ऑनस्क्रिन नाही पण ऑफस्क्रिन ज्या जोडीची सतत चर्चा होते ती म्हणजे अजय- काजोलची. बॉलीवूडच्या पावर कपलपैकी हे एक कपल आहे. ज्यांचे नाव कपलच्या यादीत कायमच पुढे असते. नुकतीच या दोघांच्या रिललाईफ नात्याला 22 वर्षे पूर्ण झाली आहेत. नुकताच अजय देवगणने या संदर्भातील एक व्हिडिओ पोस्ट करत त्याखाली एक छान कॅप्शन लिहिली ती म्हणजे ‘प्यार तो होना ही था’ आता तुम्हाला अजूनही याची हिंट मिळाली नसेल तर मग अजय काजोलच्या या 22 वर्षांच्या रिललाईफविषयी जाणून घेऊया अधिक माहिती
सुश्मिता सेनच्या भावाला मिळाली बिग बॉस 14 ची ऑफर, मात्र राजीवची आहे एक अट
प्यार तो होना ही था
22 years in real and reel.
Pyaar To Hona Hi Tha 🌹🌹🌹🌹@itsKajolD pic.twitter.com/TKmVfRiU8h— Ajay Devgn (@ajaydevgn) July 15, 2020
आता जर तुम्हाला माहीत असेल तर अजय-काजोलची ही जोडी लोकांना सर्वात जास्त आवडली होती तो चित्रपट म्हणजे ‘प्यार तो होना ही था’ 15 जुलै 1998 रोजी हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाने चांगली कमाई तर केलीच. पण खरी कमाई या दोघांनी केली. या चित्रपटाच्या सेटवरच दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केले. त्यामुळे त्यांच्या लग्नालाही 22 वर्षे पूर्ण झाली आहेत. अजय आणि काजोल यांनी केलेला हा पहिला चित्रपट या पहिल्याच चित्रपटात ते एकमेकांच्या प्रेमात बुडाले. लग्नाचा विचार करता अजयने अत्यंत साध्यापद्धतीने लग्न केले. त्यांच्या लग्नातील अनेक फोटो आजही व्हायरल होत असतात. त्यामुळे त्यांच्या या रिल आणि रिअल लाईफ प्रेमासाठी हा चित्रपट फारच महत्वाचा आहे. म्हणूनच अजयने खास ट्विट करत हा आनंद शेअर केला आहे. त्यावर त्यांच्या फॅन्सनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
या चित्रपटातही दिसली जोडी
अजय- काजोलची जोडी फार चित्रपटांमधून दिसली नाही. ‘प्यार तो होना ही था’ या चित्रपटानंतर त्यांनी राजू चाचा, इश्क सारख्या चित्रपटांमधूनही काम केले. 2019 साली ही जोडी पुन्हा दिसली ती ‘तान्हाजी’ या चित्रपटात. 2019 साली आलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारच यशस्वी ठरला. या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले. त्यामुळे पुन्हा एकदा ही जोडी चर्चेचा विषय ठरली. एरव्ही निसामुळे ही दोघं अनेकदा चर्चेत असतात. स्टार किड असलेली निसा चित्रपटात पदार्पण करेल असे अनेकांना वाटते.
पानिपत’मधील या मराठमोळ्या अभिनेत्रीने कोरोना काळात केले लग्न, फोटो व्हायरल
लवकरच दिसणार या चित्रपटात
चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर लॉकडाऊनमध्ये चित्रपटांचे वेळापत्रक पूर्णत: बिघडले आहे. पण तरीदेखील अजय देवगण ‘सूर्यवंशी’ चित्रपटात कॅमिओ देणार आहे. सिंघमचा सिक्वल असल्यामुळे तो दिसावा अशी लोकांचीही अपेक्षा आहे. याशिवाय तो अनेक प्रोजेक्टसमध्ये सध्या असल्याचे कळत आहे. तर दुसरीकडे काजोलच्या चित्रपटांचा विचार करता ती पूर्णपणे सिनेमांकडे वळली नाही. ती अजूनही घर आणि काम असे दोन्ही सांभाळत आहे. त्यामुळे ती पुढील काळात काही प्रोजेक्टमध्ये दिसेल अशी अपेक्षा आहे. देवी नावाच्या एका शॉर्टफिल्ममध्येही काजोल दिसली होती. त्यामुळे वेबसिरिजच्या माध्यमातून काजोल दिसेल अशी अपेक्षा आहे.
सध्या तरी काजोल आणि अजयचा आनंद या चित्रपटासोबत म्हणजेच रिललाईफसोबत रिअललाईफमध्येही आला आहे. त्याचा फॅन्सनाही आनंद आहे.
मालिकांचे काम बंद करणे आता अशक्य, निर्माते या परिस्थितीसाठी तयार