ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
लग्नानंतर लगेच आलिया राजस्थानला होणार रवाना, या चित्रपटाच्या शूटिंगला करतेय सुरूवात

लग्नानंतर लगेच आलिया राजस्थानला होणार रवाना, या चित्रपटाच्या शूटिंगला करतेय सुरूवात

रणबीर कपूर (Ranbir kapoor) आणि आलिया भट (Alia Bhatt) च्या लग्नाला अजून एक आठवडादेखील झालेला नाही. बी टाऊनच्या या सेलिब्रेटी कपलने लग्नात खूप धमाल केली. लग्न अगदी गुपचूप आणि कमी लोकांच्या उपस्थित झालं असलं तरी… नंतर मात्र शेअर करण्यात आलेल्या फोटोजमधून लग्नाचा थाटमाट चांगलाच दिसून आला. 14 एप्रिलला रणबीर आणि आलियाने त्यांच्या राहत्या घरीच लग्नाचे सर्व विधी केले. साधेपणाने लग्न उरकल्यानंतर आता दोघंही पुन्हा त्यांच्या कामावर लक्ष देण्यास सज्ज झाले आहेत. रणबीर तर लग्नानंतर दोन दिवसातच त्याच्या कामासाठी घराबाहेर पडला. आता नवी नवरी आलियाही तिच्या शूटिंगच्या तयारीला लागली आहे. कपूर घराण्याची सून झाल्यानंतर चित्रपटातील काम सोडण्याची परंपरा मोडीत काढत ती आता राजस्थानला शूटिंगसाठी जात आहे.

आलियाच्या या चित्रपटाचं सुरू होतंय शूटिंग

लग्नाआधी आलिया भट तिचा आगामी चित्रपट रॉकी और रानी की प्रेम कहानी (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या चित्रपटाचं शूटिंग करत होती. या चित्रपटाच्या शूटिंगमधून काही दिवसांचा ब्रेक घेत तिने लग्नाचा घाट घातला होता. आता या चित्रपटाच्या पुढील शूटिंगसाठी तिला पुन्हा रूजू व्हावं लागणार आहे. यासाठी लवकरच आलिया राजस्थानमध्ये परतणार आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटाचं शूटिंग जैसलमेरमध्ये सुरू होत आहे. या चित्रपटात आलियासोबत रणवीर सिंह मुख्य भूमिकेत आहे. त्यामुळे या जोडीला पुन्हा एकदा धमाल करताना मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहे. रॉकी और रानी की प्रेमकहानी पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित होईल. या चित्रपटाचा दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर असून जया बच्चन, शबाना आजमी आणि धर्मेंद्र हे दिग्गज कलाकारही यामध्ये असणार आहेत.

रणबीर आणि आलियाचं फस्ट लव्ह

रणबीर आणि आलिया हे आता पती पत्नी झाले असले तरी त्यांचं काम हे पहिलं प्रेम आहे. दोघंही त्यांच्या करिअरबद्दल प्रामाणिक आहेत. म्हणूनच लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी रणबीर पुन्हा त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी हजर झाला. रणबीर नुकताच टी सिरीजच्या ऑफिसबाहेर दिसला होता. रणबीरच्या एका आगामी चित्रपटाची लुक टेस्ट या ठिकाणी घेण्यात आली होती. आता आलियादेखील राजस्थानमध्ये शूटिंगला जाण्यासाठी बॅग पॅक करत आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की दोघंही लवकरच हनिमूनला जाण्याच्या तयारीत नाहीत. त्यामुळे दोघं आपापली कामं पूर्ण करून मगच त्यांच्या हनिमूनचं प्लॅनिंग करणार असावेत. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
19 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT