अक्षय कुमारचा पृथ्वीराज येत्या 3 जूनला प्रदर्शित होत आहे. ट्रेलर प्रदर्शित होताच सगळीकडे पृथ्वीराजची चर्चा सुरू झाली. यशराज फिल्म्स निर्मित पृथ्वीराजचे दिग्दर्शन चंद्रप्रकाश द्विवेदी करत आहेत. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत संजय दत्त, सोनू सूद आणि मानुषी छिल्लर मुख्य भूमिकेत असेल. अक्षयदेखील बऱ्याच दिवसांनी एखाद्या ऐतिहासिक भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी आधी अक्षय कुमारची निवड झाली नव्हती.
अक्षय कुमार नव्हती पृथ्वीराजसाठी पहिली निवड
चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्याकडे पृथ्वीराजची स्क्रिप्ट 2010 पासून तयार होती. पुढे 2018 मध्ये यशराज फिल्मने या विषयावर चित्रपट करण्याचा निर्णय घेतला. त्याआधी यशराजसोबत चंद्रप्रकाश यांनी मोहल्ला अस्सी हा चित्रपट केला होता. सहाजिकच पृथ्वीराजसाठी चंद्रप्रकाश यांची पहिली पंसत सनी देवोल होता. चंद्रप्रकाश यांनी या भूमिकेसाठी सनी देवोलच हवा होता. त्याचा आवाज आणि लुक या भूमिकेसाठी परफेक्ट आहे असं दिग्दर्शकाला वाटत होतं. मात्र पुढे काही कारणात्सव ते शक्य झालं नाही, ज्यामुळे चंद्रप्रकाश यांनी अक्षय कुमारची निवड केली. असं म्हटलं जात आहे की, यशराज फिल्म्सला या चित्रपटासाठी लोकप्रिय चेहरा हवा होता. ज्यामुळे बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चालेल. यासाठी यशराज फिल्म्सला अक्षय कुमारचा चेहरा जास्त योग्य वाटला. नाहीतर आज पृथ्वीराजचा हिरो सनी देवोल झाला असता.
पृथ्वीराजची होत आहे तुलना
मागील काही दिवसांपासून बॉलीवूड चित्रपटांना उतरती कळा लागली आहे. लुक्स आणि कंटेटमुळे बॉलीवूड चित्रपटांवर टीका केली जात आहे. पृथ्वीराज चित्रपटाच्या लुकवरूनही सोशल मीडियावर खूप विनोद केले जात आहेत. लोकांनी या चित्रपटाची तुलना अक्षयच्या बाला लुकसोबत केली आहे. तीन जूनला बॉक्स ऑफिसवर मेजर आणि विक्रम हे आणखी दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. ज्यामध्ये पृथ्वीराजचा टिकाव लागणे कठीण असल्याचं नेटकऱ्यांचे म्हणणं आहे. त्यामुळे आता यशराज फिल्म्सचा निर्णय कितपत योग्य ठरला आहे हे पाहणं नक्कीच उत्सुकतेचं ठरणार आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक