दिनांक 19 नोव्हेंबर 2021 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला भूषण प्रधान (Bhushan Pradhan) आणि प्रार्थना बेहरे (Prathana Behere) चित्रीत अजिंक्य या चित्रपटाचे सोशल मीडिया आणि चित्रपट विश्लेषकांकडून कौतुक होताना दिसत आहे. अमराठी निर्माते अरुणकांत शुक्ला, नीरज आनंद, राघवेंद्र के. बाजपेयी, बाबालाल शेख, राहुल लोंढे, आणि वेद. पी शर्मा यांनी अजिंक्य या चित्रपटात शेतकऱ्यांच्या व्यथा आणि त्यावर तोडगा काढणारा तरुण याची कथा दर्शविण्यात आल्या कारणाने त्यांनी हा चित्रपट संपूर्णपणे भारतीय शेतकऱ्यांना समर्पित करत आहोत असे म्हटले आहे. शेतकरी चळवळीसाठी समर्पित होणारा हा पहिलाच मराठी चित्रपट ठरू शकेल. या चित्रपटाचा विषय हा संपूर्णतः शेतकऱ्यांशी निगडीत असल्यामुळेच देशाच्या शेतकऱ्यांना हा चित्रपट समर्पित करण्यात आला आहेत. पहिल्यांदाच भूषण प्रधान आणि प्रार्थना बेहरे अशा धाटणीचा चित्रपट करत आहेत.
अधिक वाचा – आलिया भट झाली ट्रोल, कारण ऐकून व्हाल हैराण
शेतकऱ्यांवर भाष्य करणारा चित्रपट
शेतकऱ्यांना होणाऱ्या फायद्याच्या सर्वात मोठ्या बाबींवर भाष्य करणाऱ्या अजिंक्यची आणि सध्या देशात या विषयी सुरू असणाऱ्या घडामोडी याच कारणामुळे सोशल मीडियावर देखील या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. आयएमडीबी (IMDb) वर सदर चित्रपटाला 10 पैकी 10 रेटिंग्ज मिळाले आहेत. कालपासून ट्विटरवरदेखील मोदी इज अजिंक्य टुडे (#ModiisAjinkyatoday) हा हॅशटॅग ट्रेंड होत असून लोकांमार्फत अजिंक्य या चित्रपटाबद्दल खूप बोललं जात आहे. चित्रपटाचे निर्माते हे जरी अमराठी असले तरी त्यांना भारतीय शेतकरी आणि त्यांच्या व्यथा ते जवळून जाणतात आणि म्हणूनच दिग्दर्शक अ. कदिर यांच्या उत्कृष्ट संकल्पनेला त्यांनी होकार देत या चित्रपटासाठी आर्थिक सहकार्य उभे करण्याचे धाडस केले. चित्रपटाचे मुख्य कलाकार म्हणजेच अजिंक्य आणि रितिका च्या भूमिकेत असलेले भूषण प्रधान आणि प्रार्थना बेहरे यांनादेखील याच संकल्पनेमुळे चित्रपटात काम करण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली. याबद्दल निर्माते नीरज आनंद सांगतात, “चित्रपट हा केवळ मनोरंजनाचा भाग नसून यातून जनतेचे प्रबोधन व्हावे आणि याच उद्देशाने भारताच्या विविध ठिकाणाहून आलेले आम्ही एकत्र येऊन एका सिनेमासाठी काम करत आहोत. लावलेल्या पैश्याच्या परतफेडीचा विचार न करता एक ज्वलंत विषय लोकांसमोर आणणे आम्हाला महत्वाचे वाटते. हा चित्रपट देशाला जगवणारे अन्नदाते म्हणजेच आपले शेतकरी बंधू यांना समर्पित करण्याची आमची इच्छा आहे.
अधिक वाचा – अभिनेत्री माधवी गोगटेचे निधन, अनुपमामध्ये साकारली होती आईची भूमिका
चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद
कोरोनाच्या काळात कोणतेच थिएटर चालू नव्हते. आता चित्रपटगृहात प्रेक्षक जाऊ लागले आहेत आणि मराठी चित्रपटांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. थोडा वेगळ्या धाटणीचा असूनही अजिंक्य चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसंच भूषण प्रधान आणि प्रार्थना बेहेरे यांच्या कामाचे कौतुकही होत आहेत. शिवाय अशा वेगळ्या विषयाला हात घातल्यामुळे सोशल मीडियावरही या चित्रपटाचे सध्या कौतुक करण्यात येत आहे. शिवाय या चित्रपटाला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि मराठी प्रेक्षक पुन्हा एकदा चांगल्या विषयाकडे वळत असून थिएटरमध्ये आपला सहभागही नोंदवत आहेत याचाही एक वेगळा आनंद सध्या अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे एकंदरीतच मराठी चित्रपटालाही या नव्या चित्रपटांमुळे सुगीचे दिवस आले आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
अधिक वाचा – देवमाणूस पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक