ADVERTISEMENT
home / Recipes
akki roti recipe in marathi

नाश्त्यामध्ये बनवा अक्की रोटी, नाही लागणार अन्य पदार्थांची गरज

रोज सकाळी नाश्ता काय बनवायचा हा प्रश्न आपल्याकडे प्रत्येक गृहिणीला असतोच. भारतीय पदार्थांमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या रोटी बनवत असतो. वेगवेगळ्या धान्यांच्या रोटी बनवणे काही आपल्यासाठी नवे नाही. पण त्यासोबत वेगळी भाजी आणि मग चटणी किंवा लोणचे हेदेखील आपल्याला चवीसाठी लागते. पण तुम्हाला माहीत आहे का घाईच्या वेळी तुम्ही एक अशी रोटी पटकन बनवू शकता ज्याच्याबरोबर तुम्हाला इतर कशाचीही गरज भासणार नाही. सकाळच्या घाईत झटपट नाश्ता काय बनवता येईल याकडे आपण जास्त लक्ष देतो. तुम्हाला आम्ही अशाच अक्की रोटीची रेसिपी या लेखातून देत आहोत. ही अक्की रोटी (akki roti) तुम्ही नाश्ता, दुपारचे जेवण अथवा रात्रीच्या जेवणात कधीही खाऊ शकता. कर्नाटकमध्ये ही रोटी जास्त प्रसिद्ध आहे. अक्की रोटी तांदळाच्या पिठापासून तयार करता येते आणि याचा स्वादही उत्तम असतो. पाहूया तर मग काय आहे या झटपट तयार होणाऱ्या अक्की रोटीची रेसिपी. 

अक्की रोटीसाठी लागणारे साहित्य

  • 1 कप तांदळाचे पिठ 
  • 1 बारीक चिरलेला कांदा 
  • 3 चमचे खवणलेले ओले खोबरे (किसलेले सुके खोबरे)
  • अर्धे चिरलेले गाजर
  • 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  • 2-3 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर
  • अर्धा चमचा जिरे 
  • चवीनुसार मीठ 
  • अर्धा चमचा बारीक चिरलेले आले 
  • आवश्यकतेनुसार पाणी 
  • आवश्यकतेनुसार तेल 
  • 1 चमचा भिजवलेली चणाडाळ (पर्यायी)

बनविण्याची पद्धत 

  • सर्वात पहिले तुम्हाला अक्की रोटी बनविण्यासठी त्याचे पीठ तयार करून घ्यावे लागेल. यासाठी तुम्ही तांदळाचे पीठ, खोबरे, जिरे, हिरवी मिरची, कोथिंबीर, कांदा, मीठ एका भांड्यात मिक्स करा 
  • तुम्हाला रोटी पातळ हवी असेल तर भाजी बारीक चिरून घ्या. तुम्हाला हवं असल्यास, तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्याही घालू शकता आणि भिजवलेली चणाडाळही मिक्स करू शकता. चणाडाळ घालायची असेल तर किमान अर्धा तास आधी भिजवा आणि मिक्सरमधून वाटून घ्या
  • आता हे सर्व मिक्स करून पाण्याने व्यवस्थित भिजवून घ्या. थालिपीठाच्या अंदाजाप्रमाणे हे पीठ भिजवा. अगदी पातळही नाही आणि अगदी घट्टही नाही
  • पोळपाटावर तुम्ही प्लास्टिक कागद घ्या आणि त्यावर याचे गोळे करून थालिपिठाप्रमाणे थापा. अक्की रोटी लाटली जात नाही तर थापूनच करावी लागते 
  • त्यानंतर तव्यावर तेल सोडून ही रोटी भाजून घ्या. तुम्हाला हवं असल्यास, तेलाऐवजी तुम्ही बटरचाही वापर करू शकता. या रोटीला अधिक स्वाद मिळतो  
  • मंद आचेवर तुम्ही ही रोटी भाजून घ्या. आच जास्त केल्यास, ही रोटी जळेल. त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक ही रोटी भाजून घ्या. दोन्ही बाजून शेकून झाल्यावर गरमागरम खायला द्या. ही रोटी तुम्ही नुसती खाऊ शकता. पण तुम्हाला नुसती आवडत नसेल तर तुम्ही खोबऱ्याची चटणी अथवा कोणत्याही भाजीसहदेखील याचा आस्वाद घेऊ शकता. 

टीप – तांदळाचे पीठ असल्यामुळे ही रोटी मस्त भाजून घेतल्यावर त्याचे काठ कुरकुरीत होतात. तुम्हाला अधिक कुरकुरीत हवी असेल तर मंद गॅसवर भाजा आणि तेलाऐवजी तुम्ही बटरचा वापर करा. यासाठी तुम्ही घरातील तुपाचाही वापर करू शकता. तेलापेक्षा बटर अथवा तूप वापरल्यास त्याचा अधिक चांगला स्वाद मिळतो. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

05 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT