहान बाळांना थंड वातावरणात ठेवणं आहे योग्य 

ज्याप्रमाणे मोठ्या व्यक्ती उन्हाळा सहन करू शकतात, त्याप्रमाणे लहान मुलं अथवा नवजात बाळांना उन्हाळ्याचा त्रास सहन करणं सोपं होत नाही. लहान मुलं आपल्या शरीराचे तापमान मोठ्यांप्रमाणे व्यवस्थित ठेऊ शकत नाहीत. त्यामुळे उन्हाळ्यात लहान मुलं आजारी पडतात. त्यामुळे तुम्ही लहान मुलांना अथवा नवजात बाळांना थंड वातावरणात ठेवणे योग्य आहे. म्हणजेच तुम्ही तुमच्या बाळासाठी एसी अथवा कुलरचा वापर करून घेऊ शकता. पण हा वापर करत असताना तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणेही तितकेच अनिवार्य आहे. या गोष्टी नक्की कोणत्या आहेत ते आपण जाणून घेऊया. 

  • तुमच्या घरात एसी असेल तर तुम्ही बाळासाठी त्याचे टेंम्परेचर असे सेट करा जेणेकरून खोलीमध्ये अधिक थंडीही नसेल आणि उन्हाळाही जाणवणार नाही. अधिक थंडी झाली तर बाळाला खोकला, सर्दीसारख्या समस्या उद्भवू शकतात
  • उन्हाळ्यात उष्णतेपासून वाचण्यासाठी लहान मुलांना कैरी पन्हे, कोकम सरबत द्यावे 
  • मुलांना एसी अथवा कुलरची हवा डायरेक्ट अंगावर येईल अशा पद्धतीने झोपवू नका अथवा बसवू नका 
  • कूलर चालवताना खिडकी अथवा दरवाजा उघडा ठेवा, जेणेकरून हवा खेळती राहील आणि खोलीचे तापमानही अगदी योग्य राहील. तसंच तुम्हाला घामामुळे चिकटपणा जाणवणार नाही 
  • उन्हाळ्याच्या दिवसात कॉटन कपडे सर्वाधिक चांगले ठरतात. त्यामुळे लहान मुलांनाही कॉटनचे अथवा सुती कपडे घाला. तसंच मुलांना थोडे ढगळ कपडे घाला. एसी अथवा कुलरचे तापमान कसे आहे यानुसार तुम्ही तुमच्या बाळाला कपडे घाला 
  • एसी वा कुलर चालू असताना बाळाच्या अंगावर लहानशी गोधडी नक्की ओढून ठेवा. लक्षात ठेवा ही गोधडी बाळ आपल्या तोंडावर तर झोपेत घेत नाही ना याकडे वेळोवेळी लक्ष ठेवा 
  • कुलरची नियमित स्वच्छता करा. रोज त्याचे पाणी बदला. जेणेकरून बाळाला नेहमी ताजी हवा मिळेल. तसंच एसी नियमित वापरत असाल तर वेळोवेळी त्याची सर्व्हिसिंग करून घेणेही गरजेचे आहे

बाळासाठी अथवा तुमच्या लहान मुलांसाठी तुम्ही एसी वा कुलर वापरत असाल तर या महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही नक्की लक्षात ठेवायला हव्या. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
02 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT