आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचं लग्न 9 मार्चला होत आहे. या क्यूट कपलमधली केमिस्ट्रीही आता पाहायला मिळत आहे. या दोघांचे प्रि-वेडींग फंक्शन्सही सुरू आहेत.
या दोघांच्या लग्नाआधी अंबानी कुटुंबियांकडून अन्नसेवेचा कार्यक्रम ठेवण्यात आला. या कार्यक्रमात जवळजवळ 2000 गरीब विद्यार्थांसाठी जेवण आयोजन करण्यात आलं. याच कार्यक्रमात आकाश आणि श्लोकानेही सेवा केली.
सध्या या कार्यक्रमातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
या कार्यक्रमात हे दोघंही अगदी जोडीने सर्व मुलांना जेवण वाढत होते. पाहा आकाश आणि श्लोकाचा हा क्यूट केमिस्टी व्हिडीओ.
या व्हिडीओमध्ये फॅमिली फोटोनंतर जेव्हा आकाश आणि श्लोकाचे फोटो काढण्यात येत होते तेव्हा आकाशने हसत सांगितलं की, श्लोकाचा चांगला फोटो काढा हा ती खूप नर्व्हस होते. तर जेव्हा मीडीयाने फक्त आकाशचे फोटो काढायला सुरूवात केली, तर तो मजेतच म्हणाला की, अरे लग्न होणार आहे, माझ्या एकट्याचा फोटो नाही काढायचा. आता आम्ही दोघं एक आहोत. आकाश असं म्हणताच श्लोका लाजली.
आकाशने या कार्यक्रमासाठी ग्रीन कुर्ती आणि व्हाईट पायजमासोबत नेहरू जॅकेट घातलं होतं तर श्लोकाने मंजेटा रंगाचा कुर्ता आणि ऑरेंज रंगाचा दुप्पटा असं कॉम्बिनेशन केलं होतं. या दरम्यान उपस्थित मीडियाने आकाश आणि श्लोकाचे अनेक फोटोज आणि व्हिडीओ घेतले.
आकाश-श्लोकासोबतच नीता आणि मुकेश अंबानी हेसुद्धा अन्नसेवेमध्ये सहभागी होते.
आकाश-श्लोकाचा शाही विवाहसोहळा
आकाश आणि श्लोकाचं लग्न मुंबईतील जियो वर्ल्ड सेंटरमध्ये होणार आहे. त्यानंतर 10 मार्चला मंगल पाठ ठेवण्यात येणार आहे. तर 11 मार्चला ग्रँड रिसेप्शन असेल, ज्यामध्ये बॉलीवूड सेलेब्सचाही समावेश असेल. या आधी स्वित्झर्लंड इथल्या सेंट मॉरिट्झ येथे आकाश आणि श्लोकाचं प्रि-वेडींग सेलिब्रेशन ठेवण्यात आलं होतं. ज्यामध्ये शाहरूख खान, आमीर खान, आलिया भट, रणबीर कपूर आणि करण जोहरसोबत अनेक सेलिब्रिटीज सामील झाले होते.