ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
अक्षय कुमार आणि रोहित शेट्टी दरम्यान हाणामारी, व्हायरल झाला व्हिडिओ

अक्षय कुमार आणि रोहित शेट्टी दरम्यान हाणामारी, व्हायरल झाला व्हिडिओ

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) लवकरच रोहित शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे.सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू आहे. पण अक्षय कुमार आणि रोहित शेट्टीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) आणि अक्षयकुमार यांच्यामध्ये हाणामारी चालल्याचं दिसून येत आहे. त्यांचं भांडण इतकं वाढलं की ते सोडवण्यासाठी यामध्ये पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. या व्हिडिओवर सध्या प्रेक्षक आणि चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. नक्की या दोघांच्या  दरम्यान काय बिघडलं आणि भांडण इतकं विकोपाला का गेलं याचीही आता चर्चा रंगली आहे. काहीही दुसरा विचार करायच्या आधी नक्की काय आहे प्रकरण जाणून घ्या. 

रोहित शेट्टीच्या कुटुंबामध्ये झालं नव्या पाहुण्याचं आगमन

अक्षय कुमारने केला व्हिडिओ शेअर

अक्षय कुमारने आपल्या आणि रोहित शेट्टी दरम्यान झालेल्या मारामारीचा व्हिडिओ स्वतः शेअर केला आहे. तुम्ही कोणत्याही निर्णयावर येण्याआधी हा व्हायरल झालेला व्हिडिओ नक्की पाहा. वास्तविक व्हिडिओमध्ये बॉलीवूडमधील हे दोन्ही कलाकार मजेदार अंदाजात एकमेकांना मारत आहेत. व्हिडिओची सुरुवात तर कतरिना कैफपासून झाली आहे. पण जशी अक्षय कुमार आणि रोहित शेट्टीदरम्यान मारामारी वाढू लागली तसं या दोघांना थांबवायला पोलिसही धावत आलेले व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. हा व्हिडिओ सूर्यवंशीच्या चित्रीकरणादरम्यानचा आहे. तसंच हा व्हिडिओ शेअर करताना अक्षयकुमारने कॅप्शनही दिली आहे, ‘ब्रेकिंग न्यूज – एक असं भांडण, जो तुमचा दिवस मनोरंजनात्मक बनवू शकते’. रोहित आणि अक्षयकुमार हे खूपच चांगले मित्र आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये असं भांडण होण्याची शक्यताच नाही. पण चुकीच्या अफवांवर 

खतरों के खिलाडी’ रोहित शेट्टीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन

ADVERTISEMENT

रोहित आणि अक्षयने उडवली बातमीची टर

मनोरंजन क्षेत्रात काही ना काही बातम्या येतच असतात.  अशा बातम्यांना खोटं ठरवण्यासाठी ही नामी शक्कल रोहित शेट्टी आणि अक्षयने लढवली आहे. एका संकेतस्थळाने दिलेल्या बातमीनंतर हा व्हिडिओ खास अक्षय आणि रोहितने शेअर केला आहे. हा मजेशीर व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून लोकांच्या मजेशीर प्रतिक्रिया यावर येत आहेत. सूर्यवंशीचं सध्या चित्रीकरण चालू असून हा चित्रपट करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन्स आणि रोहित शेट्टीच्या शेट्टी पिक्चर्स बॅनरखाली बनत आहे. पुढच्या वर्षी 27 मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षयकुमारसह बऱ्याच वर्षांनी कतरिना कैफ दिसणार आहे. याशिवाय अजय देवगण आणि रणवीर सिंहदेखील यामध्ये महत्त्वाची भूमिका साकारत आहे. यामध्ये दोघेही बाजीराव सिंघम आणि संग्राम भालेराव हीच भूमिका करणार आहेत.  त्यामुळे अक्षयकुमार, अजय देवगण आणि रणवीर सिंह यांना पुन्हा एकदा एकत्र बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 

रोहित शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’मध्ये 9 वर्षानंतर अक्षय आणि कॅट ही जोडी दिसण्याची शक्यता

सध्या अक्षय कुमार आणि रोहित शेट्टी दोघेही आपल्या चित्रपटाव्यतिरिक्त व्यग्र आहेत. अक्षय कुमारचा लवकरच ‘गुड न्यूज’ ही करीना कपूरसह चित्रपट येत असून रोहित शेट्टीदेखील ‘खतरों के खिलाडी’ या रियालिटी शो चा दहावा सीझन घेऊन येत आहे. या दोन्हीची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे. कारण पुन्हा एकदा बऱ्याच वर्षांनी अक्षयकुमारसह करिना कपूर मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. तर खतरों के खिलाडीच्या या सीझनमधील स्पर्धकदेखील तगडे आहेत. 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

ADVERTISEMENT

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

12 Nov 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT