ADVERTISEMENT
home / मनोरंजन
अजय आणि अक्षय झाले ट्रोल

पानमसाल्याच्या जाहिरातीमुळे अक्षय आणि अजय झाले ट्रोल

 एखादा अभिनेता स्टार झाला की, त्याच्या अगदी बारीक सारीक गोष्टीकडे सगळ्यांचे लक्ष असते. चित्रपट निवडताना, समाजपयोगी काम करताना त्यांच्या आवडीनिवडी या बारकाईने पाहिल्या जातात. सध्या बॉलिवूडचे दोन सुपरस्टार चांगलेच ट्रोल होत आहेत. त्यांनी केलेल्या पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे त्यांना प्रेक्षकांनी चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. आदर्श अशा कॅटेगिरीमध्ये येणाऱ्या अभिनेत्यांनी अशा चुकीच्या जाहिराती करुन आपली किंमत कमी करुन घेतली आहे. अशा कमेंट्स सोशल मीडियातून येऊ लागल्या आहेत. पण अक्षय आणि अजयवर ट्रोल होण्याची वेळ आली तरी कशी घेऊया जाणून

अजय आणि अक्षयने केली जाहिरात

अजय आणि अक्षय हे दोन्ही चेहरे इंडस्ट्रीतील प्रसिद्ध असे चेहरे आहेत.सध्या अजय देवगण हा त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. रनवे 34 ( Runway 34) या चित्रपटासाठी तो सध्या अनेक ठिकाणी जात आहे. अजय आणि अक्षय या दोघांनीही एका ब्रँडसाठी एक जाहिरात केली आहे. या जाहिरातीतील गोष्ट म्हणजे गुटखा. हा लोकांच्या आरोग्यासाठी चांगला नाही. त्याच्या सवयीमुळे लोकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.असे असताना त्यांनी अशी जाहिरात केल्यामुळे या दोघांवर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे.

अजयने दिले उत्तर

अजयने यासंदर्भात एका मुलाखतीत उत्तर दिले आहे. त्याला ज्यावेळी या जाहिरातीबद्दल विचारण्यात आले त्याने लागलीच या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. त्याने सांगितले की, मी एका वेलचीची जाहिरात करतो. ही वस्तू जर इतकी खराब आणि वाईट असती तर ती विकली गेली नसती. त्यामुळे मी अशी कोणतीही जाहिरात केलेली नाही जी समाजविघातक आहे. प्रश्न हा जाहिरातीचा नाही हे मलाही माहीत आहे. पण त्यात असलेली वस्तू ही इतकी वाईट असली तर विकली जायला नको. 

अक्षय अडकला तावडीत

अजयने आपली बाजू मांडली असली तरी देखील अक्षय मात्र यामध्ये अडकण्याची शक्यता आहे. कारण अक्षयचा एक जुना व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये तो स्वस्थ देशाच्या भवितव्यासाठी तो अनेक जाहिरातींच्या ऑफर्स येऊनही मी ही जाहिरात करत नाही असे त्याने ठामपणे सांगितले होते. पण आता अक्षयने ही जाहिरात केल्यामुळे आता तोही ट्रोल होऊ लागला आहे. या जाहिरातीत अक्षय, शाहरुख आणि अजय दिसत आहे. पण लोकांचा राग हा अजय आणि अक्षयवर असल्याचे दिसत आहे. अक्षय आणि अजयकडून अशा कोणत्याही गोष्टीची अपेक्षा कधीच नव्हती. त्यामुळेच की काय अक्षय यांच्या तावडीत सापडला आहे. 

ADVERTISEMENT

जाहिरातीमुळे बसेल का फटका?

एक चुकीचा निर्णय अनेकदा सेलिब्रिटींचे करिअर उद्धवस्त करतात. अक्षय आणि अजय  गेल्या काही वर्षांपासून इंडस्ट्रीवर राज करत आहेत. त्यांच्या चित्रपटांच्या निवडीमुळे आणि देशप्रेमामुळे त्याचे कोट्यांनी चाहते आहेत. या एका जाहिरातीमुळे अनेकांची मने दुखावली आहेत. त्याचे नुकसान या दोघांना कितपत होते ते येत्या काळात कळेल. 

अजय आणि अक्षयच्या या जाहिरातीबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला नक्की कळवा.

20 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT