ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
लवकरच येणार ‘दृश्यम 2’ चा हिंदी रिमेक, अजयचा दिसणार नवा अंदाज

लवकरच येणार ‘दृश्यम 2’ चा हिंदी रिमेक, अजयचा दिसणार नवा अंदाज

अजय देवगनचा दृश्यम पाहिल्यावर अनेक दिवस लोकांच्या मनात “2 ऑक्टोबरला काय घडलं” हा प्रश्न घोळत राहिला होता. या चित्रपटात विषय, बांधणी, अजय आणि तब्बूचा अभिनय अशा अनेक जमेच्या बाजू होत्या. सहाजिकच बॉक्सऑफिसवर हिट ठरला होता. काही दिवसांपूर्वीच मूळ मल्याळी भाषेतील ‘दृष्यम 2’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला मिळणारी दाद पाहता चाहत्यांना हिंदीमध्येही या चित्रपटाचा रिमेक व्हावा असं सहज वाटू लागलं. त्यामुळे अनेकांना आशा होती की अजयच्या दृश्यमचा सिक्वलही लवकरच तयार व्हावा. त्यानुसार अजय देवगन लवकरच एका वेगळ्या अंदाजामध्ये ‘दृश्यम 2’ हिंदीमधून प्रेक्षकांच्या समोर येण्यासाठी सज्ज झाला आहे. कारण नुकतीच ‘दृश्यम 2’ च्या हिंदी रिमेकची जाहिर घोषणा करण्यात आली आहे. ज्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाबाबत जाणून घेण्याची उत्कंठा लागली आहे. 

कसा असणार ‘दृश्यम 2’ मध्ये अजयचा अंदाज

अजयच्या 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या दृश्यममध्ये श्रेया सरण, तब्बू, इशिता दत्ता यांची प्रमुख भूमिका होती. हा चित्रपट सुपरस्टार मोहनलाल यांची प्रमुख भूमिका असलेल्या मल्याळी भाषेतील दृश्यमचा रिमेक होता. मल्याळी भाषेतील दृश्यम 2013 मध्ये प्रदर्शित झाला होता. एका केबल ऑपरेटरच्या भन्नाट बुद्धीमत्तेची झलक या चित्रपटातून दिसली होती. चित्रपटातील रहस्यमयी सीन्स प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झाले होते. काही दिवसांपूर्वीच मल्याळी भाषेतील दृश्यम 2 प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे यश पाहता कुमार मंगत आणि अभिषेक पाठक यांच्या पॅनोरमा स्टुडिओज इंटरनॅशनल या प्रॉडक्शन कंपनीने दृश्यम 2 च्या रिमेकचे हक्क खरेदी केले आहेत. या चित्रपटात अजय देवगनचा अंदाज नेमका कसा असेल याबाबत अजूनही कोणत माहिती मिळालेली नाही. मात्र या चित्रपटावर काम सुरू झालेल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. 

कधी होणार हिंदी ‘दृश्यम 2’ प्रदर्शित

या आधी दृश्यमच्या हिंदी रिमेकची निर्मिती पॅनोरेमा स्टुडिओजनेच केली होती. दिग्दर्शक निशिकांत कामतने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. मात्र काही महिन्यांपूर्वीच निशिकांत कामत यांचे निधन झालं. दृश्यमच्या हिंदी सिक्वलचं दिग्दर्शन कोण करणार ही गोष्ट अजूनही गुलदस्त्यातच आहे. ज्यामुळे या चित्रपटाबाबत आता अधिकच उत्सुकता वाढली आहे. अजय देवगनसोबत या चित्रपटात तब्बू असणार का याबाबत अनेक अंदाज बांधले जात होते. मात्र या  दोघांनी चित्रपटात काम करण्यास होकार दिल्याने चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.अजय सध्या रूद्र या वेबसिरिजच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ज्यामुळे तो ही वेबसिरिज पूर्ण झाल्यावर दृश्यम 2 च्या शूटिंगला सुरूवात करणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग या वर्षीच्या शेवटपर्यंत सुरू केलं जाणार असून 2022 मध्ये दृश्यम 2 चा हिंदी रिमेक प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. अजयच्या भुज दी प्राईड ऑफ इंडिया, मैदान आणि मेडे अशा अनेक चित्रपटांची चाहते वाट पाहत आहेत. संजय लीला भन्सालीच्या ‘गंगुबाई काठियावाडी’मध्येही त्याची स्पेशल भूमिका आहे. शिवाय त्याचा ‘चाणक्य’ही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

आमिर खान लडाखमध्ये करत आहे शूटिंग,असा रंगणार ‘लाल सिंह चड्ढा’चा वॉर सीन

सलमानचा ‘राधे’ होणार थिएटरमध्ये रिलीज, बुकिंगला झाली सुरुवात

पुन्हा भेटीला येणार ‘जिवलगा’ मालिका

ADVERTISEMENT
04 May 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT