आलिया आणि रणबीरची जवळीक मागील वर्षभरापासून वाढलेली दिसून येत आहे. सर्वात आधी सोनम कपूरच्या रिसेप्शनमध्ये हे दोघं एकत्र दिसले होते. त्यानंतर अनेक ठिकाणी हे लव्हबर्ड्स अगदी उघडपणे आपलं नातं जगासमोर मांडू लागले. त्यानंतर ते दोघं एकमेकांच्या घरी आणि एकमेकांच्या कुटुंबासोबत एकत्र वेळ घालवताना दिसू लागले. ज्यामुळे त्यांच्यात शिजणाऱ्या या प्रेमाच्या खिचडीचा सुगंध चाहत्यांना येऊ लागला. आता तर त्यांनी एकमेकांसोबत आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. लवरकच हे दोघं लग्नबंधनात अडकणार आहेत. या बातमीवर शिक्कामोर्तब केलं आहे ते या लग्नपत्रिकेने. रणबीर आणि आलियाच्या लग्नाची पत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यावरून ते पुढच्या वर्षी जानेवारीत आणखी एका लग्नाचा थाटमाट पाहता येण्याची शक्यता आहे. मात्र लग्नाचं हे आमंत्रण स्वीकारण्यापूर्वी ते आधी नीट वाचा आणि मगच काय तो निर्णय घ्या.
कशी आहे रणबीर आणि आलियाची लग्नपत्रिका
ही पत्रिका निळ्या रंगाच्या शेडमध्ये आहे ज्यावर सोनेरी रंगात रणबीर आणि आलियाचं नाव आणि इतर मजकूर लिहिलेला आहे. सोनेरी रंगाच्या बॉक्समध्ये ही पत्रिका डिझाईन करण्यात आलेली आहे. 22 जानेवारीला असून संध्याकाळी पाच वाजता हा विधी केला जाणार आहे असं त्यात लिहीलं आहे. या पत्रिकेवरील आमंत्रणाचे ठिकाण जोधपूरमधील उमेद भवन पॅलेस असं आहे. ज्यामुळे लग्नासाठी कपूर आणि भट कुटुंबाने जोधपूरमधील तेच स्थळ निवडलं आहे जिथे मागच्या वर्षी प्रियंका आणि निक जोनसचं लग्न झालं होतं. तुम्हालादेखील ही पत्रिका बघून ती आलिया आणि रणबीरच्या लग्नाची आहे असं वाटत असेल तर जर थांबा… कारण ती नीट पाहा म्हणजे अनेक गोष्टी तुमच्या सहज लक्षात येतील.
चाहत्यांना झाली आहे रणबीर आलियाच्या लग्नाची घाई
जरी ही पत्रिका सोशल मीडियावर रणबीर आणि आलियाच्या लग्नाची असल्याचं सांगण्यात येत असलं तरी त्यावर शूगर सेरिमनी म्हणजेच साखरपुड्याचं आमंत्रण देण्यात आलेलं आहे. शिवाय या पत्रिकेत आलियाचं नावदेखील चुकीच्या पद्धतीने लिहीलेलं असून तिच्या वडिलांचं नाव महेश ऐवजी मुकेश भट असं लिहिलेलं आहे. ज्यामुळे ही लग्नपत्रिका खोटी असण्याची सिद्ध होत आहे. या सर्व गोष्टींवरून चाहत्यांना आता रणबीर आणि आलियाच्या लग्नाची घाई झाल्याचं दिसून येत आहे. ज्यामुळे त्यांनी त्या दोघांच्या वतीने खोटी पत्रिका छापून त्यांना लवकर लग्न करा असं सांगायला सुरूवात केली आहे.
रणबीर आणि आलियाची लव्हस्टोरी
ब्रम्हास्त्रच्या सेटवर आलिया आणि रणबीरमधील प्रेम फुलत गेलं याची सर्वांनाच माहिती आहे. दोघांनीही आपल्या प्रेमाची जाहीर कबूली दिलेली आहे. कतरिना आलियाची बेस्ट फ्रेंड होती. पण इतकं असूनही रणबीरचं कतरिनाशी ब्रेक अप झाल्यानंतर रणबीरबरोबर आलियाने आपलं प्रेमाचं नातं जपलं हे सर्वांनाच थोडं धक्कादायक होतं. सध्या दोघंही त्यांच्या आगामी ब्रम्हास्त्रच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. ब्रम्हास्त्र हा सुपरहिरो प्रकारातील चित्रपट असून त्यात भारतीय पौराणिक कथांचा समावेश असणार आहे. ‘ब्रम्हास्त्र’ हा चित्रपट अयान मुखर्जी दिग्दर्शित असून या चित्रपटाचे नाव आधी ‘ड्रॅगन’ असे ठेवण्यात आले होतं पण नंतर ब्रम्हास्त्र हे नाव निश्चित करण्यात आले. ब्रम्हास्त्र हे असे शस्त्र आहे ज्याचा कोणीच संहार करु शकत नाही. या चित्रपटात आलिया- रणबीरसोबत अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मोनी रॉय यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा लोगो लाँच झाला. हा चित्रपट वर्षाअखेरीस भेटीला येण्याची शक्यता आहे.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
हे ही वाचा –
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
अधिक वाचा –
Big Boss13: सलमानचा राग अनावर मध्यावरच या कारणामुळे सोडला शो
आता ‘हेरा फेरी 3’ मध्येही अक्षयला रिप्लेस करणार कार्तिक आर्यन