नव्वदच्या दशकात ‘सडक’ चित्रपटाने तरूणांना अक्षरशः वेड लावलं होतं. सडकमध्ये अभिनेता संजय दत्त आणि अभिनेत्री पुजा भट यांच्या मुख्य भूमिका होत्या. सदाशिव अमरापुरकर यांनी साकारलेला महाराणी हा खलनायक तर आजही लोकांच्या स्मरणात आहे. या चित्रपटातील गाणीही त्याकाळी फार गाजली होती. आता सत्ताविस वर्षानी सडक चित्रपटाचा सिक्वल येत आहे. ‘सडक 2’ मध्ये अभिनेत्री आलिया भट आणि अभिनेता आदित्य रॉय कपूर यांची मुख्य भूमिका असणार आहेत. या सिक्वलचं दिग्दर्शन महेश भट करणार आहेत. भट कुटुंबासाठी हा चित्रपट खास असणार आहे. कारण या चित्रपटाच्या निमित्ताने महेश भट अनेक वर्षांनी पुन्हा दिग्दर्शन क्षेत्रात परत येत आहेत शिवाय आलिया आणि पुजा या त्यांच्या दोघी मुली या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. संजय दत्त देखील या चित्रपटातील एक महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. 25 मार्च 2020 मध्ये सडक 2 प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सहाजिकच या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
सडक 2 मध्ये कशी असेल आलियाची भूमिका
सडक 2 चित्रपटाची सर्व तयारी झाली आहे. पंधरा दिवसांमध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केली जाईल. या चित्रपटाबाबत महेश भट फार उत्साही आहेत. महेश भट यांनी दिलेल्या एका मुलाखतीनुसार आलिया या चित्रपटात एक हटके भूमिका साकारणार आहे. आलिया या चित्रपटात एका पाखंडी धर्मगुरूच्या दुष्कृत्यांचा पर्दाफाश करणाऱ्या मुलीची भूमिका साकारत आहे. हा धर्मगुरू लोकांची फसगत करत एक आश्रम चालवत आहे. या भूमिकेत आलियाला संजय दत्तची चांगली साथ मिळणार आहे. अभिनेता संजय दत्त देखील त्याच्या या भूमिसाठी प्रचंड मेहनत घेत आहे. या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत गुलशन ग्रोव्हर दिसण्याची शक्यता आहे. मात्र गुलशन ग्रोव्हर पाखंडी धर्मगुरू साकारणार का हे अद्याप उघड करण्यात आलेलं नाही.
आलियासाठी हा चित्रपट आहे स्पेशल
वडील आणि बहिणीसोबत पहिल्यांच एकत्र चित्रपट करणार असल्यामुळे आलियासाठी हा चित्रपट नक्कीच खास असेल. आलियाचा कलंक चित्रपट बॉक्सऑफिसवर आपटल्यामुळे तिच्या पदरात यामुळे एका फ्लॉप चित्रपटाची भर पडली आहे. मात्र ‘ब्रमास्त्र’ आणि ‘इन्शाअल्हा’ आणि ‘RRR’ या आगामी चित्रपटांकडून चांगल्या आशा आहेत. शिवाय आता भट प्रॉडक्शनचा ‘सडक 2’ मुळे देखील चाहत्यांच्या मनात आलियाच्या हटके भूमिकेबाबत उत्कंठा निर्माण झाली आहे.
सारानंतर आता ही नवोदित अभिनेत्री कार्तिकच्या प्रेमात
मृणाल कुलकर्णीची मुख्य भूमिका असलेला ‘वेलकम होम’
फराह खान वाट पाहतेय शाहरूखच्या होकाराची
फोटोसौजन्य – इन्साग्राम