राजीव भाटिया असं नाव असलेल्या अक्षय कुमारची बॉलीवूडमध्ये आजही खिलाडी म्हणून ओळख आहे. अक्षयने सौंगध चित्रपटातून अक्षयने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. राज सिप्पी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा चित्रपट 1991 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यामुळे अक्षयने आता बॉलीवूडमध्ये जवळजवळ तीस वर्ष पूर्ण केली आहेत. यशराज फिल्म्सने अक्षयच्या या यशस्वी वाटचालीसाठी त्याला एक खास नजराणा बहाल केला आहे. एक खास सरप्राईझ देत यशराज फिल्म्सने अक्षयचं कौतुक केलं आहे.
यशराज फिल्मचं अक्षयला गिफ्ट
बॉलीवूडमध्ये सलग तीस वर्ष यशस्वीपणे वाटचाल करणं हे नक्कीच सोपं नाही. कधी हिट तर कधी फ्लॉप असे चित्रपट त्याच्या वाट्याला आले. कधी त्याने रोमांस करत प्रेक्षकांच्या मनात प्रवेश केला तर कधी एक्शन आणि थ्रीलरने अंगावर रोमांच उभं केलं. अक्षय त्याच्या या अनोख्या स्टाईलमुळे कधी बॉलीवूडचा खिलाडी झाला हे त्याला सुद्धा समजलं नाही. अक्षयच्या या यशस्वी वाटचालीसाठी यशराजने या खास निमित्तावर त्याच्या आगामी चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित केलं आहे. यशराज फिल्म्सने अक्षयच्या आगामी चित्रपट पृथ्वीराजचं पोस्टर प्रदर्शित करत त्याला यशस्वी वाटचालीसाठी खास शुभेच्छा दिल्या आहेत.
काय म्हणाला अक्षय
अक्षयने या पोस्टरचं प्रकाशन त्याच्या स्वतःच्याच हस्ते करण्यात आलं होतं. यासाठी दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी एक खास सरप्राईझ त्याच्यासाठी आयोजित केलं होतं. या पोस्टरमध्ये अक्षयच्या तीस वर्षाच्या कारर्किदीमधील चित्रपटांना खुबीने गुंफण्यात आलेलं आहे. हे पाहून अक्षय खूप भावुक झाला. त्याने याबाबत सर्व चाहत्यांचे आणि यशराज फिल्मचे धन्यवाद व्यक्त केले. शिवाय त्याने काही आठवणींनाही या निमित्ताने उजाळा दिला. तो म्हणाला की, ‘जेव्हा मी माझ्या जीवनातील पहिला शॉट शूट केला होता. तेव्हा मी सौंगधसाठी उटीला शूट करत होतो आणि माझ्यासोबत अॅक्शन शॉटसाठी बॉब ख्रिस्टो होता’ अक्षयने ट्वीटरवरही सर्व चाहत्यांचे यासाठी मनापासून धन्यवाद व्यक्त केले आहेत. अक्षयचा पृथ्वीराज चित्रपट तीस जूनला प्रदर्शित होणार आहे. यासोबतच अक्षय लवकरच गोरखा, ओएमजी 2, सेल्फी, रक्षा, बंधन, मिशन सिंड्रेला, राम सेतू अशा अनेक चित्रपटातून या वर्षी सर्वांसमोर येणार आहे. अक्षय एका वर्षात कमीत कमी चार ते पाच चित्रपटांचे शूटिंग पूर्ण करतो. कठीण मेहनत आणि प्रामाणिकपणा यामुळे तो आजवर एवढी यशस्वी वाटचाल पूर्ण करू शकला आहे. त्यामुळे सर्व चाहत्यांकडून अक्षयला त्याच्या पुढील कारर्किदीसाठी खूप खूप शुभेच्छा!
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक