ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
Akshay Kumars Raksha Bandhan song Dhaagon Se Baandhaa reminds fans of Tere Naam in Marathi

अक्षय कुमारच्या ‘रक्षाबंधन’मधील गाणं ऐकून प्रेक्षकांना आली ‘तेरे नाम’ चित्रपटाची आठवण

बहीण भावाच्या प्रेमाची साक्ष देणारा सण राखीपौर्णिमेच्या मुहूर्तावर अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील गाणं ‘धागों से बंधन’ नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. हेच रक्षाबंधन चित्रपटाचं टायटल सॉंग प्रदर्शित होताच व्हायरल देखील झालं आहे. या गाण्यातून चित्रपटातील अक्षयच्या बहिणीच्या लग्नसोहळा दाखवण्यात आला आहे. अधून मधून अक्षयला फ्लॅश बॅकमध्ये भूतकाळातील घटना आठवताना दिसत आहेत. गाणं पाहताच चित्रपट बहीण भावाच्या नात्यावर आधारीत असून तो कौटुंबिक आणि भावनिक असणार हे दिसून येत आहे. येत्या राखीपौर्णिमेलाच हा चित्रपट प्रदर्शित होत असल्यामुळे या चित्रपटाची खूप चर्चा सुरू आहे. मात्र या चित्रपटातील ‘धागों से बंधन’ गाणं प्रदर्शित होताच या गाण्याची तुलना  थेट सलमान खानच्या ‘तेरे नाम’ चित्रपटातील टायटल सॉंगसोबत होताना दिसत आहे. गाणं ऐकताना चित्रपटातील भूतकाळ आठवण्याऐवजी ट्यूनमुळे प्रेक्षकांना चक्क तेरे नाम चित्रपट आठवत आहे. 

अक्षयने शेअर केलं गाणं

रक्षाबंधन चित्रपटातील हे गाणं गाणं प्रदर्शित होताच अक्षय कुमारने ते त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलं. गाण्यातील इमोशनल भाव शब्द आणि सुरांमधून प्रेक्षकांपर्यंत पोहचावे असेच आहेत. मात्र गाण्याची ट्यून थोडीफार सलमान खानच्या ‘तेरे नाम’ चित्रपटातील गाण्याची मिळती जुळती आहे. त्यामुळे गाणं ऐकताना सलमानच्या तेरे नाम चित्रपटाचीच जास्त आठवण येते. सहाजिकच गाणं प्रदर्शित होताच ट्रोलर्सनीं कौतुकासह टीकाही करायला सुरुवात केली. या गाण्याचं संगीत दिग्दर्शन हिमेश रेशमियाचं आहे. त्यामुळे लोकांनी हिमेशने जुन्या गाण्यातून प्रेरणा घेत नवं गाणं तयार केल्याची टीका केली आहे. त्याचसोबत श्रेया घोषाल आणि अरिजित सिंगने गाताना या गाण्यात अक्षरशः जीव ओतला आहे असं कौतुकही केलं आहे.

काय आहे रक्षाबंधन

अक्षय कुमारचा आगामी चित्रपट रक्षाबंधन चार बहिणी आणि एका भावाच्या प्रेमाची कथा आहे. यात अक्षय कुमारने हा भाऊ साकारला असून बहिणीच्या भूमिकेत साहेजमान कौर, दीपिका खन्ना, साहिया खातीब आणि स्मृती श्रीकांत आहे. अक्षय कुमारसह भुमी पेडनेकरची एक खास भूमिका यात आहे. चित्रपट आनंद एल राय यांनी दिग्दर्शित केला आहे. येत्या 11 ऑगस्टला रक्षाबंधनच्या मुहूर्तावर चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
28 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT