ADVERTISEMENT
home / मनोरंजन
alia-bhatt-and-rabir-kapoor-reportdly-get-married-on-17-th-april-in-marathi

16 ला हळद, 17 ला लग्न, असा असेल रणबीर-आलिया लग्नाचा थाट

सध्या सगळीकडे एकच चर्चा आहे ते म्हणजे रालिया (Ralia) अर्थात रणबीर (Ranbir Kapoor) आणि आलियाचं (Alia Bhatt) लग्न. या दोघांच्याही लग्नाच्या रोज नवनवीन गोष्टी बाहेर येत आहेत. कधी आलिया घालणार सब्यासाची लेहंगा (Sabyasachi Lehenga) तर कधी रणबीर – आलिया करणार कपूर घराण्याच्या खानदानी घरात लग्न एक ना दोन. गेले चार वर्ष ही जोडी एकमेकांबरोबर आहे. बॉलीवूडपासून अनेक जण या दोघांच्या लग्नाची वाट पाहात आहेत. आमच्या सुत्रांकडून या दोघांच्या लग्नाची तारीख कळली असून हे क्युट कपल (Cute Couple) 15 एप्रिल रोजी लग्नबंधनात अडकणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत अधिक माहिती खास तुमच्यासाठी. 

का करणार आधी लग्न?

आलिया आणि रणबीरच्या लग्नाची चर्चा ही खरं तर गेल्या वर्षापासून रंगली आहे. पण यावर्षी हे दोघे लग्न करणारच असंही सांगण्यात येत होतं. सुत्रांनी सांगितल्यानुसार आलिया आणि रणबीरचं लग्न हे एप्रिल महिन्याच्या शेवटी होणार होतं. पण अचानक लग्न प्रिपोन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आलियाचे आजोबा अर्थात आलियाची आई सोनी राझदानचे वडील यांची तब्बेत खराब असल्याने लवकर लग्न करण्यात येण्याचे सांगण्यात येत आहे. आलिया आणि रणबीर यांना आपल्या लग्नात घरातील थोरामोठ्यांचे आशीर्वाद हवे असल्याने लग्न लवकर करणार असल्याचेही आता समोर येत आहे. सध्या आलियाचे आजोबा रूग्णालयात असून त्यांच्या तब्बेतीमध्ये सुधारणा होते आहे. त्यांच्या सांगण्यावरूनच लवकर लग्न होणार असल्याचे सध्या सांगण्यात येत आहे. तसंच एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात त्यांना चांगला मुहूर्त न मिळाल्यानेही त्यांनी आधी लग्न करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही सांगण्यात येत आहे. 

वास्तु अपार्टमेंटमध्ये होणार हळद आणि लग्न 

काहीच महिन्यांपूर्वी रणबीर आणि आलियाने मुंबईमध्ये एका फ्लॅटची खरेदी केली, जो बांद्रा येथे असून त्याचे नाव वास्तु अपार्टमेंट्स आहे. याच घरामध्ये आलियाची हळद होणार असून आलिया आणि रणबीर आपल्या नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत विवाह करणार आहेत. तर रणबीरची हळद आरके बंगल्यामध्ये होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आरके हा बंगला खास आहे, कारण रणबीरचे आई वडील नीतू कपूर (Neetu Kapoor) आणि ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांचे लग्न इथे झाले होते. 16 एप्रिल रोजी हळद होणार असून 17 तारखेला दोघेही लग्नबंधनात अडकणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आरके बंगला खास असल्यामुळे इथेच लग्न होणार असल्याचेही सांगितले जात आहे. 

बॅचलर पार्टीमध्ये येणार हे सेलिब्रिटी 

Ralia Wedding Bells

गेले काही दिवस सतत सोशल मीडियावर आलिया आणि रणबीरच्या लग्नाची जोरदार चर्चा होऊ लागली आहे आणि रोज नवे अपडेट येत आहेत. त्यापैकी एक अपडेट म्हणजे रणबीर कपूरची बॅचलर पार्टी. या पार्टीची गेस्ट लिस्ट निघाली असून, यामध्ये शाहरूख खान, सैफ अली खान, अर्जुन कपूर, अयान मुखर्जी, आदित्य रॉय कपूर हे सर्व रणबीरचे जवळचे मित्र येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र सध्या सगळ्यांचे लक्ष या दोघांच्या लग्नाकडे आणि त्यांच्या येणाऱ्या फोटोकडे लागून राहिले आहे. आता नक्की 14-15 एप्रिल रोजी ही जोडी लग्नबंधनात अडकणार का हे पाहावे लागेल. 

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

07 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT