ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
Akshay Kumars Raksha Bandhan gets U certificate in Marathi

अक्षय कुमारच्या ‘रक्षाबंधन’ला मिळालं U सर्टिफिकेट

बहीण भावाच्या प्रेमळ नात्याची साक्ष देणारा चित्रपट रक्षाबंधन येत्या राखीपौर्णिमेच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे अनेक बहिणींनी भावासोबत येत्या 11 ऑगस्टला रक्षाबंधन चित्रपट पाहण्याचा बेत नक्कीच आखला असेल. मात्र भाऊ बहीणच नाही तर कुटुंबातील लहान वृद्ध कोणासोबतही तुम्ही हा चित्रपट आता बिनधास्त पाहू शकता. कारण सेन्सॉर बोर्डने या चित्रपटाला U सर्टिफिकेट दिलं आहे. या सर्टिफिकेटमुळे या चित्रपटात कोणतेही बोल्ड सीन्स अथवा शिवीगाळ नसणार आहे. त्यामुळे कुटुंबातील सर्वांसाठी हा चित्रपट आता खास असणार आहे. 2017 साली या चित्रपटाला मिळालं होतं हे सर्टिफिकेटरक्षाबंधन चित्रपटाआधी पाच वर्षांपूर्वी 2017 ला हिंदी मीडियम या चित्रपटाला हे सर्टिफिकेट मिळालं होतं. सेन्सॉर बोर्ड बऱ्याचशा बॉलीवूड चित्रपटांना U/A सर्टिफिकेट देतात. रक्षाबंधनसोबत प्रदर्शित होणाऱ्या इतर बॉलीवूड चित्रपटांना हेच सर्टिफिकेट देण्यात आलं आहे. 

U सर्टिफिकेट मिळण्याचे फायदे

सेन्सॉर बोर्डकडून U सर्टिफिकेट मिळण्याचे  निर्मात्यांना अनेक फायदे होतात. कारण असे चित्रपट कोणत्याही वयातील लोक पाहू शकतात. मात्र असे चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटातील बोल्ड सीन्स कट केले जातात. त्यामुळे कुटुंबासोबत असे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करतात. मात्र जर चित्रपटला U/A सर्टिफिकेट मिळालं असेल तर बारा वर्षांखालील मुलं मोठ्यांच्या परवानगी शिवाय असे चित्रपट पाहू शकत नाहीत. 2016 साली दंगल चित्रपटालादेखील U सर्टिफिकेट मिळालं होतं. 

कसा असेल अक्षयचा रक्षाबंधन

अक्षय कुमारचा रक्षाबंधन 11 ऑगस्ट देशभरात सगळ्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट एक फॅमिली ड्रामा आहे. या चित्रपटात भाऊबहिणीच्या प्रेमळ नात्याची ओढ दाखवली जाणार आहे. चित्रपटात अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. चित्रपटाला U सर्टिफिकेट मिळाल्यामुळे आता सर्वच भावंडे कुटुंबासोबत राखीपौर्णिमेला चित्रपट गृहात गर्दी करण्याची शक्यता आहे.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm आले आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
07 Aug 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT