ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
आरआरआरच्या सक्सेस पार्टीत का नाही दिसले आलिया भट आणि अजय देवगण

आरआरआरच्या सक्सेस पार्टीत का नाही दिसले आलिया भट आणि अजय देवगण

फिल्ममेकर एस एस राजमौली यांना बाहुबली चित्रपटामुळे लोकप्रियता मिळाली. आता त्यांचा आरआरआर चित्रपटही सगळीकडे धुमाकूळ घालत आहे. आरआरआरने तर बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाला असल्यामुळे जगभरात या चित्रपटाचा डंका वाजत आहे. आजवर या चित्रपटाने जवळजवळ 1000 कोटींची कमाई केल्याची चर्चा आहे. चित्रपटाचे यश सेलिब्रेट करण्यासाठी निर्मात्यांनी नुकतीच एक मोठी पार्टी दिली होती. मात्र या सक्सेस पार्टीत बॉलीवूडच्या आलिया भट आणि अजय देवगणने मात्र पाठ फिरवल्याची चर्चा आहे.

आलिया आणि अजय का नाही गेले पार्टीला

एस. एस. राजमौली यांनी आरआरआरची सक्सेस पार्टी मुंबईत आयोजित केली होती. या चित्रपटातील मुख्य कलाकार रामचरण आणि ज्युनिअर एनटीआर  यांनी पार्टीत खूप धमाल केली. सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलं ते रामचरणने… कारण राम चरण या पार्टीत अनवाणी आला होता. याशिवाय या पार्टीत बॉलीवूड स्टार आमिर खान, करण जौहर, राखी सावंत, जयंतीलाल गडा, सतिश कौशिक, जॉनी लिवर, जावेद अख्तर अशा सेलिब्रेटींची मांदियाळी दिसून आली. मात्र या चित्रपटात भूमिका साकारणारे बॉलीवूड स्टार आलिया भट आणि अजय देवगण मात्र या पार्टीत मुळीच दिसले नाहीत. ज्यामुळे आलिया आणि अजयचं एस. एस. राजमौलीशी काहीतरी बिनसलं असल्याची चर्चा सुरू झाली. 

काय आहे खरं कारण

आलिया आणि अजय आरआरआरच्या सक्सेस पार्टीत न दिसल्यामुळे सोशल मीडियावर याची चर्चा रंगली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपासून आलिया निर्मात्यांवर रागावली आहे. कारण तिला या चित्रपटात खूपच कमी स्पेस देण्यात आली आहे. ज्यामुळे तिने इन्स्टा अकाऊंटवरील आरआरआरच्या सर्व पोस्ट डिलीट केल्या अशी चर्चा होती. शिवाय तिने एस. एस. राजमौली यांनाही अनफॉलो केल्याचं बोललं जातं होतं. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असं काहिच घडलेलं नसून,आलियाने याबाबत स्पष्टीकरण आधीच दिलेलं आहे. आता आलिया आणि रणबीर लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. त्यामुळे सध्या आलिया तिच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहे. ज्यामुळे ती यापार्टीत उपस्थित राहू शकली नाही. मात्र असं असलं तरी अजय देवगणचं या पार्टीत न येणंही सर्वांच्या मनात प्रश्न निर्माण करणारं आहेच. असो नेमकं काय घडलं हे जरी उलगडलं नसलं तरी या दोघांचं एस. एस. राजमौलीसोबत असलेलं नातं आता  पहिल्यासारखं नक्कीच नाही हे मात्र दिसून आलं. 

07 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT